शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने सरकारकडून अनेक योजना चालवल्या जात आहेत. आता या स्थितीमध्ये हरियाणा सरकारनेही एक नवीन योजना आणली आहे. या योजनेचा केवळ शेतकऱ्यांनाच फायदा होणार नाही तर पर्यावरण देखील चांगले राहील.
हरियाणा सरकारने प्राण वायू देवता नावाचा एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे.ही एक पेन्शन योजना आहे ज्याअंतर्गत सरकार 75 वर्षांपेक्षा जुन्या झाडांना पेन्शन देईल अशा झाडांची काळजी घेणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेद्वारे दरवर्षी 2500 रुपये पेन्शन दिली जाईल.
या योजनेद्वारे शेतकरी आणि भूमिहीन मजुरांना मोठा फायदा होईल आणि झाडे तोडणेही थांबवले जाईल. त्याचबरोबर ही योजना पर्यावरणाचे रक्षण करेल आणि त्यामुळे हवाही स्वच्छ राहील.
स्रोत: आज तक
Shareकृषी आणि शेतकऱ्यांशी संबंधित फायदेशीर सरकारी योजनांशी संबंधित माहितीसाठी, ग्रामोफोनचे लेख दररोज वाचा आणि हा लेख खाली दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.