चिबूड आणि कलिंगड पिकामध्ये चिमटी काढणे

  • कलिंगडाच्या रोपाची अतिरेकी वाढ थांबवण्यासाठी चिमटी तयार केल्या जातात
  • कलिंगडाच्या मुख्य खोडावर जेव्हा पुरेशी फळे असतात तेव्हा हे मुख्य जोमदार खोड नीट रहावे म्हणून
  • चिमटीचा उपाय केला जातो
  • चिमटी आणि नको असलेल्या जखमा कापून टाकल्यामुळे फळांना चांगले पोषण मिळते आणि फळे चांगल्या
  • प्रकारे विकसित होतात.
  • जेव्हा एखाद्या वेलीवर अधिक फळे असतात तेव्हा छोटी आणि अशक्त दिसणारी फळे काढून टाका म्हणजे मुख्य
  • फळे अधिक चांगल्या प्रकारे वाढतात.
  • अनावश्यक फांद्या काढल्यामुळे कलिंगडाला उत्तम पोषण मिळते आणि ते वेगाने वाढते.
Share

भोपळा आणि दोडके पिकावरील भोपळी भुंग्याचे नियंत्रण

  • जुन्या पिकाचे अवशेष नष्ट करा
  • पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत हे कीटक दिसले तर ते हाताने पकडून नाहीसे करा.
  •  पिकावर सायपरमेथ्रीन 25% ईसी प्रति एकर 150 मिली+ डायलेटंट30%ईसी प्रतिएकर 300 मिली फवारा किंवा
  • कीटकांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर सुरवातीला पंचवीस दिवसांनी आणि नंतर दर पंधरवड्याला कार्बारील
  • 50%डब्ल्यू पी प्रति एकरी 400 ग्रॅम फवारा प्रति एकरी 250-350 मिली डायक्लोर्वोस (डीडीव्हीपी) 76% ईसी फवारल्यास कीटकांचे समाधान कारक नियंत्रण होते.
Share

भोपळा आणि दोडके पिकामध्ये लाल भोपळा भुंग्याची ओळख

  • अळी वनस्पतीचा जमिनीखालील भाग आणि जमिनीला स्पर्श करणारी फळे खातात.
  • खराब झालेली मुळे आणि संसर्ग झालेला भूमिगत भाग, आणि देठाचा भाग सॅप्रोफेटिक बुरशीच्या दुय्यम संसर्गामुळे सडण्यास सुरवात होते आणि वेलींची फळे सुकू लागतात.
  • संसर्गझालेली फळे मानवी वापरासाठी अयोग्य बनतात.
  •  प्रौढ भुंगे पानाचा पातळ भाग अधाशीपणे खाऊन त्यावर अनियमित आकाराची छिद्रे बनवतात.
  •  त्यांना कोवळी रोपटी आणि कोवळी पाने अधिक आवडतात आणि नुकसान झाल्यामुळे कोवळी रोपे मरू शकतात.
Share

तुम्हाला मोहरी आणि हरभरा पिकाचे नवीन आधारभूत मूल्य माहित आहे का? 

मोहरी आणि हरभरा पिकांच्या काढणीची वेळ आली आहे आणि अशा प्रकारे केंद्र सरकारने या दोन पिकांसाठी आधारभूत किंमत निश्चित केली आहे.  हरभर्‍याची सुधारित आधारभूत किंमत 4875 ठरवण्यात आली आहे तर  मोहरीची आधारभूत किंमत 4425 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

नोंदणीबाबत माहिती

  •       शेतकर्‍यांना नोंदणीसाठी बोटांचे ठसे सादर करावे लागतील.
  •       आधार कार्ड, जनाधार कार्ड / भामाशाह कार्ड, बँक पासबुकची छायाप्रत आणि गिरदावरीच्या पी –35 चा अनुक्रमांक आणि तारीख यासारख्या काही महत्वाच्या कागदपत्रांची छायाचित्र-प्रत शेतकर्‍यांना द्यावी लागेल.
  •       हे लक्षात घ्यावे की फक्त एक शेतकरी एका मोबाइल नंबरसह नोंदणी करू शकतो. नोंदणीसाठी शेतकर्‍याला 31 रुपये द्यावे लागतील.
Share

मध्यप्रदेशातील प्रभावशाली शेतकर्‍यांची कहाणी रुपेरी पडद्यावर दाखविली जाईल. 

मध्यप्रदेश सरकार आणि केंद्र सरकार यांनी अशा शेतकर्‍यांच्या कथेवर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे, की जे अल्प जमिनीवर प्रचंड प्रमाणात पिकांचे उत्पादन करतात.  यातील बहुतेक शेतकरी त्यांच्या छोट्या जमिनीतून लाखोंची कमाई करीत आहेत. 

या पावलामुळे, देशातील इतर लहान शेतकर्‍यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे, जेणेकरून त्यांच्या शेतात या प्रगत शेती पध्दतीद्वारे त्यांना चांगले उत्पादन मिळू शकेल.  हा चित्रपट बनवण्याचे काम गुजरातमधील एका संस्थेला देण्यात आले आहे.  येत्या महिन्यात ही टीम लवकरच शेवपूर येथून आपले संशोधन कार्य सुरू करणार आहे.

