Role of Copper in Plant

रोपांच्या विकासात कॉपरची भूमिका:- रोपांच्या निरोगी विकासासाठी कॉपर हा अत्यावश्यक घटक आहे. इतर लाभांव्यतिरिक्त, कॉपर अनेक एंझाइम प्रक्रियांमध्ये भूमिका बजावते. ते क्लोरोफिलच्या निर्मितीसाठी महत्वाचे असते.

कॉपरची कार्ये:- कॉपर रोपांमध्ये लिग्निन संश्लेषणासाठी आवश्यक असलेले काही एंझाइम्स सक्रिय करते. ही एंझाइम्स प्रणालींसाठी आवश्यक असतात. प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत, रोपांच्या श्वसनासाठी आणि कार्बोहाइड्रेट आणि प्रोटीनच्या चयापचयासाठी ती आवश्यक असतात. कॉपर  भाजांचा स्वाद वाढवते आणि फुलांचे रंग गडद करते.

अभावाची लक्षणे:- कॉपर स्थिर असते. याचा अर्था असा की त्याच्या अभावाची लक्षणे नव्याने उगवलेल्या पानांमध्ये दिसून येतात. पिकानुसार लक्षणे वेगवेगळी असतात. सहसा पाने वाकडी होणे आणि सर्व किंवा नव्या पानांच्या शिरांमध्ये थोडी पिवळी झाक येणे सुरूवातीचे लक्षण एसते. पानांच्या पिवळ्या पाडलेल्या भागात आणि विशेषता कडावर क्षयाचे डाग पडतात. पुढे ही लक्षणे वाढत जाऊन नवीन पाने लहान आकाराची, कमी चमकदार दिसतात आणि काही वेळा पाने सुकतात.  फांद्यांची वाढ खुंटल्याने कोंवात क्षय होऊन ते मरतात. सहसा रोपाच्या खोडाची लांबी पानांजवळ कमी होते. फुलांचा रंग फिकट होतो. पोटॅशियम, फॉस्फरस किंवा इतर सूक्ष्म पोषक तत्वांची अतिरिक्त मात्रा अप्रत्यक्षपणे कॉपरच्या अभावाचे कारण असू शकते. तसेच जमीनीची पीएच श्रेणी उच्च असल्यास त्यानेही कॉपरचा अभाव होऊ शकतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>