चांगली बातमी! आता पंतप्रधान किसान योजनेच्या सर्व लाभार्थीना के सी सी मिळेल.

भारतीय शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने घोषणा केली आहे की पंतप्रधान किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना आता किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) मिळेल. सरकारने केसीसी कार्ड देण्यासाठी पंधरा दिवसांची मोहीम देखील सुरू केलेली आहे. एका माध्यम वृत्तानुसार चौदा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचे फायदे मिळतील.

केसीसी योजना म्हणजे काय?

किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक कार्ड मिळेल. त्याद्वारे त्यांना तीन लाख रूपये पर्यंतचे कर्ज मिळेल ज्याचा व्याज दर फक्त सात टक्के असेल. शेतकऱ्यांनी दिलेल्या वेळेत पैसे भरल्यास त्यांना अधिक तीन टक्के सू मिळेल. याचा अर्थ शेतकऱ्यांना आता केवळ चार टक्के व्याज किसान क्रेडिट कार्डवर भरावे लागेल.

सरकारने या मोहिमेबद्दल नाबार्डच्या अध्यक्षांना, इतर बँकांच्या अध्यक्षांना, व्यवस्थापकीय संचालकांना तसेच सर्व राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना तपशीलवार सूचना दिलेल्या आहेत. ज्यांच्याकडे केसीसी नाही अशा पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी बनवायला सर्व बँका व राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना सांगितली हे. त्याचप्रमाणे योग्य त्या खात्याद्वारे त्यांना योजनेच्या सर्व लाभार्थ्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिलेला हे.

Share

See all tips >>