Nutrient Management in Okra Crop

भेंडीच्या पिकामधील पोषक तत्वांचे व्यवस्थापन:-

  • 15 से 20 टन/हे. उत्तम प्रतीचे शेणखत, 80 कि.ग्रॅ. नत्र (200 किलो यूरिया), 60 कि. ग्रॅ. फॉस्फरस (400 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 60 कि.ग्रॅ.  पोटाश (100 किलो म्यूरेट ऑफ़ पोटाश ) प्रति हेक्टर या प्रमाणात मात्रा द्याव्यात.
  • शेणखत, फॉस्फरस आणि पोटाशची संपूर्ण मात्रा तसेच नायट्रोजनची एक तृतीयांश मात्रा शेताची अंतिम मशागत करताना मातीत चांगल्या प्रकारे मिसळावे.
  • बियाणे पेरल्यावर 20 दिवसांनी नायट्रोजनची एक तृतीयांश मात्र द्यावी आणि उरलेली एक तृतीयांश मात्र पेरणीनंतर 40 दिवसांनी ओळीत पेरून द्यावी.
  • संकरीत वाणांसाठी सुयोग्य मात्रा -150 कि. ग्रॅ. नायट्रोजन (300 किलो यूरिया), 120 कि. ग्रॅ. फॉस्फरस( 800 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 75 कि. ग्रॅ. पोटाश (100 किलो म्यूरेट ऑफ़ पोटाश) प्रति/हेक्टर अशी आहे.
  • यापैकी 30% नत्र, 50% स्फूर आणि पोटाशची मात्रा मूळ खताच्या स्वरुपात द्यावी.
  • उरलेल्यापैकी 50% फॉस्फरस, 40% नायट्रोजन आणि 25% पोटाशची मात्रा पेरणीनंतर 28 दिवसांनी आणि त्यानंतर उरलेली मात्रा पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to increase flowers in Okra

भेंडीतील फुलोर्‍याच्या वाढीसाठी उपाय

  • भेंडीच्या पिकात फुलोरा येण्याची अवस्था खूप महत्वपूर्ण असते.
  • पेरणीनंतर 40-45 दिवसांनी भेंडीच्या पिकाची फुलोरा येण्याची अवस्था सुरू होते.
  • खालीलपैकी काही उत्पादने वापरुन भेंडीच्या फुलोर्‍यात वाढ करता येते:

होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 मिली/ एकर या प्रमाणात फवारावे

समुद्री शेवळाचे सत्व 180-200 मिली/ एकर या प्रमाणात वापरावे

सूक्ष्म पोषक तत्वे 300 ग्रॅम/ एकर या प्रमाणात फवारावी

2 ग्रॅम/ एकर जिब्रेलिक अ‍ॅसिड देखील फवारू शकता

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrient Management in Okra Crop

भेंडीतील पोषक तत्वांचे व्यवस्थापन

  • उर्वरकांची मात्रा शेतात आणि पिकात उपलब्ध जैविक पदार्थांच्या उर्वरता आणि मात्रेवर अवलंबून असते. शेताची मशागत करताना सुमारे 20-25 टन/ हेक्टर एफवायएम मिसळावे.
  • 15 ते 20 टन/हे. शेणखत, 80 कि.ग्रॅ. नायट्रोजन (200 किलो यूरिया), 60 कि.ग्रॅ. फॉस्फरस (400 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 60 कि.ग्रॅ. पोटाश (100 किलो म्यूरेट ऑफ़ पोटाश ) प्रति हेक्टर द्यावे.
  • शेणखत, फॉस्फरस आणि पोटाशची संपूर्ण मात्रा आणि नायट्रोजनची एक तृतीयांश मात्रा शेतातील शेवटची नांगरणी करताना द्यावी.
  • नायट्रोजनची एक तृतीयांश मात्र बियाणे पेरल्यावर 20 दिवसांनी आणि उठलेली एक तृतीयांश मात्र एरनिंनंतर 40 दिवसांनी ओळींमध्ये द्यावी.
  • संकरीत वाणांसाठी अनुमोदित मात्रा -150 कि.ग्रॅ. नायट्रोजन (300 किलो यूरिया), 120 कि.ग्रॅ. फॉस्फरस( 800 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 75 कि.ग्रॅ पोटाश (100 किलो म्यूरेट ऑफ़ पोटाश) प्रति/ हेक्टर आहे.
  • यातील 30% नत्र, 50% स्फूरद आणि पोटाशची मात्रा मूलभूत खताच्या स्वरुपात द्यावी.
  • 50% फॉस्फरस, 40% नायट्रोजन आणि 25% पोटाशची मात्रा पेरणीनंतर 28 दिवसांनी आणि उरलेली मात्रा पेरणीनंतर 30 दिवसांनी मातीत मिसळावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Insects Management in Okra

