Girdle beetle in Soybean

सोयाबीनवरील मेखला कीड (गर्डल बीटल):- या किडीला रिंग कटर असेही म्हणतात. या किडीचा सोयाबीनच्या उत्पादनावर सर्वात जास्त परिणाम होतो.

हानीची लक्षणे:-

  • खोडाला आतून लार्वा खातो आणि त्यात भोक पडते.
  • संक्रमित भागातील रोपाच्या पानांना पोषक तत्वे मिळत नाहीत आणि ती वाळतात.
  • नंतर रोपजमिनीपासून सुमारे 15 ते 25 सेमी अंतरावर तुटते.

नियंत्रण:-

  • उन्हाळ्यात शेतात खोल नांगरणी करावी.
  • मका किंवा ज्वारीबरोबर सोयाबीन लावू नये.
  • पीक चक्राचा वापर करावा.
  • अतिरिक्त नायट्रोजन उर्वरकांपासून सावध रहावे.
  • 10 दिवसातून किमान एक वेळा रोपाच्या रोपग्रस्त भागांना काढून टाकावे आणि त्यांना खताच्या खड्ड्यात गाडावे.

प्रतिबंध:-

  • पेरणीच्या वेळी फोरेट 10 G @ 10 किलो / हेक्टर किंवा कार्बोफूरॉन 3 G @ 30 किलोग्रॅम/ हेक्टर घालावे.
  • क्विनालफॉस 25% EC किंवा ट्रायजोफॉस 40% EC @ 3 मिली / लीटर पाण्याची फवारणी पीक 30-35 दिवसांची असताना करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Today’s Crop Photo

आजच्या पिकाचा फोटो

नाव:- दिनेश जी

गाव:- बिरगोदा

तहसील:- देपालपुर

जिल्हा:- इंदौर

समस्या:- सोयाबीनच्या पिकातील मूळ कुजव्या रोग

नियंत्रण:- मूळ कुजव्या रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाजिम 12% + मॅन्कोझेब 63% किंवा थायोफिनेट मिथाईल @ 50 ग्रॅम फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Yellow Mosaic Virus in Legumes crops

द्विदल धान्यांच्या पिकावरील केवडा रोग (पिवळा मोझेक व्हायरस)

केवडा रोग (पिवळा मोझेक व्हायरस):- केवडा रोगाचा (पिवळा मोझेक व्हायरस)  उपद्रव मुख्यत्वे खरीपाच्या हंगामात सोयाबीन, उडीद, मूग आणि इतर काही पिकांमध्ये होतो. सोयाबीन, उडीद इत्यादि पिकांची केवडा रोगामुळे मोठी हानी होते. त्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. हा रोग 4-5 दिवसात शेतात सर्वत्र पसरतो आणि पीक पिवळे पडू लागते. या रोगाच्या प्रसारात पांढर्‍या माशीचा महत्वाचा सहभाग असतो.

रोग पसरण्याची मुख्य कारणे:-

  • रस शोषणारी कीड आणि पांढरी माशी या विषाणुजन्य रोगाचा प्रसार करते.
  • योग्य ते बीजसंस्करण न करणे, माहितीचा अभाव आणि दीर्घकाळ पडलेला दुष्काळ हे घटक देखील विषाणूच्या प्रसारास जबाबदार असतात.
  • कीटकनाशकांचा अतिवापर, योग्य माहिती नसताना औषधांचे मिश्रण फवारणे.
  • योग्य ते पीक चक्र स्वीकारण्यातील शेतकर्‍यांचे अपयश याचे मुख्य कारण असते.
  • शेताभोवतीच्या बांधांची साफसफाई न करण्याने देखील रोगाचा फैलाव होतो.
  • पांढरी माशी रोपच्या पानावर बसून रस शोषते आणि तेथेच लाळ गाळते. त्यामुळे रोगाचा प्रसार वाढतो.

