- पेरणीसाठी निरोगी बियाणे वापरावे.
- पेरणीपूर्वी शिफारस केलेली बुरशीनाशके वापरुन बिज प्रक्रिया करावी.
- नर्सरी सतत एकाच शेतात घेणे टाळावे.
- नर्सरीमधील मातीवर कार्बन्डाझिम 5 ग्रॅ/ चौ फुट वापरावे आणि दर आठवड्याला कार्बन्डाझिम 5 ग्रॅ/ 1 लीटर पाणी याप्रमाणे फवारावे.
- उन्हाळी पेरणी करण्यापूर्वी वाफ्यावर 250 गेजचे पॉलिथिन अंथरून सूर्यप्रकाशाने वाफ्याला 30 दिवस संस्कारित करावे.
- ट्रायकोडर्मा जैविक औषधाचा @ 500 ग्रॅ/ एकर केल्याने आद्रगलन (मर रोग) प्रभावीपणे रोखता येते.