Late blight of tomato

टोमॅटोच्या पिकाचा उशिराच्या अवस्थेतील करपा (लेट ब्लाइट)

  • जुन्या पानांच्या खालील पृष्ठभागावर धूसर हिरव्या रंगाचे पाणचट डाग पडणे हे करप्याचे सुरुवातीचे लक्षण आढळून येते.
  • रोग वाढत जातो तसतसे डाग काळे पडतात आणि त्यांच्यात पांढरी बुरशी वाढते. शेवटी पूर्ण रोप संक्रमित होते.
  • या रोगामुळे पिकाचे भारी नुकसान होते. हा रोग शेतात झपाट्याने फैलावतो. वेळीच उपचार न केल्यास संपूर्ण पीक नष्ट होऊ शकते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Treatment of Calcium deficiency in tomato Field

टोमॅटोच्या शेतातील कॅल्शियमच्या अभावाचे उपचार

  • रोपणापूर्वी 15 दिवस आधी मुख्य शेतात उत्तम प्रतीचे शेणखत वापरावे.
  • बचावासाठी रोपणापूर्वी कॅल्शियम नायट्रेट @ 10 किलो/ एकर या प्रमाणात मातीत मिसळावे किंवा
  • अभावाची लक्षणे आढळून येताच कॅल्शियम EDTA @ 150 ग्रॅम/ एकर या प्रमाणात दोन वेळा शिंपडावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Calcium deficiency Symptoms in Tomato plant

टोमॅटोच्या शेतातील कॅल्शियमच्या अभावाची लक्षणे

  • रोपांमधील उतींमध्ये कॅल्शियमच्या अभावाची लक्षणे मुख्याता झपाट्याने रोपांच्या वाढणार्‍या भागांमध्ये आढळतात.
  • कॅल्शियमचा अभाव असलेली पाने पिवळी पडतात आणि सुकू लागतात. ही लक्षणे पानांना आधार देणार्‍य भागात दिसतात.
  • रोपांच्या खोडांवर सुकलेले मृत डाग दिसू लागतात आणि वाढणारा वरील भाग मरतो.
  • सुरूवातीला वरील बाजूच्या पानांचा रंग गडद हिरवा असतं. नंतर त्यांच्या कडा पिवळ्या पडू लागतात आणि शेवटी रोप मरते.
  • रोपांमध्ये फळांवर कॅल्शियमच्या अभावामुळे फळ कुजीची लक्षणे आढळून येतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of late blight of tomato

टोमॅटोच्या पिकावरील उशीराच्या अवस्थेतील करपा रोगाचे नियंत्रण

  • कापणीनंतर पिकाचे अवशेष नष्ट करावेत.
  • शेतात पाणी तुंबू देऊ नये.
  • रोग नियंत्रणासाठी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करावी.
  • मेटलॅक्सिल 8% + मॅन्कोझेव 64% @ 500 ग्रॅम/ एकर किंवा
  • कसुगामायसिन 5% + कॉपर ऑक्सीक्लोराइड 45% WP @ 300 ग्रॅम/ एकर किंवा
  • पायरोस्टॉकलोबिन 5% + मेटीराम 55% @ 600 ग्रॅम/ एकर किंवा
  • डाइमेथोमॉर्फ 50% डब्लू पी @ 400 ग्रॅम/ एकर वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Late blight of tomato

टोमॅटोच्या पिकावरील उशीराच्या अवस्थेतील करपा रोग

  • उशीराच्या अवस्थेतील करपा रोगाची लक्षणे जुन्या पानांच्या खालील बाजूवरील पाण्याने भरलेल्या फिकट हिरव्या रंगाच्या डागांच्या स्वरुपात दिसतात.
  • रोग वाढत जाईल तसतसे हे डाग काळे पडतात आणि त्यात पांढर्‍या बुरशीची वाढ होते आणि शेवटी संपूर्ण रोप संक्रमित होते.
  • या रोगामुळे पिकांचे भारी नुकसान होऊ शकते. हा रोग शेतभर वेगाने पसरतो. वेळीच उपचार न केल्यास पूर्ण पीक नष्ट होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Weed Control in Tomato Crop

