Role of Boron in Plants

रोपातील बोरानची भूमिका:- रोपांना बोरान (बी) जास्त प्रमाणात लागत नाही परंतु योग्य प्रमाणात ते न मिळाल्यास रोपाच्या विकासात गंभीर प्रश्न उभे राहतात. इतर सूक्ष्म पोषक तत्वांहून बोरान वेगळे असते. त्याच्या कमतरतेमुळे हिरवेपणाचा अभाव आढळून येत नाही. परंतु अन्य सूक्ष्म पोषक तत्वांप्रमाणे त्याच्यात विषारीपणाची लक्षणे आढळून येतात.

कार्य:- बोरान कोशिका भित्ति संश्लेषणात कॅल्शियमसह वापरले जाते आणि कोशिका विभाजन (नव्या रोपांच्या कोशिकांची निर्मिती) करण्यासाठी ते आवश्यक असते. प्रजनन विकासासाठी बोरान खूप उपयुक्त असते कारण ते परागण, फळ आणि बीजाच्या विकासास साह्य करते. त्याच्या अन्य कार्यांमध्ये शर्करा आणि कार्बोहायड्रेट, नायट्रोजन चयापचय, काही प्रोटीन्सची निर्मिती, हार्मोनच्या स्तराचे नियंत्रण आणि पोटॅशियमचे स्टोमाटामध्ये परिवहन (ज्यामुळे आंतरिक पाण्याचे संतुलन राखले जाते) यांचा समावेश होतो, बोरान शर्करा परिवहनात मदत करत असल्याने त्याच्या अभावी रोपांची मुळे झिरपतात आणि त्यांच्यातील शर्करा कमी होते. त्यामुळे माईकोराईज़ा बुरशीचे मुळाकडे आकर्षण आणि वसाहतीकरण कमी होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>