रोगाची लक्षणे:-

  • सुरुवातीच्या काळात गडद पिवळे दाग दिसू लागतात.
  • रोगग्रस्त रोपांची पाने पिवळी पडतात.
  • रोगग्रस्त रोपांच्या पानांमधील शिरा स्पष्ट दिसू लागतात.
  • रोपांची पाने खरखरीत होतात.
  • ग्रस्त रोप खुरटते.

प्रतिबंधाचे उपाय :-

यांत्रिक पद्धती:-

  • सुरुवातीलाच ओगग्रस्त रोपांना उपटून जाळून टाकावे.
  • शेतातील पांढर्‍या माशीला आकर्षित करण्यासाठी प्रत्येक हेक्टरात 5-6 पिवळ्या रंगाचे चिकट सापळे लावावेत.
  • पिकाच्या चहुबाजूला झेंडूची लागवड करून सापळा रचावा.

जैविक पद्धत:-

  • सुरुवात होताच रोपांवर  प्रत्येक हेक्टरसाठी 1-1.5 ली.निंबोणीचे तेल+चिकट पदार्थ+200-250 ली. पाण्याच्या मिश्रणाच्या मात्रेची फवारणी करावी.
  • 2 किलो शेवग्याची पाने बारीक वाटून 5 ली. गोमूत्र आणि 5 ली. पाण्यात मिसळून ठेवावे. 5 दिवसांनी हे मिश्रण गाळून घ्यावे. 500 मिलीलीटर मिश्रण 15 लीटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे. हे पिकासाठी टॉनिक म्हणून कार्य करते.

रासायनिक पद्धत:-

  • डायमिथिएट  250-300 मिलीलीटर  किंवा थायोमेथाक्सोम 25WP 40 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 SL 40 मिलीलीटर किंवा अ‍ॅसिटामाप्रीड 40 ग्रॅम प्रति एकर 200-250 लीटर पाण्यात मिसळून फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Weed Management in Soybean

सोयाबीनच्या पिकातील तणावर नियंत्रण

  1. यांत्रिक पद्धत (कामगारांकडून निंदणी आणि कुदळणी):- सोयाबीनमध्ये 20-25 दिवसांनी आणि 40 -45 दिवसांनी अशी दोन वेळा निंदणी करणे आवश्यक असते. शक्यतो पेरणीनंतर 30 दिवसांनी कुदळणी करावी. कुदळणी करताना रोपांच्या मुळांना हानी होणार नाही अशी खबरदारी घ्यावी.
  2. तणनाशक रसायनांचा वापर:- शिफारस केलेल्या तणनाशकाचे 700 -800 लीटर पाण्यात मिश्रण करून त्याची फवारणी करावी. त्यासाठी फवारणी यंत्रात फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल लावून त्याचा उपयोग करावा. फवारणी ओलसर जमिनीवरच करावी. सोयाबीनच्या पिकासाठी शिफारस केलेल्या तणनाशकापैकी एखाद्याचाच वापर करावा आणि दरवर्षी रसायन बदलून वापरावे.

सोयाबीनच्या पिकासाठी शिफारस करण्यात आलेली तणनाशके

वापरासाठी योग्य वेळ रासायनिक नाव मात्रा/ हे
पेरणीपुरवी 1 फ्लुक्लोरालीन 2.2 लीटर
2 ट्राईफ्लुरालीन 2.0 लीटर
पेरणीनंतर लगेचच 1 मेटालोक्लोर 2 लीटर
2 क्लोमाझोन 2 लीटर
3 पेंडीमेथालीन 3.25 लीटर
4 डाक्लोरोसुलन 26 ग्रॅम
पेरणीनंतर 10-15 दिवसांनी 1 क्लोरोम्युरान इथाइल 36 ग्रॅम
पेरणीनंतर 15-20 दिवसांनी 1 इमेझेथापर 1 लीटर
2 क्बिज़ेलोफाप इथाइल 1 लीटर
3 फेनाक्सीफ्रोप इथाइल 0.75 लीटर
4 प्रोपाक्विजाफोप 0.75 लीटर

