Gram harvesting

हरबर्‍याची कापणी

  • अधिकांश शेंगा पिवळ्या झाल्यावर हरबर्‍याची कापणी करावी.
  • कापणीच्या वेळी हरबर्‍यात सुमारे 15 टक्के आर्द्रता असावी.
  • झाड वाळते आणि त्याची पाने लालसर राखाडी रंगाची होऊन गळू लागतात तेव्हा पीक कापणीस तयार झालेले असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to flower promotion in chickpea

हरबर्‍यातील फुलोर्‍याच्या वृद्धिसाठी सुचना:-

  • खालील उत्पादनांच्या द्वारे हरबर्‍याच्या पिकातील फुलोर्‍याचे प्रमाण वाढवता येऊ शकते:-
  • होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 एम.एल./एकर फवारावे.
  • समुद्री शेवाळाचे सत्व 180-200 ग्रॅम/एकर वापरावे.
  • सूक्ष्म पोषक तत्वांची, विशेषता बोरॉनची, मात्रा 200 ग्रॅम/एकर या प्रमाणात फवारावी.
  • 2 ग्रॅम/एकर या प्रमाणात जिब्रेलिक अॅसिड देखील फवारले जाऊ शकते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Healthy and Excellent Crop of Chickpea

हरबर्‍याचे निरोगी आणि उत्तम पीक

शेतकर्‍याचे नाव:- कल्याण पटेल

गाव+ तहसील:- देपालपुर

जिल्हा:- इंदौर

राज्य:- मध्यप्रदेश

कल्याण जी यांनी 10 एकर क्षेत्रात हरबरा लावला असून त्यात त्यांनी ग्रामोफोनच्या सूचनेनुसार प्रोपिकोनाजोल 25% EC आणि त्याचबरोबर एका विश्वसनीय कम्पनीच्या ज़ाईमची फवारणी केली. आता हरबरा उत्तम असून कोणताही रोग नाही आणि चांगला फुलोरा आहे.

Share

Application and Dose of Sulphur in Chickpea

सल्फर हे हरबर्‍यासाठी सर्वात महत्वाच्या पोषक तत्वांपैकी एक आहे. हेक्टरी 20 किलो सल्फरचा वापर उत्तम असल्याचे आढळून आले आहे. 90% डब्लूडीजी, जिप्सम, पाइराइट, सिंगल सुपर फॉस्फेट अशा सल्फरच्या वेगवेगळ्या स्रोतांचे  परिणाम समान असल्याचे आढळून आले आहे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

What to do for more yield in Gram?

फुलोरा येण्याच्या वेळी आणि त्यानंतर 10 दिवसांनी पुन्हा 2% यूरिया पानांवर फवारावा. बियाण्याचे प्रिमिंग (4-5 तासांसाठी बियाणे भिजवत ठेवणे) आणि 10 सेमी खोलीवर पेरणी करणे पावसाळी परिस्थितीत उत्पादकता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Weed Management of Gram (chickpea)

तणाचा बंदोबस्त हे सर्वात महत्वाचे ठरते. अंकुर फुटण्यापूर्वीच्या तणनाशकांपैकी पेंडामेथलीन हे सर्वात प्रभावी तणनाशक असल्याचे सिद्ध झालेले आहे. अंकुर फुटल्यानंतरच्या काळात क्यूजेलोफ़ोप ईथाइल हे सर्वोत्तम तणनाशक आहे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Sowing and sowing time of Chickpea (Gram)

  • असिचिंत भागात हरबर्‍याची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. सिंचित भागात पेरणी 30 ऑक्टोबर पर्यंत करणे आवश्यक असते.
  • अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेतात योग्य संख्येने रोपे असणे अत्यावश्यक असते. रोपांची संख्या योग्य तेवढी राहण्यासाठी प्रती एकक बियाण्याचे प्रमाण तसेच सर्‍यांमधील व रोपांमधील अंतर प्रमाणबद्ध असणे आवश्यक असते.
  • असिंचित शेतात हेक्टरी 80 कि.ग्रॅ. तर सिंचित शेतात हेक्टरी 60 कि.ग्रॅ. बियाणे पुरेसे असते.
  • असिंचित शेतात पीक घेण्यासाठी बियाणे 7 ते 10 सें.मी. एवढ्या तर सिंचित क्षेत्रात ते 5 ते 7 सें.मी. खोलीवर पेरावे. दोन सरींमधील अंतर 45 ते 50 सें.मी. ठेवावे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Irrigation in Gram

हरबर्‍यासाठी पाणी:-

हरबर्‍याच्या पिकाला फार पाणी देण्याची आवश्यकता नसते.

फांदया फुटण्याच्या वेळी (फुलोरा येण्यापूर्वी) दोन वेळा आणि फळे धरण्याच्या वेळी पाणी देण्याने काही भागात चांगले उत्पादन मिळाले आहे. परंतु फांदया फुटण्याच्या वेळी (फुलोरा येण्यापूर्वी) एकदा पाणी दिल्याने उत्पादनात अपेक्षित वाढ होते.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Suitable soil for Gram

हरभरा हे पीक भारतात विविध प्रकारच्या मृदांमध्ये घेतले जाते. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात हे पीक कापसाच्या काळ्या जमिनीत घेतले जाते पण त्यासाठी रेताड लोम ते चिकण लोम माती उत्कृष्ट समजली जाते. पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानात अशा मातीत हरबर्‍याचे पीक घेतले जाते. चांगल्या वाढीसाठी माती कोरडी असावी आणि फार जड नसावी. जड माती पाण्याला अधिक प्रमाणात शोषते आणि त्यामुळे तणाची वाढ अधिक होते. त्यामुळे पिकाला सूर्यप्रकाश कमी मिळतो आणि फळात घट येते. पीक घेतलेल्या जमिनीत अधिक प्रमाणात क्षार नसावेत आणि pH 6.5 – 7.5 या दरम्यान असावे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Prevention of Fusarium Wilt in Gram

हरभर्‍यावरील मर आणि पानगळीचा रोग फ्युजॅरियम ऑक्सिस्पोरम जिवाणुंमुळे होतो. उष्ण आणि दमट वातावरण त्यांच्यासाठी पोषक असते. या रोगापासून बचाव करण्यासाठी पुढील खबरदारीचे उपाय योजावेत:

  • सहा वर्षाच्या उत्पादनाचे चक्र अवलंबावे.
  • पावसाळ्यातील शेतातील ओल टिकवावी.
  • खोल नांगरणी (6-7 इंच) करून शेत समपातळीत आणावे.
  • रोगमुक्त बियाणे वापरावे.
  • रोगप्रतिकारक जाती लावाव्यात.
  • एक किलो बियाण्यासाठी 3 ग्रॅम या प्रमाणात कार्बेन्डाजिम वापरुन बीजसंस्करण करावे.
  • तापमान अधिक असताना (उष्ण वातावरणात पेरणी करू नये. ऑक्टोबरच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या आठवड्यात पेरणी करावी.
  • नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाणी द्यावे.

Share