Weed management in Onion

कांद्यातील तणवाढीचे नियंत्रण करण्यासाठी पुनर्रोपणीनंतर 3 दिवसांनी पेंडिमेथालीन @ 100 मिली. / 15 लीटर पाणी किंवा ऑक्सिफ्लोरफेन 23.5% EC @ 15 मिली. / 15 लीटर पाणी वापरण्याची शिफारस केली जाते. त्याचबरोबर खरीप पिकच्या पुनर्रोपणीनंतर 25-30 दिवसांनी आणि रब्बी पिकाच्या पुनर्रोपणीनंतर 40-45 दिवसांनंतर हाताने निंदणी करून तण  काढावे. रब्बीच्या मोसमात तांदळाचा भुस्सा, गवत किंवा गव्हाची टरफले वापरुन मल्चिंग करण्याने उत्पादन वाढते अशी शिफारस करण्यात येते. ऑक्सिफ्लोरफेन 23.5% EC 1 मिलीलीटर / ली.पाणी + क्विजलॉफॉप एथाइल 5% ईसी @ 2 मिलीलीटर / लीटर पाणी हे मिश्रण पुनर्रोपणीनंतर 20-25 दिवसांत आणि त्यानंतर 30-35 दिवसांनी फवारल्यास तणावर अधिक चांगले नियंत्रण होते आणि उत्पादन वाढते.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

See all tips >>