Why use Magnesium on cotton crop

कापसाच्या पिकाला मॅग्नेशियम का द्यावे

  • मॅग्नेशियम कापसाच्या रोपात भोजन बनवण्याच्या प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका बजावते. तो क्लोरोफिलचा महत्वपूर्ण घटक असतो. त्याशिवाय मॅग्नेशियम रोपातील वेगवेगळ्या एंझायमिक क्रियात आणि रोपात उती बनवण्यात मुख्य भूमिका बजावते.
  • कापसाच्या पिकात मॅग्नेशियमच्या अभावाची लक्षणे पेरणीनंतर 25-30 दिवसांनी रोपांच्या खालील पानांवर दिसतात. मॅग्नेशियमच्या अभावाने ग्रस्त पाने जांभळ्या लालसर रंगाची तर त्यांच्या शिरा हिरव्या दिसतात.
  • कापसाच्या पिकाला मॅग्नेशियमच्या अभावापासून वाचवण्यासाठी 10 किलोग्रॅम प्रति एकर या प्रमाणात पेरणीच्या वेळी मॅग्नेशियम मूलभूत मात्रेत मिसळून द्यावे.
  • कापसाच्या पिकातील मॅग्नेशियमच्या अभावाला दूर करण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट @ 70-80 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात आठवड्याच्या अंतराने दोन वेळा फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Importance of Magnesium in Plants

रोपांसाठी मॅग्नेशियमचे महत्त्व

  • मॅग्नेशियम रोपांमधील प्रकाश संश्लेषणात महत्वपूर्ण भूमिका बजावते आणि पानांना हिरवेपणा मिळवून देणारे प्रमुख तत्व आहे. मॅग्नेशियम (Mg) सर्वात महत्वपूर्ण पोषक तत्वांपैकी एक आहे. ते रोपातील अनेक एंझाइम क्रिया आणि पादप उटी बनवण्यात महत्वपूर्ण  भूमिका बजावते.
  • मातीतील मॅग्नेशियमची सामान्य मात्रा 0.5 – 40  ग्रॅम/ किलोग्रॅम असते पण सध्या बहुतेकदा मातीतील मॅग्नेशियमचे प्रमाण 3 -25  ग्रॅम/ किलोग्रॅम एवढेच आढळते.
  • मॅग्नेशियमच्या अभावाची पहिली लक्षणे जुन्या पानांवर दिसतात. पानांच्या शिरा गडद रंगाच्या आणि शिरांच्या मधील भाग पिवळट लालसर दिसतो.
  • जमिनीतील नायट्रोजनचा अभाव मॅग्नेशियमच्या अभावाला वाढवतो.
  • शेताची मशागत करताना मूलभूत मात्रेबरोबर 10 किलोग्रॅम/ एकर या प्रमाणात मॅग्नेशियम सल्फेट ( 9.5 %) मातीत मिसळावे.
  • मॅग्नेशियमच्या अभावासाठी 70-80 ग्रॅम/ एकर या प्रमाणात मॅग्नेशियम सल्फेटचे द्रावण आठवड्याच्या अंतराने दोन वेळा पानांवर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrient management in maize

मक्यासाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन

  • मक्याच्या अधिक उत्पादनासाठी उर्वरकांच्या संतुलित मात्रा वापराव्या.
  • मक्याचे पीक घेण्यापूर्वी 15-18 दिवस शेतात 8-10 टन/ एकर या प्रमाणात शेणखत मिसळावे.
  • पेरणीच्या वेळी यूरिया @ 65 किलो/ एकर + डीएपी @ 35 किलो/ एकर + एमओपी @ 35 किलो/ एकर + कार्बोफ्यूरान @ 5 किलो/ एकर या प्रमाणात मातीत मिसळावे.
  • पेरणीनंतर 15-20 दिवसांनी मॅग्नेशिय सल्फेट @ 10 किलो/ एकर + झिंक सल्फेट @ 07-10 किलो/ एकर + माईकोरायजा @ 04 किलो/ एकर या प्रमाणात द्यावे.
  • मक्याची लागवड फर्‍यात करणार असल्यास सूक्ष्म पोषक तत्वांची फवारणी फर्‍यांच्या मध्ये करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share