- टरबूजच्या फळांमध्ये कधीकधी खोल सडलेले ठिपके असतात त्यामुळे त्यांची सुरकुत्यासारखी रचना तयार होते.
- हे सहसा सिंचनाच्या अयोग्य अंतरामुळे होते.
- जेव्हा शेतीची माती खूप कोरडी होते,आणि कॅल्शियम मातीतच राहते त्यामुळे झाडे उपलब्ध होत नाहीत.
- हे रोखण्यासाठी, प्रति एकर 10 किलो कॅल्शियम नायट्रेट वापरा.
Greening in Potato Tubers
बटाट्याच्या कंदातील हिरवेपणा –
- हा बटाट्यामधील शारीरिक रोग आहे. तो बटाट्याचे कंद प्रकाशाच्या संपर्कात आल्याने होतो.
- बटाट्याच्या पिकाला मातीने न झाकल्यास बटाट्याच्या कंदाचा वरील भाग सतत प्रकाशाच्या संपर्कात येत राहतो. त्यामुळे त्यात हिरवेपणा आढळू लागतो.
- बटाट्याची साठवण घरात प्रकाश असलेल्या जागी केल्यास कंदात हिरवेपणा आढळून येऊ लागतो.
- कच्च्या बटाट्यात सोलेनिन नावाचे रसायन निर्माण झाल्याने बटाट्यात हिरवेपणा येतो. त्यामुळे बटाट्याला कडवट चव येते.
खबरदारी –
- कच्चे बटाटे खाऊ नयेत.
- बटाट्याच्या पिकात कंद बनण्याची सुरुवात होताना (पेरणीनंतर 35-40 दिवसांनंतर) मातीने बटाटे झाकावेत, जेणेकरून बटाट्याचे कंद प्रकाशाच्या संपर्कात येणार नाहीत.
- बटाट्याची साठवण अंधार्या जागी करावी. साठवणीच्या जागी कोठून प्रकाश येत असल्यास ते बंद करावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareManagement of Leaf reddening in Cotton
कापसाच्या पिकावरील पाने लाल होण्याच्या रोगाचे नियंत्रण:-
- बोंडे विकसित होण्याच्या वेळी प्रतिकूल हवामानापासून बचाव करण्यासाठी सुयोग्य वेळी पेरणी करावी.
- योग्य वेळी यूरिया (1%) च्या एक-दोन फवारण्या कराव्यात.
- पेरणीच्या 40-45 दिवस आधी मॅग्नीशियम सल्फेट 10-12 किलो प्रति एकर मात्रा द्यावी.
- पाणी तुंबण्यापासून बचाव होण्यासाठी पाण्याचा निचरा होण्याची योग्य ती व्यवस्था करा.
- प्रसाराचे कारण असलेल्या रस शोषणार्या किड्यांच्या प्रतिबंधासाठी शिफारस केलेली कीटकनाशके वापरावीत.
- अतिरिक्त बोंडे लागल्यास त्याचे व्यवस्थापन करावे.
- फुले आणि बोंडांच्या विकासाच्या दरम्यान, विशेषता संकरीत वाणासाठी, पुरेशी पोषक तत्वे द्या.
- अंतर्क्रिया, निंदणी आणि शेतीची इतर कामे वेळेवर करा.
- ज्या वाणांमध्ये ही समस्या उत्पन्न होते त्यांची लागवड करू नये.
- उपलब्ध असल्यास पुरेसे सिंचन करावे.
- मातीचे आरोग्य आणि पोषकता टिकवण्यासाठी पीक चक्र आणि आंतरपिके वापरावीत.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareBulb splitting In Onion (physiological Disorder)
कांद्याचे कंद फुटणे:
कारणे:-
- कांद्याच्या शेतातील अनियमित सिंचनाने या रोगात वाढ होते.
- शेतात अतिरिक्त पाणी सोडल्यावर त्याला पुर्णपणे वाळू दिले आणि त्यानंतर पुन्हा अतिरिक्त पाणी सोडल्यास कंद फुटतात.
- रायझोफ़ायगस प्रजातीचे कोळी चिकटणे हे कंद फुटण्याचे कारण आहे.
लक्षणे:-
- कंद फुटण्याची लक्षणे आधी कंदाच्या तळात दिसतात.
- प्रभावित कंदाच्या तळात उंचवटा आल्याचे स्पष्ट आढळून येते.
नियंत्रण:-
- एकसमान सिंचन आणि उर्वरकांच्या सुयोग्य मात्रेचा वापर करून कंद फुटणे रोखता येते.
- हळूहळू विकसित होणार्या कांद्याच्या वाणांचा वापर करून या विकाराचे नियंत्रण करता येते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareBolting in Onion (Physiological disorder)
कांद्याला फुलोरा येणे (बोल्टिंग) (क्रियात्मक विकार)
कारणे:-
- वेगवेगळ्या वानांच्या आनुवांशिक विविधतेमुळे.
- तापमानात मोठे चढ उतार झाल्याने.
- बियाण्याची गुणवत्ता कमी असल्याने.
- नर्सरी बेडवर रोपांचा विकास खुंटल्याने.
- सुरूवातीला खूप कमी तापमान असल्यास फुलांचा विकास होतो.
लक्षणे:-
- रोपे पाच पाने फुटल्याच्या अवस्थेत असताना ही अवस्था येते.
- यात अचानक कांद्याच्या शिरावर कंदाच्याऐवजी गाभा तयार होतो.
- या अवस्थेत कंद हलके आणि तंतुमय होतात.
नियंत्रण:-
- वाणाची पेरणी सुयोग्य वेळी करावी.
- उर्वरकांचा अतिरिक्त वापर करू नये.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share