घोसाळ्यावरील मोझेक विषाणूजन्य रोगाचे व्यवस्थापन

  • शेत स्वच्छ ठेवा आणि पर्यायी आश्रयदाते मुख्यता: तण काढून टाका.
  • आलटून पालटून पिके घेताना रोगाला बळी पडू शकतील अशी पिके घेणे टाळा.
  • मोझेक ची शक्यता जास्त असेल असे हंगाम आणि क्षेत्र येथे पिके घेणे टाळा.
  • असिफेट ७५% SP दर एकरी ८० ते १०० ग्रॅम आणि प्रतिजैविक रसायने उदाहरणार्थ स्ट्रेप्टोमायसीन २० ग्रॅम अधिक चांगल्या नियंत्रणासाठी फवारून घ्या. किंवा
  • असिटामीप्रिड २०% SP दर एकरी शंभर ग्रॅम आणि त्यात प्रतिजैविक रसायने जसे की स्ट्रेप्टोमायसीन २० ग्रॅम अधिक चांगल्या नियंत्रणासाठी वापरा.
Share

“शेतीमधील महिला” या विषयावर हैदराबाद मध्ये एक राज्यस्तरीय मेळावा होणार आहे

विशेषतः भारतात महिला शेतीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. पण बरेचदा फक्त समाजाकडूनच नव्हे तर त्यांच्या स्वतःकडून सुद्धा त्यांचे योगदान दुर्लक्षित राहते .

त्यांचे शेतीतील योगदान अधोरेखित करण्यासाठी हैदराबाद मध्ये ६ मार्च पासून एक मेळावा आयोजित केला आहे. या २ दिवसांच्या मेळाव्याचा मुख्य हेतू ग्रामीण भारतातील स्त्रियांना विशेषतः शेती क्षेत्रामध्ये येणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास करणे हा आहे. इथे शेतीशी संबंधित अनेक क्षेत्रातील तज्ञ आपले संशोधन सादर करतील. तुम्हाला अनेक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि शास्त्रज्ञ या मेळाव्यात भाग घेऊन चर्चा करताना दिसतील.

या मेळाव्या बद्दल एका पत्रकार परिषदेत बोलताना तेलांगणा रायथू संघम चे उपाध्यक्ष, अरिबांदी प्रसाद राव, , यांनी असे म्हटले आहे की “स्त्रिया शेतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि आता खूप काळ उलटून गेल्यावर तरी निदान आपण हे ओळखून असले पाहिजे आणि त्यांना सतावणाऱ्या प्रश्नांकडे पुरेसे लक्ष दिले पाहिजे.”

Share

चांगली बातमी! सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी अखेर उठवली

केंद्र सरकारने नुकतीच कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याची अधिसूचना प्रसारित केली आहे. ही घोषणा १५ मार्च २०२० पासून लागू होईल.

कांद्याच्या भावांमध्ये वेगाने वाढ झाल्यामुळे सरकारने भाववाढ नियंत्रित करण्यासाठी २९ सप्टेंबर २०१९ ला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे आणि कांद्याचे भाव स्थिर झाले आहेत. आणि या हंगामात कांद्याचे उत्पादन अधिक चांगले होईल अशी अपेक्षा आहे. यामुळे सरकारने कांदा निर्यातीवरील गेले ५ महिने लागू असलेली बंदी १५ मार्च पासून उठवण्याची घोषणा केली आहे.

डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) यांनी स्वाक्षरी केलेली ही अधिसूचना असे सांगते की,”सर्व प्रकारच्या कांद्यांची निर्यात आता मुक्तपणे करता येईल आणि त्यासाठी किमान निर्यात किंमत किंवा लेटर ऑफ क्रेडिट यांची आवश्यकता असणार नाही.”

हे पाऊल ग्राहक आणि शेतकरी दोघांनाही फायदेशीर ठरेल, कारण त्यामुळे कांद्याच्या किमती कमी होतील आणि ग्राहकांच्या पाकिटावरील ताण कमी होईल. याशिवाय शेतकऱ्यांना त्यांचे कांदे विकण्यासाठी खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल.

Share

घोसाळ्यावरील मोझेक विषाणू जन्य रोग कसा ओळखावा

image source -https://d2yfkimdefitg5.cloudfront.net/images/stories/virtuemart/product/nurserylive-sponge-gourd-jaipur-long.jpg
    • हा विषाणूजन्य रोग खोडातील रस आणि रोग वाहक कीटकाद्वारे फैलावतो.
    • रोग झालेल्या रोपांमध्ये कोवळी पाने खूप उशिरा उघडतात आणि त्यावर संपूर्णपणे रंग बदल घडलेला दिसतो त्यानंतर शिरांवर हिरव्या रंगाचे पट्टे दिसून येतात.
    • जून पानांवर प्रामुख्याने हिरव्या रंगाचे वर आलेले चट्टे दिसतात. आकार बिघडून पाने तंतुसारखी होतात.
    • झाडाची वाढ, फुले येणे आणि उत्पादन क्षमता यावरही दुष्परिणाम होतो.
    • खूप जास्त परिणाम झालेल्या वेलांना फलधारणा होत नाही.

 

 

Share

कलिंगड पिकावरील बुरशीजन्य तांबडी भुरी किंवा केवडा रोगाचे व्यवस्थापन.

