Manure and fertilizer dose for Soybean

सोयाबीनच्या पिकासाठी खते आणि उर्वरकांची मूलभूत मात्रा:-

सोयाबीन हे द्विदल गळीपाचे पीक आहे. त्याला कमी नायट्रोजन लागते. नायट्रोजन अधिक दिल्यास अफलनाची समस्या येऊ शकते. त्यामुळे त्यासाठी पोशाक तत्वांच्या व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यावे लागते.

  • खते आणि उर्वरकांची मात्रा मृदा परीक्षण अहवाल, स्थान आणि वाणानुसार बदलू शकते.
  • शेवटच्या नांगरणीच्या वेळी उत्तम प्रतीच्या शेणखताची 10 टन प्रति एकर मात्रा द्यावी.
  • सोयाबीन अनुसंधान केंद्राद्वारे शिफारस केलेली मात्रा नायट्रोजन : फॉस्फरस : पोटाश : सल्फर  अनुक्रमे 20 : 60 : 20 : 20 किलो प्रति हे. अशी आहे. त्यानुसार सुमारे 50 किलो डीएपी प्रति एकर,10 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 30 किलो पोटाशची मूलभूत मात्रा द्यावी आणि पेरणीनंतर 15 दिवसांनी 8 किलो प्रति एकर अशी सल्फर 90% WDG आणि 4 किलो प्रति एकर अशी माईकोरायझाची (जैव-उर्वरक) मात्रा द्यावी.
  • पेरणीच्या वेळी रायझोबियम कल्चर 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि पीएसबी कल्चर 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे वापरुन बीजसंस्करण करणे लाभदायक असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>