source:- https://iisrindore.icar.gov.in/

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Soybean Seed Treatment

सोयाबीनचे बीजसंस्करण:- सोयाबीनच्या पेरणीपुरवी कार्बाक्सिन 37.5% + थायरम 37.5 WP 250 ग्रॅम प्रति क्विंटल मात्रा वापरुन बिजसंस्करण करावे किंवा सोयाबीनचे बीजसंस्करण करण्यासाठी कार्बेन्डाझिम 12 % + मॅन्कोझेब 63% WP 250 ग्रॅम प्रति क्विंटल ही किंवा थायोफिनेट मिथाईल 45% + पायराक्लोस्ट्रोबीन 5% FS 200 मिली प्रति क्विंटल ही मात्रा वापरावी. त्यानंतर कीटकनाशक ईमिडाक्लोरप्रिड 30.5% SC 100 मिली प्रति क्विंटल किंवा थायमेथोक्साम 30% FS 250 मिली प्रति क्विंटलने सोयाबीनचे बीजसंस्करण केल्यास रस शोषक किडिपासून 30 दिवसांपर्यंत संरक्षण होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Seed rate, sowing time and sowing method of Soybean

सोयाबीनच्या बियाण्याचे प्रमाण, पेरणीसाठी योग्य वेळ आणि पेरणीची पद्धत:-

बियाण्याचे प्रमाण:- वेगवेगळ्या वाणाच्या बियाण्याच्या आकारानुसार सामान्य अंकुरण क्षमता असलेल्या पुढील बियाण्याचा खालील प्रमाणात वापर करावा:- (1) लहान दाणे असलेली वाणे – 28 किलो प्रति एकर (2) मध्यम दाणे असलेली वाणे – 30 ते 32 किलो प्रति एकर (3) मोठे दाणे असलेली वाणे– 36 किलो प्रति एकर. |

पेरणीसाठी योग्य वेळ:- 20 जून ते जुलै महिन्याचा पहिला आठवडा हा कालावधी पेरणीसाठी उचित काळ असतो. सुमारे 3-4 इंच पाऊस झालेला असताना पेरणी सुरू करावी. उशिरा पेरणी करावी लागल्यास बियाण्याचे प्रमाण सव्वा पट वाढवावे आणि दोन ओळींमधील अंतर 30 सेमी. ठेवावे. उशिरा पेरणी केल्यास लवकर तयाऱ होणार्‍या जातीची लागवड करावी.

पेरणीची पद्धत:- सोयाबीनची पेरणी ओळींमध्ये करावी. बियाण्याला दोन ओळीत 45 से.मी. अंतर सोडून 3-5 सेमी. खोलीवर पेरावे. पेरणीसाठी सीडड्रिल आणि फ़र्टिलाइज़र वापरल्याने खत खाली आणि बियाणे वर असे खत आणि बियाण्याचे वेगवेगळे रोपण करता येते. बियाणे आणि उर्वरक यांचा पेरणी करताना एकत्र वापर करू नये.

स्रोत:- https://iisrindore.icar.gov.in/

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Improved Varieties of Soybean and their selection

