आंतरपिकाचे लाभ

How is inter-cropping beneficial o farmers?
  • शेतामधील पिकाची विविधता आणि स्थिरता.
  • रासायनिक आणि भेसळयुक्त खताचा वापर कमी.
  • तणाचे प्रमाण कमी होते आणि कीड व रोगांना रोखले जाते.
  • भाज्यांचे आंतरपीक अल्पकालीन आणि अधिक उत्पादन देणारे ठरते.
Share

भारतीय सरकारने वर्ल्ड बँकेकडून कृषी विकासासाठी 80 दशलक्ष डॉलर कर्ज घेतले आहे

भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. याचा अर्थ, शेती सुधारणेमुळे अर्थव्यवस्था देखील मजबूत होईल. म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून सरकारने कृषी क्षेत्रावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरूवात केली आहे. याच वेळी हिमाचल प्रदेश सरकारने राज्याच्या कृषी विकासासाठी जागतीक बँकेबरोबर 80 दशलक्ष डॉलर चा कर्ज करार केला.

ही रक्कम प्रामुख्याने हिमाचल प्रदेशच्या विविध ग्रामपंचायतींमध्ये पाणी व्यवस्थापन पद्धती सुधारण्यासाठी आणि कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी खर्च केली जाईल. माध्यमांच्या वृत्तानुसार, 482 ग्रामपंचायतींचा समावेश असलेल्या राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबविला जाईल. याचा फायदा सुमारे 400,000 लघुधारक शेतकऱ्यांना होईल.

हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी  हा प्रकल्प खूप फायदेशीर ठरेल कारण राज्यातील अनेक सखल भागांमध्ये सिंचनासाठी पुरेसे पाणी नसल्याने ते मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. परंतु पावसात सतत होणारी घट आणि हवामानातील बदल हिमाचल प्रदेश मधील फळ उत्पादनावर उदा. सफरचंद यावर परिणाम करत आहे. केंद्र सरकारच्या शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोहिमेस हातभार लावण्यासही ही पायरी मोठी भूमिका बजावू शकते.

Share

“शेतीमधील महिला” या विषयावर हैदराबाद मध्ये एक राज्यस्तरीय मेळावा होणार आहे

विशेषतः भारतात महिला शेतीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. पण बरेचदा फक्त समाजाकडूनच नव्हे तर त्यांच्या स्वतःकडून सुद्धा त्यांचे योगदान दुर्लक्षित राहते .

त्यांचे शेतीतील योगदान अधोरेखित करण्यासाठी हैदराबाद मध्ये ६ मार्च पासून एक मेळावा आयोजित केला आहे. या २ दिवसांच्या मेळाव्याचा मुख्य हेतू ग्रामीण भारतातील स्त्रियांना विशेषतः शेती क्षेत्रामध्ये येणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास करणे हा आहे. इथे शेतीशी संबंधित अनेक क्षेत्रातील तज्ञ आपले संशोधन सादर करतील. तुम्हाला अनेक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि शास्त्रज्ञ या मेळाव्यात भाग घेऊन चर्चा करताना दिसतील.

या मेळाव्या बद्दल एका पत्रकार परिषदेत बोलताना तेलांगणा रायथू संघम चे उपाध्यक्ष, अरिबांदी प्रसाद राव, , यांनी असे म्हटले आहे की “स्त्रिया शेतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि आता खूप काळ उलटून गेल्यावर तरी निदान आपण हे ओळखून असले पाहिजे आणि त्यांना सतावणाऱ्या प्रश्नांकडे पुरेसे लक्ष दिले पाहिजे.”

Share

भोपळ्याच्या पिकावरील केवडा (तांबडी भुरी) रोग कसा ओळखावा

भोपळ्यावरील केवडा किंवा तांबडी भुरी रोगाची प्रमुख लक्षणे पुढील प्रमाणे हेत.

  • पानांच्या खालच्या पृष्ठभागावर पाण्याने भिजलेले घाव दिसतात.
  • घाव आधी जुन्या पानांवर दिसतात आणि नंतर कोवळ्या पानांवर पसरत जातात.
  • घाव जसजसे पसरतात तसे पिवळे राहतात किंवा सुके आणि तपकिरी होतात.
  • परिणाम झालेल्या वेलींना व्यवस्थित फल धारणा होत नाही.
Share

गव्हाच्या पिकाची साठवण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना

  • सुरक्षित साठवण करण्यासाठी धान्यात १०१२% पेक्षा जास्त ओलावा असू नये.
  • धान्य कोठार मध्ये किंवा ड्रममध्येकिंवा खोलीत ठेवल्यावर प्रत्येक एक टन गव्हात ३ ग्रॅम अल्युमिनियम फॉस्फाईड च्या २ गोळ्या ठेवाव्या.
Share

मिरचीवरील मोसाइक विषाणु चे निदान

image source - https://www.indiamart.com/proddetail/heavy-duty-agro-shade-net-house-15933969848.html
  • इस वायरस के संपर्क में आने से पत्तियों पर गहरे हरे और पीले रंग के धब्बे निकलते हैं।
  • इसके कारण हलके गड्ढे और फफोले भी दिखाई पड़ते हैं।
  • कभी-कभी पत्ती का आकार अति सुक्ष्म सूत्रकार हो जाता है।
  • यह सफ़ेद मक्खी के माध्यम से फैलता है।
  • इस वायरस से ग्रषित पौधों में फूल और फल कम लगते हैं।
  • इसके कारण फल भी विकृत और खुरदुरे हो जाते हैं।
Share

