- पोटॅशियम पानांची छिद्रे उघड करण्याचे कार्य नियंत्रित करते त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत वाढ होण्यास मदत होते.
- पोटॅशियम रोपांमध्ये प्रथिने आणि पिष्टमय पदार्थ पदार्थ यांचे संश्लेषण घडवून आणण्यास देखील जबाबदार आहे.
- पोटॅशियम नेहमीच अतिरेकी प्रमाणात होणाऱ्या ओला दुष्काळ सदृश पाणीपुरवठ्याला प्रतिरोध करण्यात चांगली कामगिरी बजावते.
- पोटॅशियम रोपांमध्ये वाढीशी संबंधित संप्रेरके सक्रिय होण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावते.
- पोटॅशियम रोपांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते.
चांगली बातमी! आता पंतप्रधान किसान योजनेच्या सर्व लाभार्थीना के सी सी मिळेल.
भारतीय शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने घोषणा केली आहे की पंतप्रधान किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना आता किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) मिळेल. सरकारने केसीसी कार्ड देण्यासाठी पंधरा दिवसांची मोहीम देखील सुरू केलेली आहे. एका माध्यम वृत्तानुसार चौदा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचे फायदे मिळतील.
केसीसी योजना म्हणजे काय?
किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक कार्ड मिळेल. त्याद्वारे त्यांना तीन लाख रूपये पर्यंतचे कर्ज मिळेल ज्याचा व्याज दर फक्त सात टक्के असेल. शेतकऱ्यांनी दिलेल्या वेळेत पैसे भरल्यास त्यांना अधिक तीन टक्के सूट मिळेल. याचा अर्थ शेतकऱ्यांना आता केवळ चार टक्के व्याज किसान क्रेडिट कार्डवर भरावे लागेल.
सरकारने या मोहिमेबद्दल नाबार्डच्या अध्यक्षांना, इतर बँकांच्या अध्यक्षांना, व्यवस्थापकीय संचालकांना तसेच सर्व राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना तपशीलवार सूचना दिलेल्या आहेत. ज्यांच्याकडे केसीसी नाही अशा पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी बनवायला सर्व बँका व राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना सांगितली आहे. त्याचप्रमाणे योग्य त्या खात्याद्वारे त्यांना योजनेच्या सर्व लाभार्थ्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिलेला आहे.
Shareपंतप्रधान किसान योजना म्हणजे काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत?
पंतप्रधान किसान योजना
पंतप्रधान किसान सन्मान निधी (सर्वसाधारणपणे याला पंतप्रधान किसान योजना म्हटले जाते) ही केंद्र सरकारची एक योजना आहे, जिचा उद्देश भारतीय शेतकऱ्यांना उत्पन्नाला आधार देणे हा आहे जेणेकरून ते शेतीविषयक विविध आर्थिक गरजा पूर्ण करू शकतील. ही योजना २४ फेब्रुवारी २०१९ ला माननीय पंतप्रधानांनी सुरू केली होती. सुरुवातीला ही योजना केवळ लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होती, पण आता तिचा विस्तार करून सर्व शेतकरी कुटुंबांना त्यांच्या शेत जमिनीचा आकार विचारात न घेता यात सामील केले आहे.
या योजनेचे फायदे
पंतप्रधान किसन योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबास प्रति वर्ष सहा हजार रुपये दिले जातील. ही रक्कम दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यात प्रत्येक चार महिन्यांनी दिली जाईल.
ही योजना लाखो शेतकऱ्याना फायदेशीर ठरली आहे. एका माध्यम वृत्तानुसार नोव्हेंबर २०१९ पर्यंत ७.६ कोटी शेतकऱ्यांना याचे फायदे मिळाले आहेत. आता सरकारने या योजनेत अधिक काही वैशिष्ट्ये वाढवली आहेत. या योजने बरोबर इतर अनेक जास्तीचे फायदे व सुविधा शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
Shareकाकडीसाठी शेत तयार करणे
- सुरूवातीच्या टप्प्यत शेत चार-पाच वेळा नांगरून ठिसूळ बनवावे आणि शेवटच्या नांगरणी पूर्वी जमिनीमध्ये दर एकरी १०–१५ टन शेणखत मिसळावे
- जर का जमिनीत नेमाटोड कृमी, वाळव्या किंवा लाल मुंगळे यांचा प्रादुर्भाव झाला असेल तर दर एकरी दहा किलो कार्बोफ्युरॉन वापरा
- शेत जमीन समपातळीत आणल्यावर दोन ते अडीच सेंटीमीटर अंतरावर ६० सेंटिमीटर रुंद सरी बनवा.
- सरींची लांबी पाण्याचा स्रोत, ऋतू, पाऊस, जमिनीचा उतार यावर अवलंबून असते.
काकडीच्या पिकाची योग्य प्रकारे लागवड केली तर शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळू शकते.
