देशातील आघाडीवर असलेली कृषी क्षेत्रातील कंपनी गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड आणि शेतकर्यांची खरी संस्था ग्रामोफोन यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्यासाठी एक नवीन भागीदारी सुरु केली आहे. या भागीदारीमुळे दोन्ही कंपन्या शेतीची उत्पादकता वाढवून शेतकऱ्यांना समृद्ध बनविण्याचे त्यांचे सामायिक उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने कार्य करतील.
कृषी आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानातील तज्ञतेसह, ग्रामोफोन कंपनी आपले टेक प्लॅटफॉर्म ग्रामोफोन अॅपद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकली आहे. गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड आता ग्रामोफोनबरोबर भागीदारी स्थापित करेल जेणेकरुन, शेतकऱ्यांना उच्च प्रतीच्या उत्पादनांचे सहज वितरण करता येईल यामुळे शेतकर्यांना बराच फायदा होईल आणि ही उत्पादने खरेदी करण्यासाठी त्यांना फक्त कॉल किंवा अॅपवरती क्लिक करावे लागेल.
Share