सोयाबीनची प्रगत वाणे आणि त्यांची निवड

सोयाबीनची प्रगत वाणे:- वाणांची निवड मातीचा प्रकार आणि हवामानानुसार करावी. हलक्या जमिनीत आणि पावसावर अवलंबून असलेल्या भागात जेथे सरासरी पर्जन्यमान 600 ते 750 मि.मी. आहे तेथे लवकर (90-95 दिवसात) तयार होणारी वाणे वापरावीत. मध्यम लोमी जमिनीत जेथे सरासरी पर्जन्यमान 750 ते 1000 मिमी. असेल त्या भागात मध्यम अवधीत तयाऱ होणारी (100 ते 105 दिवसात) वाणे वापरावीत. 1250 मिमी. हून अधिक पर्जन्यमान असलेल्या भागातील भारी जमिनीत उशिरा तयार होणारी वाणे वापरावीत. बियाण्याची अंकुरण क्षमता 70 टक्क्यांहून अधिक आहे याकडे विशेष लक्ष द्यावे. भरघोस पिकासाठी 40 रोपे प्रति वर्ग मीटर या प्रमाणात पेरणी करावी. प्रमाणित बियाणेच निवडावे.

मध्य प्रदेशसाठी उपयुक्त सोयाबीनची प्रगत वाणे:-

क्र. जातीचे नाव कालावधी दिवसात हेक्टरी उत्पादन
1. JS-9560 82-88 18-20
2. JS-9305 90-95 20-25
3. NRC-7 90-99 25-35
4. NRC-37 99-105 30-40
5. JS-335 98-102 25-30
6. JS-9752 95-100 20-25
7. JS-2029 93-96 22-24
8. RVS-2001-4 92-95 20-25
9. JS-2069 93-98 22-27
10. JS-2034 86-88 20-25

स्रोत:-https://iisrindore.icar.gov.in/

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Manure and fertilizer dose for Soybean

सोयाबीनच्या पिकासाठी खते आणि उर्वरकांची मूलभूत मात्रा:-

सोयाबीन हे द्विदल गळीपाचे पीक आहे. त्याला कमी नायट्रोजन लागते. नायट्रोजन अधिक दिल्यास अफलनाची समस्या येऊ शकते. त्यामुळे त्यासाठी पोशाक तत्वांच्या व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यावे लागते.

  • खते आणि उर्वरकांची मात्रा मृदा परीक्षण अहवाल, स्थान आणि वाणानुसार बदलू शकते.
  • शेवटच्या नांगरणीच्या वेळी उत्तम प्रतीच्या शेणखताची 10 टन प्रति एकर मात्रा द्यावी.
  • सोयाबीन अनुसंधान केंद्राद्वारे शिफारस केलेली मात्रा नायट्रोजन : फॉस्फरस : पोटाश : सल्फर  अनुक्रमे 20 : 60 : 20 : 20 किलो प्रति हे. अशी आहे. त्यानुसार सुमारे 50 किलो डीएपी प्रति एकर,10 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 30 किलो पोटाशची मूलभूत मात्रा द्यावी आणि पेरणीनंतर 15 दिवसांनी 8 किलो प्रति एकर अशी सल्फर 90% WDG आणि 4 किलो प्रति एकर अशी माईकोरायझाची (जैव-उर्वरक) मात्रा द्यावी.
  • पेरणीच्या वेळी रायझोबियम कल्चर 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि पीएसबी कल्चर 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे वापरुन बीजसंस्करण करणे लाभदायक असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Field preparation for Soybean

सोयाबीनच्या पिकासाठी शेताची मशागत:-

  • शेतात 3-4 वेळा नांगरणी करून मातीला भुसभुशीत करावे. दोन नांगरणींच्या मध्ये पुरेसे अंतर ठेवावे.
  • शेताची मशागत करताना 15-20 टन प्रति हेक्टर शेणखत किंवा कम्पोस्ट खत वापरावे.
  • निंबोणीची पेंड आणि कोंबडीखत वापरल्याने रोपांची वाढ, गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ होते तसेच उर्वरकांच्या मात्रेला कमी करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

For better flowering in soybean

सोयाबीनच्या फुलांची संख्या वाढण्यासाठी, फुले आणि कळ्या अधिक येण्यासाठी आणि फुलांची गळती नियंत्रित करण्यासाठी सोयाबीन फुलोर्‍याच्या अवस्थेत असताना  जिब्रालिक अॅसिड @ 50 पीपी[एम फवारणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share