पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 12व्या हप्त्याची शेतकरी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. या दरम्यान कृषी मंत्रालयाने ऑफिशियल स्टेटसच्या माध्यमातून हप्ता जारी करण्याची तारीक पक्की केली आहे. या माहितीनुसार, 17 ते 18 ऑक्टोबर दरम्यान लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपयांची रक्कम पाठवली जाणार आहे. यासाठी तुम्ही तुमच्या खात्याचा स्टेटस चेक करुन याची पुष्टी करू शकता.
स्टेटस चेक करण्यासाठी आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून स्टेटस तपासण्याचा एक सोपा मार्ग सांगू जेणेकरुन तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
पीएम किसान योजनेचा स्टेटस अशा प्रकारे चेक करा?
सरकारने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी एक टोल फ्री नंबर 155261 जारी केलेला आहे. या टोल फ्री नंबरवर कॉल करून शेतकरी लाभार्थी यादीत आपले नाव, ई-केवायसीची संपूर्ण प्रक्रिया तसेच बँक खात्यात जमा केलेल्या रकमेची माहिती मिळवू शकतात. याशिवाय, पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर देखील स्टेटस ची अधिक माहिती प्राप्त करु शकतात.
केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. ही मदतीची रक्कम तीन हप्त्यांमध्ये 2-2 हजार रुपये करुन दिली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्ते जमा झाले आहेत. त्याचबरोबर शेतकरी आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.
स्रोत: एबीपी
Shareकृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.