भेंडीच्या पिकतील किडीचे नियंत्रण

अंकुर आणि फळे पोखरणारी कीड:-

  • 13 ते 15 मिमी लांब वाढ झालेले किडे मध्यम आकाराचे पतंग असात. त्यांचे डोके आणि थोरैक्स पांढर्‍या रंगाचे असते.
  • नियंत्रण: – संक्रमित फळे नियमितपणे तोडून नष्ट करावीत.
  • कार्बोसल्फान 25% EC @ 400 मिली/ एकर किंवा बायफेंथ्रीन 10% EC @ 400 मिली/ एकर किंवा मेथोमाइल 40% SP @ 400 ग्रॅम/ एकय या प्रमाणात फवारावे.

श्वेत माशी:-

  • शिशु आणि वाढ झालेले किडे अंडाकार हिरवट पांढर्‍या रंगाचे असतात.
  • वाढ झालेले किडे सुमारे 1 मि.ली. लांब असतात आणि त्यांच्या शरीरावर पांढरे मेणचट आवरण असते.
  • नियंत्रण: – अॅसफेट 50% + इमिडाक्लोप्रिड 1.8% SP @ 200 ग्रॅम/ एकर फवारावे.
  • अॅसिटामिप्रिड 20% SP @ 100 -150 ग्रॅम/ एकर किंवा
  • थियामेथोक्साम 25% WG @ 80 ग्रॅम/ एकर

लाल कोळी:-

  • लाल कोळी पानांच्या खालील बाजूच्या पृष्ठभागावर वसाहत बनवतात.
  • लाल कोळ्याचे शिशु आणि वाढ झालेले किडे रोपातून रस शोषतात त्यामुळे पानांवर पांढरे डाग पडतात.
  • लाल कोळ्यांच्या नियंत्रणासाठी प्रॉपरगाइट 57% EC @ 400 मिली/ एकर फवारावे.
  • स्पिरोमॅन्सिफेन 22.95% w/w @ 300 मिली/ एकर किंवा
  • अॅबामॅक्टिन 1.8% EC  @ 60-100 मिली/ एकर

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to get more fruits with every picking in okra

प्रत्येक तोडणीत रोपावरून जास्त भेंडी कशी मिळवावी

  • भेंडीच्या पिकात जास्त तोडणी मिळवण्यासाठी पेरणीपुर्वी 2 आठवडे शेतात शेणखत 10 टन/ एकर या प्रमाणात एकसमान स्वरुपात मिसळावे. त्यामुळे रोपांची पोषक तत्वे ग्रहण करण्याची क्षमता वाढते.
  • पेरणीच्या वेळी उर्वरकांबरोबर नायट्रोजन स्थिरीकरण आणि फॉस्फरस विरघळवणार्‍या जिवाणूची मात्रा 2 किलो/ एकर या प्रमाणात शेतात चांगल्या प्रकारे मिसळावी.
  • नायट्रोजनची (60-80 किलो/ एकर) अर्धी मात्रा पेरणीच्या वेळी आणि उरलेली मात्रा पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावी. त्यामुळे भेंडीतील प्रति रोप प्रति फांदी फळांची संख्या वाढते आणि उत्पादन 50% पर्यंत वाढते.
  • भेंडीचे पीक पेरणीनंतर सुमारे 40 ते 50 दिवसांनी फळे देऊ लागते.
  • पहिल्या तोडणीपूर्वी कॅल्शियम नायट्रेट + बोरॉन @ 10 किलो/ एकर, मॅग्नीशियम सल्फेट 10 किलो/ एकर + यूरिया @ 25 किलो/ एकर 1 किलो नायट्रोजन स्थिरीकरण आणि फॉस्फरस विरघळवणार्‍या जिवाणूंसह द्यावे.
  • भेंडीत फुलोरा येण्याच्या वेळी अमोनियम सल्फेट 55-70 किलो/ एकर या प्रमाणात द्यावे. ते फळांच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Method of sowing in okra

