कारल्यासाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन:-
- शेताची मशागत करताना 25-30 टन शेणखत मातीत मिसळावे.
- शेवटच्या नांगरणीच्या वेळी 75 कि.ग्रॅ. यूरिया, 200 कि. ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट आणि 75 कि. ग्रॅ.. पोटाशची मात्रा मातीत मिसळावी.
- उरलेली 75 कि. ग्रॅ.. यूरियाची मात्रा दोन ते तीन समान हिश्श्यात वाटून द्यावी.
- फॉस्फरस, पोटाशची सम्पूर्ण मात्रा आणि नायट्रोजनची एक तृतीयांश मात्रा पेरलेल्या बियाण्यापासून 8 ते 10 से.मी. अंतरावर टाकून द्यावी.
- शेतात नायट्रोजन पोषक तत्वाचा अभाव असल्यास पाने आणि वेलीवर पिवळा रंग येतो आणि रोपांची वाढ खुंटते.
- नायट्रोजन प्रमाणाबाहेर दिल्याने वाढ प्रमाणाबाहेर होते आणि फलन कमी होते. नर फुलांची संख्या वाढते.
- मातीत पोटॅशियमचा अभाव असल्यास रोपांची वाढ कमी होते आणि पानांचा आकार लहान होतो आणि फुले गळून पडतात आणि फळे लागणे बंद होते.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share