Nutrient Management in Wheat

गव्हाच्या पिकासाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन

गव्हाच्या पिकासाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन:- गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन खूप महत्वाचे असते. मातीत उपलब्ध पोषक तत्वांची माहिती मिळवण्यासाठी मातीची तपासणी अत्यावश्यक असते. त्याच्या आधारे पोषक तत्वांचे व्यवस्थापन केले जाते. गव्हाच्या पिकासाठी सामान्यता शिफारस केली जाणारी मात्रा पुढीलप्रमाणेअसते:

  • 6 -8  टन/ एकर या प्रमाणात दर दोन वर्षांनी उत्तम प्रतीचे शेणखत किंवा कंपोस्ट खत मातीत मिसळून द्यावे.
  • शेणखत घातल्याने मातीची संरचना सुधारते आणि उत्पादन वाढते.
  • गव्हाच्या पिकासाठी एकरी 88  कि.ग्रॅ. यूरिया, 160 कि.ग्रॅ सिंगल सुपर फॉस्फेट आणि 40 कि.ग्रॅ. म्युरेट ऑफ पोटॅश वापरावे.
  • युरियाचा वापर तीन भागात पुढीलप्रमाणे करावा:
    ) 44  कि.ग्रॅ. यूरियाची मात्रा पेरणीच्या वेळी द्यावी.

2.) 22 कि.ग्रॅ. मात्रा पहिल्या सिंचनाच्या वेळी द्यावी.

3.) उरलेली 22 कि.ग्रॅ. मात्रा दुसऱ्या सिंचनाच्या वेळी द्यावी.

  • अंशतः सिंचन उपलब्ध असल्यास जास्तीतजास्त दोन वेळा सिंचन केल्यावर यूरिया @ 175, सुपर सिंगल फॉस्फेट@ 250 आणि म्युरेट ऑफ़ पोटॅश @ 35-40 कि.ग्रॅ प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे.
  • सिंचन नसल्यास नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशची पूर्ण मात्रा द्यावी.
  • गव्हाची पेरणी डिसेंबर महिन्याच्या मध्यात करणार असल्यास नत्रजनाची मात्रा 25 टक्के कमी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>