हरभर्यावरील मर आणि पानगळीचा रोग फ्युजॅरियम ऑक्सिस्पोरम जिवाणुंमुळे होतो. उष्ण आणि दमट वातावरण त्यांच्यासाठी पोषक असते. या रोगापासून बचाव करण्यासाठी पुढील खबरदारीचे उपाय योजावेत:
- सहा वर्षाच्या उत्पादनाचे चक्र अवलंबावे.
- पावसाळ्यातील शेतातील ओल टिकवावी.
- खोल नांगरणी (6-7 इंच) करून शेत समपातळीत आणावे.
- रोगमुक्त बियाणे वापरावे.
- रोगप्रतिकारक जाती लावाव्यात.
- एक किलो बियाण्यासाठी 3 ग्रॅम या प्रमाणात कार्बेन्डाजिम वापरुन बीजसंस्करण करावे.
- तापमान अधिक असताना (उष्ण वातावरणात पेरणी करू नये. ऑक्टोबरच्या दुसर्या आणि तिसर्या आठवड्यात पेरणी करावी.
- नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाणी द्यावे.
Share