काळे गहू ही गव्हाची एक खास प्रकार असून त्याची लागवड खास पद्धतीने केली जाते.
काळ्या गव्हामध्ये साधारण गव्हापेक्षा 60 टक्के जास्त लोह असते.
या गव्हामध्ये प्रथिने, पोषक आणि स्टार्चचे प्रमाण सामान्य गव्हाइतकेच असते.
काळ्या गव्हाची लागवड साधारणतः भारतात फारच कमी आहे.
सामान्य गव्हामध्ये एंथोसाइनिन प्रमाण 5 ते 15 पी.पी.एम. असते तर काळ्या गहूमध्ये ते 40 ते 140 पी.पी.एम. असते.
एंथ्रोसाइनीन एक नैसर्गिक एंटी ऑक्सीडेंट आणि प्रतिजैविक आहे. जो हृदयविकाराचा झटका, कर्करोग, साखर, मानसिक ताण, गुडघा दुखणे, अशक्तपणा यासारख्या आजारांमध्ये खूप प्रभावी आहे.