टोमॅटोच्या पिकातील तणाचे नियंत्रण:-

  • सुरुवातीच्या अवस्थेत रोपांच्या चांगल्या वाढीसाठी 2-3 वेळा निंदणी-खुरपणी करणे आवश्यक असते.
  • तणाच्या नियंत्रणासाठी अंकुरणीपूर्वी तणनाशक पेन्डामेथिलिन 30% SC @ 700 मिली प्रति एकरच्या मात्रेने फवारणी करून पेरणीनंतर 45 दिवसांनी हाताने निंदणी करावी.
  • तण नियंत्रण करण्यासाठी पेरणीनंतर 15 दिवसांनी मॅट्रिब्यूझिन 70% WP @ 300 ग्रॅम प्रति एकरच्या मात्रेची फवारणी करावी.
  • संपूर्ण नियंत्रण करण्यासाठी पॅरा, लाकडाचा भुस्सा आणि काले पॉलीथीन अशा मल्चचा वापर केला जातो. मल्च जमिनीतील ओलीचे संरक्षण देखील करते आणि उत्पादन आणि गुणवत्ता वाढवते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to Control Root-Knot Nematode in Tomato

  • प्रतिरोधक वाण वापरा.
  • मूल गांठ सूत्रकृमि नियंत्रित करण्यासाठी उन्हाळ्यात खोल नांगरणीचा वापर करा.
  • प्रभावी नियंत्रणासाठी ८० किलो / एकर दराने निंबोळी केक वापरावी.
  • मातीचे उपचार म्हणून 8 किलो/एकर दराने कार्बोफुरान 3जी वापरावे.
  • पेसिलोमाइसेस लिलासिनास -1% डब्ल्यूपी @ १० ग्राम/ किलो बियाणे उपचारासाठी, ५० ग्राम/ मीटर वर्ग नर्सरी उपचारासाठी, २.५ ते ५ कि.ग्रा./ हेक्टर माती वर वापरण्यासाठी.

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन लाईक करा आणि इतर शेतकरी बरोबर सामायिक करा

Share

Root-Knot Nematode in Tomato

नुकसान: –

  • सूत्रकृमि मुळांवर आक्रमण करते आणि लहान गांठ तयार करते.
  • संक्रमित झाडे पाने कोमजणे आणि निस्तेज होणे चे लक्षणे दर्शवितात.
  • ह्याचा मुळे वनस्पती प्रणाली मध्ये पोषक तत्वांची आणि पाण्याची हालचाल अवरुद्ध होते आणि झाड निस्तेज होतात आणि शेवटी मरून जातो.
  • फळ उत्पादन क्षमता वर विपरित परिणाम झाल्यामुळे झाडांची वाढ अवरुद्ध होते.
  • झाडाची पाने पिवळी पडतात आणि वरचे पान निस्तेज होतात.

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन लाईक करा आणि इतर शेतकरी बरोबर सामायिक करा

Share

Symptoms of Fusarium wilt

  • कारक जीव- फ्यूझेरियम ऑक्सिस्पोरम एफ.एस.पी. वासइन्फेक्टम
  • विल्ट हा कापसाचा एक मुख्य आजार आहे.
  • पानांचे रंग बदलणे काठा पासून सुरू होते आणि मध्यशिराच्या दिशेने पसरते.
  • नसा अधिक गडद, अरुंद आणि डागदार होतात.
  • रक्तवहिन्यासंबंधी ऊतक तपकीरी आणि काळे होणे.

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन लाईक करा आणि इतर शेतकरी बरोबर सामायिक करा

Share

Control of White fly in Tomato

टोमॅटोमध्ये श्वेत माशीचे नियंत्रण: –

  • झाडाचा भावडा शोषून घेतात
  • कुरळे रोग संक्रमित करतात.
  • प्रभावित पाने वाळक्या होतात आणि हळूहळू वळतात.

नियंत्रण

  • पिकाच्या सुरुवातीच्या काळात डायमेथोएट 30% ईसी @ 300 मिली / एकर फवारणी करा.
  • नर्सरीमध्ये पांढर्‍या माशीचे प्रवेश टाळण्यासाठी 100 जाळी नायलॉन नेट वापरा.

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन लाईक करा आणि इतर शेतकरी बरोबर सामायिक करा

Share