- पेरणी साठी जमिनीची तयारी करताना एकरी 8/10 टन सेंद्रिय खत घालावे.
- नांगरणी करताना 30 किलो युरिया (नत्र), 70 किलो सुपर फॉस्फेट (स्फुरद), आणि 35 किलो म्युरेट ऑफ पोटाश (पालाश) घालावे.
- युरियाची (नत्राची) उरलेली 30 किलो मात्रा रोपांना 8-10 पाने फुटल्यावर आणि पीक फुलोर्यावर येताना अशा दोन वेळा विभागून द्यावी.