Nutrient management in sponge gourd and ridge gourd

घोसाळी आणि दोडक्यातील पोषक तत्वांचे व्यवस्थापन:-

  • शेताची मशागत करताना 20-25 टन प्रति हेक्टर शेणखत वापरावे.
  • 75 किलोग्रॅम यूरिया 200 किलोग्रॅम सिंगल सुपर फास्फेट आणि 80 किलोग्रॅम म्यूरेट ऑफ़ पोटाश शेवटच्या नांगरणीच्या वेळी द्यावे.
  • उठलेल्या 75 किलोग्रॅम यूरियाची अर्धी मात्रा रोपांना 8-10 पाने फुटल्यावर आणि उरलेली अर्धी मात्रा फुलोरा येण्याच्या वेळी द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Objectives of Soil testing

मृदा परीक्षणाचे उद्देश्य:-

  • पिकांसाठी रासायनिक खतांची योग्य मात्रा ठरवण्यासाठी.
  • अल्कली आणि आम्ल जमीनींत सुधारणा करून त्यांना सुधारून कसण्यायोग्य बनवण्याचा योग्य मार्ग ठरवण्यासाठी.
  • पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची अनुकूलता ठरवण्यासाठी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Role of Copper in Plant

रोपांच्या विकासात कॉपरची भूमिका:- रोपांच्या निरोगी विकासासाठी कॉपर हा अत्यावश्यक घटक आहे. इतर लाभांव्यतिरिक्त, कॉपर अनेक एंझाइम प्रक्रियांमध्ये भूमिका बजावते. ते क्लोरोफिलच्या निर्मितीसाठी महत्वाचे असते.

कॉपरची कार्ये:- कॉपर रोपांमध्ये लिग्निन संश्लेषणासाठी आवश्यक असलेले काही एंझाइम्स सक्रिय करते. ही एंझाइम्स प्रणालींसाठी आवश्यक असतात. प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत, रोपांच्या श्वसनासाठी आणि कार्बोहाइड्रेट आणि प्रोटीनच्या चयापचयासाठी ती आवश्यक असतात. कॉपर  भाजांचा स्वाद वाढवते आणि फुलांचे रंग गडद करते.

अभावाची लक्षणे:- कॉपर स्थिर असते. याचा अर्था असा की त्याच्या अभावाची लक्षणे नव्याने उगवलेल्या पानांमध्ये दिसून येतात. पिकानुसार लक्षणे वेगवेगळी असतात. सहसा पाने वाकडी होणे आणि सर्व किंवा नव्या पानांच्या शिरांमध्ये थोडी पिवळी झाक येणे सुरूवातीचे लक्षण एसते. पानांच्या पिवळ्या पाडलेल्या भागात आणि विशेषता कडावर क्षयाचे डाग पडतात. पुढे ही लक्षणे वाढत जाऊन नवीन पाने लहान आकाराची, कमी चमकदार दिसतात आणि काही वेळा पाने सुकतात.  फांद्यांची वाढ खुंटल्याने कोंवात क्षय होऊन ते मरतात. सहसा रोपाच्या खोडाची लांबी पानांजवळ कमी होते. फुलांचा रंग फिकट होतो. पोटॅशियम, फॉस्फरस किंवा इतर सूक्ष्म पोषक तत्वांची अतिरिक्त मात्रा अप्रत्यक्षपणे कॉपरच्या अभावाचे कारण असू शकते. तसेच जमीनीची पीएच श्रेणी उच्च असल्यास त्यानेही कॉपरचा अभाव होऊ शकतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fertilizer and Manure in Guava trees

पेरुच्या झाडांसाठी खते आणि उर्वरके:- शेणखत 50 किलो आणि नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटाशची प्रत्येकी 1 किलो मात्रा दोन समान भागात मार्च आणि ऑक्टोबरमध्ये द्यावी. अधिक उत्पादनासाठी यूरिया 1% + झिंक सल्फेट 0.5% चे मिश्रण मार्च आणि ऑक्टोबर मध्ये फवारावे. बोरानचा अभाव (पाने लहान असणे, फळे फाटणे, फळे कडक होणे) दूर करण्यासाठी बोरेक्स 0.3% फुले आणि फळे लागण्याच्या वेळी फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrient Management in Pea

मटारमधील पोषक तत्वांचे व्यवस्थापन

मटारमधील पोषक तत्वांचे व्यवस्थापन:-

पेरणीच्या वेळी 30 किलो नायट्रोजन प्रति हेक्टर एवढी आधारभूत मात्रा सुरुवातीच्या वाढीस गती देण्यासाठी पुरेशी असते. नायट्रोजनच्या अधिक मात्रेने ग्रंथींच्या स्थिरीकरणावर वाईट परिणाम होतो. फॉस्फरसच्या वापराने पिकाला लाभ होतो कारण तो मुळात ग्रंथी बनणे वाढवून नायट्रोजन निर्धारण करण्यास पोषक ठरतो. त्यामुळे मटारचे उत्पादन आणि गुणवत्ता यात वाढ होते. रोपांची उगवणी आणि नायट्रोजन निर्धारण क्षमता वाढवण्यास पोटाश उर्वरकांचादेखील फायदा होतो.

