Control of anthracnose in cowpea

चवळीवरील क्षतादि रोगाचे नियंत्रण

  • या रोगाने चवळीची पाने, खोड आणि शेंगांवर परिणाम होतो.
  • लहान-लहान लाल-राखाडी रंगाचे डाग शेंगांवर उमटतात आणि वेगाने वाढतात.
  • आर्द्र हवामानात या डागात गुलाबी रंगाचे जिवाणू वाढतात.
  • रोगमुक्त प्रमाणित बियाणी वापरावीत.
  • रोगग्रस्त शेतात किमान दोन वर्षे चवळी लावू नये.
  • रोगग्रस्त रोपांना उपटून नष्ट करावे.
  • कार्बोक्सिन 37.5 + थायरम  37.5 @ 2.5 ग्रॅम/ किलोग्रॅम बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • मॅन्कोझेब 75% डब्ल्यू पी @ 400-600/एकर पाण्यात मिसळून दर आठवड्याला फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of fruit rot in brinjal

वांग्यातील फळाच्या कुजीचे नियंत्रण

  • अत्यधिक ओल या रोगाच्या विकासास सहाय्यक ठरते.
  • फळांवर जळल्यासारखे शुष्क डाग पडतात. ते हळूहळू सर्व फळांवर पसरतात.
  • रोगग्रस्त फळांची वरील बाजू राखाडी होते आणि तिच्यावर पांढरी बुरशी जमते.
  • या रोगाने ग्रस्त रोपांची पाने आणि इतर भाग तोडून नष्ट करावेत.
  • मॅन्कोझेब 75% WP @ 400 ग्रॅम प्रति एकर किंवा टेबुकोनाझोल 25 % ईसी @ 250 ग्रॅम प्रति एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of fusarium wilt in muskmelon

खरबूजावरील फ्यूजेरियम जिवाणूजन्य मर रोगाचे नियंत्रण

  • जिवाणूजन्य मर रोगाची सुरुवातीची लक्षणे जुन्या पानांवर दिवसात. पाने पिवळी पडून सुकतात. या रोगाची लक्षणे उन्हाळ्यात स्पष्ट दिसतात.
  • देठांवर राखाडी चिरा दिसतात. त्यांच्यातून लाल-राखाडी रंगाचा दाट स्राव पाझरतो.
  • निरोगी बियाणे पेरणीसाठी वापरा.
  • शेताची खोल नांगरणी, तणाचा नायनाट आणि पाण्याच्या निचर्‍याची योग्य व्यवस्था आवश्यक असते.
  • फ्यूजेरियम मर रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रॉपिकोनाझोल 25% ईसी @ 200 मिली/ एकर किंवा थियोफॅनेट-मिथाइल 500 ग्रॅम प्रति एकर वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of damping off in tomato

टोमॅटोवरील आद्र गलन रोगाचे नियंत्रण

  • सामान्यता बुरशीचा हल्ला अंकुरित बियाण्यापासून सुरू होतो आणि हळुहळू तो नवीन मुळ्यातून फैलावत बुड आणि विकसित होत असलेल्या सोटमुळावर होतो.
  • संक्रमित रोपांच्या बुडावर फिकट हिरवे, करडे आणि पाण्यासारखे जळल्याचे डाग दिसतात.
  • नर्सरी जमिनीपासून किमान 10 से.मी. उंच असावी.
  • कार्बेन्डाजिम 50% WP @ 2 ग्रॅम/कि.ग्रॅ. बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • नर्सरीत आर्द्र गलन रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% WP @ 400-600 ग्रॅम/एकर मिश्रण वापरुन मुळांजवळ ड्रेंचिंग करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of fusarium wilt in watermelon

कलिंगडातील मर रोगाचे नियंत्रण

  • रेताड मातीत हा रोग जास्त प्रमाणात आढळून येतो.
  • संक्रमित रोपे नष्ट करावीत.
  • रोगमुक्त बियाणे वापरावे.
  • पेरणीपुर्वी कार्बेन्डाजिम @ 2 ग्रॅम/किलोग्रॅम वापरुन बीजसंस्करण करावे.
  • कलिंगडाच्या रोपांवर रोग दिसताच प्रॉपिकोनाझोल @ 80-100 मिली/एकर वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of bacterial leaf spot in coriander

धने/ कोथिंबीरीच्या पिकातील जिवाणूजन्य दागांच्या रोगाचे नियंत्रण

  • पेरणीसाठी निरोगी आणि रोगमुक्त बियाणे निवडावे.
  • आवश्यकता वाटल्यासच सिंचन करावे आणि प्रमाणाबाहेर पाणी देणे टाळावे.
  • नायट्रोजन उर्वरकांच्या अतिवापरापासून सावध राहावे. प्रमाणाबाहेर नत्र देणे रोगाच्या विकासास जबाबदार ठरू शकते.
  • धने/ कोथिंबीरीच्या रोपांवर रोगाची लागण होताच कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% डब्लूपी का 400-500 ग्रॅम प्रति एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of damping off in coriander

धने/ कोथिंबीरीच्या पिकातील आर्द्र गलन रोग

  • या रोगामध्ये पीक बियाणे मातीतून बाहेर निघण्यापूर्वीच कुजते किंवा त्यानंतर लगेचच मरते.
  • धने/ कोथिंबीरीच्या पेरणीपुर्वी शेतात खोल नांगरणी करून जुन्या पिकाच्या अवशेष आणि तणाला नष्ट करावे.
  • रोगमुक्त बियाणे आणि रोग प्रतिरोधक वाणे वापरावीत.
  • कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37.5% @ 2 ग्रॅम/किलो बियाणे वापरुन पेरणीपुर्वी बीजसंस्करण करावे.
  • थियोफॅनेट मिथाइल 70% डब्ल्यू पी 300 ग्रॅम/एकर द्रावण मुळांजवळ फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of bacterial wilt in tomato

टोमॅटोच्या पिकातील जिवाणूजन्य मर रोगाचे नियंत्रण

  • रोगग्रस्त रोपांची माने पिवळी पडून सुकू लागतात आणि काही काळाने रोप मरते.
  • रोप सुकण्यापूर्वी खालील बाजूची पाने गळून पडतात.
  • रोपाच्या खोडाचा खालील भाग कापला असता त्यात जिवाणू द्रव दिसतो.
  • रोपाच्या खोडाच्या बाहेरील भागावर लहान आणि नाजुक मुळे फुटतात.
  • भोपळा वर्गीय भाजा, झेंडू किंवा भाताच्या पिकाची लागवड करून पीक चक्र अवलंबावे.
  • शेतात रोपे लावण्यापूर्वी ब्लीचिंग पावडरची 6 कि.ग्रॅम प्रति एकर मात्रा फवारावी.
  • स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट I.P. 90% w/w + टेट्रासायक्लिन हाइड्रोक्लोराइड I.P. 10% w/w  20 ग्रॅम/एकर फवारावे.
  • कसुगामायसिन 3% एस.एल. 300 मिली/एकर वापरुन देखील या रोगाला नियंत्रित करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Powdery Mildew of muskmelon

ख़रबूजातील धुरी रोगाचे नियंत्रण

  • पानांवर पांढरे किंवा धूसर रंगाचे डाग पडतात. नंतर ते बदलून त्यात पांढर्‍या रंगाची भुकटी तैय्यार होते.
  • पंधरा दिवसांच्या अंतराने हेक्झाकोनाझोल 5% SC 300 मिली. प्रति एकर किंवा थायोफिनेट मिथाईल 400 ग्रॅम प्रति एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share