भेंडीच्या पेरणीची पद्धत

  • भेंडीची लागवड समतल जमिनीत किंवा सर्‍यांमध्ये करता येते. भारी मातीत हे पीक सर्‍यांवर पेरावे.
  • भेंडीच्या संकरीत वाणांची पेरणी 75 x 30 सेमी किंवा 60 x 45 सेमी एवढ्या अंतरावर करावी.
  • भेंडीच्या पेरणीपुर्वी 3-4 दिवस निंदणी करणे उपयुक्त ठरते.
  • बियाणे सुमारे 4-5 दिवसात अंकुरित होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to increase number of flowers in Okra

भेंडीतील फुलोर्‍याच्या वृद्धीसाठी सुचना

  • भेंडीच्या पिकासाठी फुलोरा येण्याची अवस्था खूप महत्वपूर्ण असते.
  • भेंडीच्या पिकाची फुलोर्‍याची अवस्था पेरणीनंतर 40-45 दिवसांनी सुरू होते.
  • खालीलपैकी काही उत्पादने वापरुन भेंडीच्या पिकातील फुलांची संख्या वाढवणे शक्य असते.
  • होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 मिली./एकर या प्रमाणात फवारावे.
  • समुद्री शेवाळाचे सत्व 180-200 मिली./ एकर या प्रमाणात वापरावे.
  • सूक्ष्म पोषक तत्वांची 300 ग्रॅम/एकर या प्रमाणात फवारणी करावी.
  • 2 ग्रॅम/एकर या प्रमाणात जिब्रेलिक एसिड देखील फवारता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Advantages of N fixation bacteria in okra

नायट्रोजन उपलब्ध करून देणार्‍या (एन फिक्सेशन) जिवाणुंचे भेंडीच्या पिकासाठी लाभ

  • एझोटोबॅक्टर हे स्वतंत्रजीवी नायट्रोजन स्थिरिकरण आणि वायुविजन करणारे जिवाणू असतात.
  • हे जिवाणू वातावरणातील नायट्रोजनला सतत जमिनीत जमा करत राहतात.
  • त्यांच्या वापराने प्रत्येक पिकासाठीच्या नायट्रोजन उर्वरकाच्या आवश्यकतेत  20 % ते 25 % पर्यंत घट होते.
  • ते बीज अंकुरणाची टक्केवारी वाढवतात.
  • खोडे आणि मुळांची संख्या आणि लांबी वाढवण्यास ते मदत करतात.
  • त्यांच्या वापराने रोगांची शक्यता कमी होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control Of Jassid in Okra

भेंडीवरील तुडतुड्याचे नियंत्रण:-

ओळख:-

  • शिशु आणि वाढ झालेले किडे समान आकाराचे असतात पण शिशुंमध्ये पंख नसतात.
  • शेतातील पिकात प्रवेश केल्यावर शिशु आणि वाढ झालेले किडे उडताना दिसतात.
  • वाढ झालेले किडे पानांच्या आणि फांद्यांच्या खालील बाजूवर अंडी घालतात.
  • त्यांचे जीवनचक्र 2 आठवड्यात पूर्ण होते.

हानी:-

  • शिशु आणि वाढ झालेले किडे हिरव्या रंगाचे आणि लहान आकाराचे असतात.
  • शिशु आणि वाढ झालेले किडे पानांच्या खालील बाजूने रस शोषतात.
  • ग्रस्त पाने वरील बाजूस मुडपतात, त्यानंतर पिवळी पडतात आणि त्यांच्यावर दाग पडतात. त्याद्वारे माइकोप्लाज्मामुळे होणारे लघुपर्ण सारखे आणि करडेपणासारखे विषाणुजन्य रोग संक्रमित होतात.
  • या किडीचा तीव्र हल्ला झाल्यास रोपांच्या फळात घट होते.

नियंत्रण:-

  • पेरणी करताना कार्बोफुरोन 3 जी @ 10 किलो प्रति एकर मातीत मिसळावे.
  • किड्यांच्या नियंत्रणासाठी किडे दिसताच दर 15 दिवसांनी प्रोफेनोफॉस 50 % ईसी @ 400 मिली किंवा एसीटामाप्रीड 20% @ 80 ग्रॅम फवारावे.
  • किडीपासुन बचाव करण्यासाठी निंबोणी-लसूणाचे सटव किडे येण्यापूर्वी दर 15 दिवसांनी फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share