सर्वसामान्य शिफारसी:-

उर्वरकांच्या वापराची सर्वसामान्य शिफारस पुढील बाबींवर अवलंबून असते –

  • मृदेची उर्वरकता आणि देण्यात येणार्‍या कार्बनिक खते/ शेणखताची मात्रा
  • सिंचनाची परिस्थिती:- पावसाळी की सिंचित
  • पावसाळी पिकांना उर्वरकांची मात्रा अर्धी दिली जाते.

किती मात्रा द्यावी, केव्हा द्यावी –

  • मटारच्या भरघोस उत्पादनासाठी दर एकरी 10 किलोग्रॅम यूरिया, 50 किलोग्रॅम डी.ए.पी, 15 किलोग्रॅम म्यूरेट ऑफ  पोटाश आणि 6 किलोग्रॅम सल्फर 90% डब्लू.जी. देतात.
  • शेताच्या मशागतीच्या वेळी यूरियाची अर्धी मात्रा आणि डी.ए.पी, म्यूरेट ऑफ पोटाश आणि सल्फरची पूर्ण मात्रा देतात. युरियाची उरलेली मात्रा दोन वेळा पाणी देताना द्यावी.

Source: IIVR, VARANASI and Handbook Of Agriculture

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fertilizer application for Chickpea

हरबर्‍यासाठी खताबाबत माहिती

हरबर्‍याचे पीक दळदार असल्याने त्याला कमी नायट्रोजन लागतो. हरबर्‍याच्या रोपांच्या मुळात ग्रन्थि असतात. ग्रन्थितील जीवाणु वातावरणातील नायट्रोजनचे मुळात स्थिरीकरण करून रोपाला लागणारा नायट्रोजन मिळवून देतात. परंतु सुरूवातीला रोपाच्या मुळातील ग्रंन्थिचा पूर्ण विकास न झाल्याने रोपे जमिनीतून नायट्रोजन मिळवतात. त्यामुळे नायट्रोजनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी हेक्टरी 20 कि.ग्रॅ. नायट्रोजनची आवश्यकता असते. त्याबरोबर 40 कि.ग्रॅ. फॉस्फरस प्रति हेक्टर द्यावा. नायट्रोजनची मात्रा यूरिया किंवा डाई अमोनियम फॉस्फेट (डीएपी) आणि शेणखत आणि कम्पोस्ट खताद्वारे देता येते. फॉस्फरसची आवश्यकता सिंगल सुपर फॉस्फेट किंवा डीएपी किंवा शेणखत आणि कम्पोस्ट खताद्वारे पूर्ण करता येते. एकीकृत पोषक व्यवस्थापनाद्वारे पोषक तत्वांची आवश्यकता पूर्ण करणे फायदेशीर ठरते. एक हेक्टर क्षेत्रासाठी 2.50 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीची मशागत करतेवेळी मातीत मिसळावे. पेरणीच्या वेळी 22 कि.ग्रॅ. यूरिया आणि 125 कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट किंवा 44 कि.ग्रॅ. डीएपी मध्ये 5 किलोग्रॅम यूरिया मिसळून प्रति हेक्टरी सरींमध्ये देणे पुरेसे असते.

Share

Manures and fertilizers in Peas

सामान्यपणे 20 टन चांगल्या प्रतीचे शेणखत पेरणीच्या पूर्वी सुमारे दीड महिना द्यावे. हेक्टरी 25 किलोग्रॅम नायट्रोजन 70 किलोग्रॅम फॉस्फरस 50 किलोग्रॅम पोटाश द्यावे. उर्वरकांचे मिश्रण पेरणीच्या वेळीच बियाण्याच्या रांगेपासून 5 सेमी अंतरावर आणि बियाण्याहून 5 सेमी जास्त खोल द्यावे.

पोस्टला पसंती दर्शवण्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा आणि शेअर बटन दाबून इतर शेतकर्‍यांशी माहितीचे आदानप्रदान करा.

Share

Fertilizer and Manure in Onion

शेणखत हेक्टरी 12-20 टन या प्रमाणात जमीन तयार करताना मिसळा. नायट्रोजन हेक्टरी 120 किलो, फॉस्फरस हेक्टरी 60 किलो, पोटाश हेक्टरी 75 किलो वापरा.

20 किलो सल्फर, 10 किलो बोरेक्स आणि 10-15 किलो झाईम दिल्याने उत्पादन आणि गुणवत्तेत वाढ होते.

Share