- बियाणे जमिनीत एक ते डिड मीटर अंतरावर सरीमध्ये लावावे.
- जेव्हा काकडीचा वेळ मंडपावर चढवला जातो तेव्हा ३*१ मीटर अंतर ठेवावे.
- जेव्हा काकडीचा वेळ मंडपावर चढवला जातो तेव्हा ३*१ मीटर अंतर ठेवावे. जेव्हा बियाणे ०.५ ते ०.७५ मीटर अंतरावर लावले जाते तेव्हा प्रत्येक ठिकाणी ४ ते ६ बियाणे टाकावे.
- डोंगराळ प्रदेशात प्रत्येक छोट्या टेकडीवर दोन रोपे वाढू द्यावीत.
कारल्याची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी जल सिंचनाची योग्य पद्धत
- कारल्याच्या पिकाला जास्त प्रमाणात दिलेले किंवा निचरा न होता साठून राहणारे पाणी सहन होत नाही.
- पेरल्यानंतर किंवा रोपे लावल्यानंतर तिसऱ्या दिवशी पिकाला पहिले पाणी द्यावे आणि त्यानंतर आठवड्यातून एकदा जमिनीतील ओलाव्यानुसार पाणी द्यावे.
- जमिनीच्या वरच्या ५० सेमी थरात चांगला ओलावा ठेवावा कारण बहुतेक मुळे तिथेच असतात.
कोथिंबिरीच्या पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी जलसिंचनाची योग्य पद्धत
- पेरल्यानंतर ताबडतोब पहिल्यांदा दा जलसिंचन करावे.
- पहिल्या सिंचनानंतर चौथ्या दिवशी दुसरे जलसिंचन करावे.
- त्यानंतर दर ७–१० दिवसांनी पुढील जल सिंचन करीत जावे.
भोपळ्याच्या पिकावरील केवडा रोगावर कोणते उपाय करावेत
- रोग झालेली पाने खुडून नष्ट करावीत.
- रोगाला प्रतिबंध करणाऱ्या वाणाच्या बियांचे रोपण करावे.
- आळीपाळीने पिके घेणे आणि स्वच्छता ठेवणे या उपायांनी रोगाची तीव्रता कमी होते.
- थायोफ़ॅनेट मिथाईल ७०% WP एकरी ३०० ग्रॅम फवारावे.
- मेटलक्सिल ८% + मॅंकोझेब ६४% WP एकरी ५०० ग्रॅम फवारावे.
मिरची महोत्सव: आता संपूर्ण देश निमार च्या मिरचीची चव घेईल. ही शेतकऱ्यांसाठी उत्तम संधी आहे
निमार येथील मिरचीची तिखट चव मध्यप्रदेशच्या रहिवाशांमध्ये आधीच प्रसिद्ध आहे. आणि आता ही प्रसिद्धी सर्व देशभर पसरणार आहे. ही ओळख आता कदाचित सगळ्या जगात जाईल. हे आता येणाऱ्या मिरची महोत्सवामुळे घडेल. हा मिरची महोत्सव दिनांक २९ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात कसरावद, मध्य प्रदेश येथे होईल. याला स्थानिक भाषेत मिर्च महोत्सव असे नाव आहे. हा दोन दिवसांचा राज्य स्तरीय उत्सव निमार च्या मिरचीला देशात आणि जगात प्रसिद्ध करण्याच्या प्रमुख उद्देशाने मध्यप्रदेश सरकार आयोजित करत आहे.
या उत्सवामुळे या विभागात मिरचीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सर्वात जास्त फायदा होईल. यामुळे निमार आणि आसपासच्या प्रदेशात पिकवल्या जाणाऱ्या मिरचीचे ब्रॅण्डिंग होईल आणि त्यांना नवीन बाजारपेठा सर्व देशात आणि परदेशात उपलब्ध होतील.
या उत्सवात २५ हून अधिक कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना मिरची उत्पादनंशी संबंधित अशी महत्त्वाची माहिती देतील. आमचा ग्रामोफोन येथे आपल्या सेवेत उपस्थित असेल. म्हणजे आपण आमच्या कृषी तज्ञांना देखील शेती विषयक कोणताही सल्ला किंवा सूचना याबद्दल विचारू शकाल.
Shareभोपळ्याच्या पिकावरील केवडा (तांबडी भुरी) रोग कसा ओळखावा
भोपळ्यावरील केवडा किंवा तांबडी भुरी रोगाची प्रमुख लक्षणे पुढील प्रमाणे आहेत.
- पानांच्या खालच्या पृष्ठभागावर पाण्याने भिजलेले घाव दिसतात.
- घाव आधी जुन्या पानांवर दिसतात आणि नंतर कोवळ्या पानांवर पसरत जातात.
- घाव जसजसे पसरतात तसे पिवळे राहतात किंवा सुके आणि तपकिरी होतात.
- परिणाम झालेल्या वेलींना व्यवस्थित फल धारणा होत नाही.