डाळिंबाच्या शेतीतून शेतकर्‍याने आपले आयुष्य बदलले.

झैदा गावातील शेतकरी त्रिलोक तोष्णीवाल यांनी आपल्या परिश्रम व धैर्याने आपल्या 8 बीघा खडकाळ जमिनीचे सुपीक जमिनीत रुपांतर केले.  मग त्यांनी या जागेवर डाळिंब व इतर फळझाडे वाढवायला सुरुवात केली आणि आज त्याच जमीनीवर ते दरमहा 15 ते 20 लाख रुपये कमवत आहेत.  आता त्यांची कहाणी चित्रपटात दाखविली जाईल.

पेरूच्या लागवडीने शेतकर्‍याचे नशिब बदलले

मध्य प्रदेशातील ज्वालापूर आणि सोईकाला भागातील अनेक शेतकर्‍यांनी काही वर्षांपूर्वी पारंपारिक शेती सोडून पेरूच्या लागवडीवर आपले लक्ष केंद्रित केले होते.  केवळ 5 ते 8 बीघे जमिनीवरील पेरू लागवडीतून ते दरवर्षी 8 ते 10 लाख रुपये कमवत असल्याने त्यांची मेहनत आता फळाला येण्यास सुरुवात झाली आहे.  त्यांच्या यशाची कहाणीही या चित्रपटात समाविष्ट केली जाईल.

Share

 खरबूज, टरबूज भोपळा इत्यादि  मध्ये फुलांची संख्या वाढवून, शेतकरी अधिक उत्पादन घेऊ शकतात आम्ही

  • खाली दिलेल्या उत्पादनां मधून फुले धारणा वाढवून आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो.
  •  होमोब्रासिनोलाइड 0.04% डब्ल्यू / डब्ल्यू 100-120 मिली प्रति एकर फवारणी करा.
  •  समुद्री शैवालअर्क 180-200 मिली प्रति एकर टाका.
  •  बहुविध सूक्ष्म पोषकद्रव्ये 300 ग्रॅम प्रति एकर वापरा.
  •  या फवारणीचा परिणाम 80 दिवसां पर्यंत वनस्पतीवर राहतो.
Share

भोपळा, टरबूज, खरबूज पिकामध्ये गम्मीस्टेमब्लाइट(बुरशीजन्य देठ कुजण्याचा रोग) या रोगाचे व्यवस्थापन.

  •  निरोगी बियाणे निवडा.
  •  लावलेल्या रोपांचीत पासणी करा आणि संक्रमित झाडे उपटून काढा आणि शेताच्या बाहेर टाका
  •  क्लोरोथालोथिनिल% 75% डब्ल्यूपी @ 350 ग्रॅम / एकर फवारणी कराकिंवा
  •  टेब्यूकोनाझोल25.9% ईसी द्रावण @ 200मिली / एकरद्रावफवारा.
Share

या बदल त्या हंगामाच्या परिणामामुळे भोपळा, तरबूज, खरबूज पिकामध्ये गम्मीस्टेमब्लाइट(बुरशीजन्य देठ कुजण्याचा रोग) रोग कसा ओळखावा.

  •  या आजारात झाडाचे मूळ वगळता सर्व भागामध्ये जंतू संसर्ग होतो.
  •  पिवळसरपणा / हिरवेपणा झाडाच्या पानांच्या कडेला दिसतो, आणि पृष्ठभागडागांनी भरलेला दिसतो.
  •  या रोगाचा संसर्ग झालेल्या झाडाच्या देठावर जखम तयार होते. त्यातून लाल-तपकिरी, काळ्या रंगाचा गोंदा
  • सारखा पदार्थ सोडला जातो.
  •  शिरांवर येणारे तपकिरी रंगाचे डाग नंतर काळ्या रंगाचे होतात जेनंतर जखमे पर्यंत पोचतात.
  •  दुधी भोपळ्याच्या बियांवरमध्यम-तपकिरी, गडदडाग असतात.
Share

खरबूज किंवा चिबुडा वरील शेंडे मर आणि मूळ क्षय रोग यांचे व्यवस्थापन

  • वालुकामय जमिनीत हा रोग जास्त आढळतो.
  • लागण झालेली रोपे आणि त्याचा कचरा नष्ट करावा.
  • रोगमुक्त बियाणे वापरावे.
  • बियाणे पेरण्यापूर्वी त्यावर कार्बेन्डाझिम ची प्रती किलो २ ग्राम या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
  • खरबूज किंवा चिबुडावर हा रोग दिसून आल्यास तिथे प्रोपिकॉनाझोल २५% EC प्रति  एकर ८० ते १०० मिली वापरावे
Share

खरबूज किंवा चिबुडा वरील शेंडे मर आणि मूळ क्षय रोग कसा ओळखावा

  • रोपाच्या शेंड्याला तसेच मुख्य मुळाला प्रामुख्याने वेगळाच अस गडद तपकिरी रंगाचा पेशी नष्ट होऊन सडलेला भाग दिसतो.
  • खोड आणि देठे यातही कुजणे वाढत जाते.
  • परिणाम झालेला भाग मऊ आणि विसविशीत होतो.
  • परिणाम झालेल्या रोपात मरगळलेल्या ची लक्षणे दिसतात.
Share