एक साधा एक पानाचा अर्ज तयार केला गेला आहे जेणेकरून पीएम किसान अंतर्गत बँकेच्या रेकॉर्डमधून मूलभूत माहिती मिळविली जाईल आणि पेरणी केलेल्या पिकाच्या तपशीलांसह जमीन नोंदवहीची फक्त एक प्रत आवश्यक असेल.
फॉर्म संपूर्ण भारतभरातील सर्व आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीसह उपलब्ध असेल आणि तो लाभार्थी कापून भरु शकतो.
आपण सर्व अनुसूचित वाणिज्य बँकांच्या वेबसाइटवर, कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या संकेतस्थळ- www.agricoop.gov.in आणि पंतप्रधान-किसन www.pmkisan.gov.in या संकेतस्थळावरुनही हा फॉर्म डाउनलोड करू शकता.
सामान्य सेवा केंद्रांना फॉर्म भरण्यास व तो संबंधित बँकेकडे पाठविण्यास परवानगी देण्यात आली आहे.