  • परिणाम झालेली पाने खुडून नष्ट करणे.
  • रोगाला प्रतिकार करू शकणाऱ्या या वाणाचे बियाणे लावणे.
  • आलटून पालटून पिके घेणे आणि स्वच्छता राखणे यामुळे रोगाची तीव्रता कमी होते.
  • जमीन थायोफानेट मिथाईल ७०% WP या द्रव्याने 300  ग्रॅम प्रति एकर या दराने भिजवणे
  • मेटलक्सिल % आणि मॅन्कोझेब ६४% WP यांनी ५०० ग्रॅम प्रति एकर या दराने फवारणी करावी.
  • प्रति एकर ५०० ग्रॅम सुडोमोनास फ्लोरसन्स फवारावे.
Share

सरकारने एफपीओ योजना सुरू केली आहे यामुळे ८६% शेतकऱ्यांचा फायदा होईल.

भारतीय शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने नुकतीच एक महत्त्वाकांक्षी योजना सुरु केले आहे. यामध्ये सर्व देशभर सुमारे दहा हजार एफपीओ म्हणजे फार्मर प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन (शेतकरी उत्पादक संस्था) सुरू करण्यात येतील. हे एफपिओ एक हेक्टर पेक्षा कमी जमीन मालकीची असणाऱ्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मुख्यतः फायदेशीर ठरतील. एका माध्यम वृत्तानुसार अशा शेतकऱ्यांची देशातील एकूण संख्या सुमारे ८६ टक्के आहे.

एफपीओ म्हणजे फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन या सदस्यांवर आधारित संस्था आहेत. म्हणजेच एफपी मध्ये शेतकरी हे सदस्य असतील. या संस्थांमध्ये शेती विपणन म्हणजे मार्केटिंग, पिके उत्पादन, मूल्यवर्धनप्रक्रिया आणि माहिती तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रातील तज्ञ लोकांचा समावेश असेल. यामुळे शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी मदत होईल. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी ४४०६ कोटी रुपये राखून ठेवले आहेत. या एफपीओ संस्था येत्या पाच वर्षात म्हणजे २०२४ पर्यंत कार्यरत होतील.

या प्रकल्पामुळे लहान शेतकऱ्यांना शेती प्रक्रियेमध्ये ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो त्यांच्या समाधानासाठी एक मंच उपलब्ध होईल. २९ फेब्रुवारीला या योजनेचे उद्घाटन करताना स्वतः पंतप्रधान असे म्हणाले की हे एफपीओ शेतकऱ्यांना व्यावसायिक बनवतील.

Share

कलिंगड पिकावरील बुरशीजन्य केवडा किंवा तांबडी भुरी रोग कसा ओळखावा

  • पानाच्या पातळ भागावर खालच्या बाजूला पाण्याने भरलेल्या जखमां सारखे घाव दिसून येतात.
  • वरच्या पृष्ठभागावर पाण्याने भरलेल्या घावांसारखेच को असलेले टोकदार डाग दिसून येतात.
  • हे घाव सुरुवातीला जून पानांवर दिसतात आणि मग हळूहळू कोवळ्या पानांवर ही दिसू लागतात.
  • हे घाव वाढतात से सुरुवातीला त्यांचा रंग पिवळा दिसतो किंवा मग सुकून  ते पिंगट तपकिरी होतात.
  • परिणाम झालेल्या वेलांना फळे व्यवस्थित येत नाहीत.
Share

ग्रामोफोन यांनी मुगाच्या पिकासाठी जमीन तयार करण्यासाठी मूग समृद्धी किट आणले आहे.

  • या किटमध्ये मुगाचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक समाविष्ट केलेले आहेत.
  • मुग समृद्धी किट मध्ये अनेक प्रकारचे फायदेशीर जिवाणू असतात.
  • या जिवाणू मध्ये पोटॅश आणि फॉस्फरस जीवाणू, ट्रायकोडर्मा व्हिरीडी, ह्युमिक ऍसिड आणि रायझोबियम जिवाणू हे प्रमुख आहेत.
  • हे किट सर्व प्रकारच्या सूक्ष्म जीवांचे मिश्रण करून बनवले जाते.
  • या किटचे एकूण वजन सहा किलो आहे ते एक एकर जमिनीसाठी उपयुक्त आहे.
Share

काकडीमध्ये जमीन सुपीक करण्यासाठी खोल मुळे असलेल्या मिश्र पिकाची पद्धत

  • काकडीच्या रोपांची मुळे जमिनीत उथळ असल्यामुळे आलटून पालटून खोल मुळे असलेली मिश्र पिके घेण्याची गरज नसते.
  • फळांची प्रत सुधारण्यासाठी आणि उत्पादनात वाढ होण्यासाठी पाच संध्यापर्यंतचे दुय्यम अंकुर छाटून टाकावेत.
  • रोपांना टेकू दिल्यामुळे फळे कुसणे  थांबवायला मदत होते.
Share

कलिंगडाच्या पिकासाठी जमीन आच्छादनाचे महत्व

  • प्लास्टिक मल्चिंग तरबूज की फसल में लगने वाले कीड़ों, बीमारियों और खरपतवारों से बचाती है।
  • काले रंग की पॉलिथीन के द्वारा खरपतवारों का नियंत्रण किया जाता है और साथ ही हवा, बारिश व सिंचाई से होने वाले मृदा कटाव को भी यह रोकती है।
  • पारदर्शी पॉलीथिन का उपयोग मृदा जनित रोगों और नमी संरक्षण को नियंत्रित करने में किया जाता है।
Share