दुधी भोपळा आणि दोडका शेतामध्ये जमिनीची तयारी करताना करायचे खत व्यवस्थापन

image source -https://d2yfkimdefitg5.cloudfront.net/images/stories/virtuemart/product/nurserylive-sponge-gourd-jaipur-long.jpg
  • पेरणी साठी जमिनीची तयारी करताना एकरी 8/10 टन सेंद्रिय खत घालावे.
  • नांगरणी करताना 30 किलो युरिया (नत्र), 70 किलो सुपर फॉस्फेट (स्फुरद), आणि 35 किलो म्युरेट ऑफ पोटाश (पालाश) घालावे.
  • युरियाची (नत्राची) उरलेली 30 किलो मात्रा रोपांना 8-10 पाने फुटल्यावर आणि पीक फुलोर्‍यावर येताना अशा दोन वेळा विभागून द्यावी.
Share

काही महत्त्वाची आंतरपिके 

अनु. क्र. मुख्य पीक आंतरपीक
1. सोयाबीन मका, तूर
  • मिश्र किंवा आंतरपिकासाठी भाजीच्या वाढीचा दर, मुळांच्या वाढीचे प्रमाण, पूरकता, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव, बाजारातील मागणी इत्यादि घटक विचारात घ्यावेत.
  • शेतीची पध्दत व वातावरण एक सारख नाही राहू शकत उत्पादनं चा अनुरूप किढ्यांच्या व आजरा चा आक्रमण आंही बाजारपेठहीतली मंगणी चा विचार केला पाहिजे
2. भेंडी कोथिंबीर, पालक
3. कापूस शेंगदाणे, हरबरा, काळा हरबरा, मका
4. मिरची मुळा, गाजर
5. आंबे कांदा, हळद

 

Share

अर्ज सुलभ करण्यासाठी खालील पावले उचलली आहेत 

  • एक साधा एक पानाचा अर्ज तयार केला गेला आहे जेणेकरून पीएम किसान अंतर्गत बँकेच्या रेकॉर्डमधून मूलभूत माहिती मिळविली जाईल आणि पेरणी केलेल्या पिकाच्या तपशीलांसह जमीन नोंदवहीची फक्त एक प्रत आवश्यक असेल.
  • फॉर्म संपूर्ण भारतभरातील सर्व आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीसह उपलब्ध असेल आणि तो लाभार्थी कापून भरु शकतो.
  • आपण सर्व अनुसूचित वाणिज्य बँकांच्या वेबसाइटवर, कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या संकेतस्थळ- www.agricoop.gov.in आणि पंतप्रधान-किसन www.pmkisan.gov.in या संकेतस्थळावरुनही हा फॉर्म डाउनलोड करू शकता.
  • सामान्य सेवा केंद्रांना फॉर्म भरण्यास व तो संबंधित बँकेकडे पाठविण्यास परवानगी देण्यात आली आहे.
Share

2020 च्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी चांगली बातमी आहे…

अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज आपले दुसरे केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले.या अर्थसंकल्पात सरकारने देशातील बहुतेक सर्व क्षेत्रांसाठी विविध बदलांची घोषणा केली होती. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी 16 प्रमुख मुद्द्यांची घोषणा केली. या घोषणांचे मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणेः

  1. आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत मार्गावर कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारने कृषी उडान योजना जाहीर केली.
  2. कृषी पतपुरवठा करण्याचे उद्दिष्टही 12 लाख कोटी रुपयांवरून 15 लाख कोटी रुपये करण्यात आले आहे.
  3. आर्थिक वर्ष २१ मध्ये कृषी व सिंचनासाठी २.83 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.
  4. ग्रामीण विकास आणि पंचायत राज साठी 1.23 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.
  5. नाबार्ड पुनर्वित्त योजनेंतर्गत चारा शेती व कोल्ड स्टोरेज (शीतगृह) विकसित केले जातील. 
  6. 2022-23 पर्यंत सरकारने मत्स्य व्यवसाय उत्पादन 200 लाख टन पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. 
  7. दुधाची प्रक्रिया क्षमता दुप्पट म्हणजेच 108  मेट्रिक टन करण्याचे लक्ष्य आहे. 
  8. १०० पाणी-ताणग्रस्त जिल्ह्यांमधील परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित
  9. शेतकर्‍यांच्या हितासाठी 20 लाखांची तरतूद 
  10. नाशवंत वस्तूंसाठी स्वतंत्र किसान रेल्वे पीपीपी माध्यमामध्ये सुरू केली जातील
  11. सरकार शेतकरी हितासाठी एक उत्पादन एक जिल्हा मॉडेलवर लक्ष केंद्रित करेल.
  12. शून्य बजेट शेतीवर सरकार भर देणार आहे. 
  13. ई-एनएएम वाटाघाटी करण्यायोग्य गोदाम पावतीच्या वित्तपुरवठ्यात समाकलित केले जाईल
  14. शेती बाजाराचे उदारीकरण (विस्तार) होईल.
  15. शेतजमिनींमध्ये खतांचा समतोल वापर होण्यासाठी शेतकरी शिक्षित होतील. 
  16. कृषी बाजारपेठ उदारीकरण (विस्तार) करण्याच्या उद्देशाने सरकार शेतकऱ्यांना हाताशी धरत आहे.
Share