मूग हे भारतातील प्रमुख द्विदल धान्य आहे. मूग हा फायबर आणि लोहासह प्रोटीनचाही समृद्ध स्रोत आहे. त्याची लागवड खरीपाच्या हंगामात तसेच उन्हाळ्यात करता येते. त्याची शेती वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत केली जाते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी लोम ते रेताड लोम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मातीत हे पीक घेता येते. परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी लोम आणि रेताड लोम माती त्यासाठी उत्तम असते. क्षारयुक्त आणि ओल धरून ठेवणारी जमीन त्यासाठी उपयुक्त नाही.
पेरणीची वेळ:- खरीपाच्या पेरणीसाठी जुलैचा पहिला पंधरवडा ही उत्तम वेळ असते. उन्हाळी शेतीसाठी फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यापासून एप्रिलपर्यंत पेरणीस अनुकूल वेळ असते.
ओळींमधील अंतर:- खरीपाची पेरणी करताना दोन ओळींमधील अंतर 30 सेमी तर दोन रोपांमधील अंतर 10 सेंटीमीटर असावे. उन्हाळी पेरणीसाठी दोन ओळींमधील अंतर 22.5 सेमी आणि दोन रोपांमधील अंतर 7 सेंटीमीटर असावे.
पेरणीची खोली:- बियाणे 4-6 सेमी एवढ्या खोलीवर पेरावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share