Why use Magnesium on cotton crop

कापसाच्या पिकाला मॅग्नेशियम का द्यावे

  • मॅग्नेशियम कापसाच्या रोपात भोजन बनवण्याच्या प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका बजावते. तो क्लोरोफिलचा महत्वपूर्ण घटक असतो. त्याशिवाय मॅग्नेशियम रोपातील वेगवेगळ्या एंझायमिक क्रियात आणि रोपात उती बनवण्यात मुख्य भूमिका बजावते.
  • कापसाच्या पिकात मॅग्नेशियमच्या अभावाची लक्षणे पेरणीनंतर 25-30 दिवसांनी रोपांच्या खालील पानांवर दिसतात. मॅग्नेशियमच्या अभावाने ग्रस्त पाने जांभळ्या लालसर रंगाची तर त्यांच्या शिरा हिरव्या दिसतात.
  • कापसाच्या पिकाला मॅग्नेशियमच्या अभावापासून वाचवण्यासाठी 10 किलोग्रॅम प्रति एकर या प्रमाणात पेरणीच्या वेळी मॅग्नेशियम मूलभूत मात्रेत मिसळून द्यावे.
  • कापसाच्या पिकातील मॅग्नेशियमच्या अभावाला दूर करण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट @ 70-80 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात आठवड्याच्या अंतराने दोन वेळा फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>