सरकार सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शिक्षण देत आहे: नरेंद्रसिंग तोमर

आपण इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात जगत आहोत. जवळपास प्रत्येक कंपनी किंवा संस्था या प्लॅटफॉर्मचा त्यांच्या ग्राहकांशी जोडण्यासाठी वापर करीत आहेत. त्याच कार्यक्रमात, सरकार देशातील शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत आहे.

कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, सरकार फेसबुक, ट्विटर, यू- ट्यूब इत्यादी व्यासपीठाचा वापर देशभरातील शेतकऱ्यांना शिक्षित करण्यासाठी करीत आहेत. भारतातील शेतीच्या विकासाविषयी बोलताना तोमर म्हणाले की, “सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुमारे 100 मोबाईल अ‍ॅप्स तयार केले आहेत. हे ॲप्स आयसीएआर, कृषी विज्ञान केंद्र आणि राज्य कृषी विद्यापीठांनी विकसित केले आहेत.”

हे लक्षात घ्यावे की, मागील चार वर्षांपासून ग्रामोफोन देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. आमचे कृषी तज्ञ आमच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे आणि विविध सोशल मीडिया द्वारे शेतकऱ्यांना मौल्यवान मार्गदर्शन करतात. त्यांच्या पिकांच्या कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी शेतकरी आमच्या टोल-फ्री क्रमांकावर देखील कॉल करू शकतात.

Share

चिबूड पिकावरील पाने खाणारी अळी कशी ओळखावी –

  •       पाने खाणारे प्रौढ कीटक लहान काळ्या पिवळ्या माशी प्रमाणे दिसतात
  •       अळ्या त्यांचा विकास पूर्ण झाल्यानंतर पानावरून निघतात आणि पानाच्या आत कोष बनवतात
  •       मादी माश्या पानाला भोके पाडतात, रोपाचा रस शोषून घेतात आणि पानाच्या पेशीमध्ये अंडी घालतात
  •       या नुकसानीमुळे रोपांची वाढ खुंटते परिणामी रोपातला जोम संपून जातो आणि फळांचे उत्पादन कमी येते

·        पानांवर कुरतडल्यासारखे डाग दिसून येते

Share

वेलवर्गीय पिकांमध्ये फळ माशी चे नियंत्रण कसे करावे

pumpkin crop
  •       संसर्ग झालेली फळे गोळा करून नष्ट करावीत
  •       फळ माशी ने अंडी घालू नयेत म्हणून माश्यांचे सापळे (फेरोमोन ट्रॅप) लावता येतात
  •       शेतात मक्याची रोपे लावणे परिणामकारक ठरते कारण माश्या अशा उंच रोपांवर बसतात
  •       फळ माश्यांच्या सुप्त अवस्थेतील कीटक उघड्यावर आणण्यासाठी शेताची खोलवर नांगरट करणे आवश्यक आहे.
  •       प्रतिएकरी 250 ते 500 मिली  डिक्लोर्व्होस 76% ईसी फवारावे किंवा
  •       प्रति एकरी दोनशे मिली लॅंबडा सायहॅलोथ्रिन 4.9% सीएस फवारावे किंवा
  •       प्रत्येक एकरी प्रोफेनोफोस 40% ईसी + सायपरमेथ्रिन 4% ईसी फवारावे
Share

भारतीय सरकारने वर्ल्ड बँकेकडून कृषी विकासासाठी 80 दशलक्ष डॉलर कर्ज घेतले आहे

भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. याचा अर्थ, शेती सुधारणेमुळे अर्थव्यवस्था देखील मजबूत होईल. म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून सरकारने कृषी क्षेत्रावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरूवात केली आहे. याच वेळी हिमाचल प्रदेश सरकारने राज्याच्या कृषी विकासासाठी जागतीक बँकेबरोबर 80 दशलक्ष डॉलर चा कर्ज करार केला.

ही रक्कम प्रामुख्याने हिमाचल प्रदेशच्या विविध ग्रामपंचायतींमध्ये पाणी व्यवस्थापन पद्धती सुधारण्यासाठी आणि कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी खर्च केली जाईल. माध्यमांच्या वृत्तानुसार, 482 ग्रामपंचायतींचा समावेश असलेल्या राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबविला जाईल. याचा फायदा सुमारे 400,000 लघुधारक शेतकऱ्यांना होईल.

हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी  हा प्रकल्प खूप फायदेशीर ठरेल कारण राज्यातील अनेक सखल भागांमध्ये सिंचनासाठी पुरेसे पाणी नसल्याने ते मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. परंतु पावसात सतत होणारी घट आणि हवामानातील बदल हिमाचल प्रदेश मधील फळ उत्पादनावर उदा. सफरचंद यावर परिणाम करत आहे. केंद्र सरकारच्या शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोहिमेस हातभार लावण्यासही ही पायरी मोठी भूमिका बजावू शकते.

Share

प्रधान मंत्री किसान मानधन योजना योजना: शेतकऱ्यांना  दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे

आपल्या देशातील बर्‍याच शेतकर्‍यांना वेगवेगळ्या कारणांमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्याचे वय वाढल्यावर ही समस्या आणखी वाढते. हे लक्षात घेऊन सरकारने पंतप्रधान किसान-मानधन-योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वृद्धापकाळात दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे.

कोण अर्ज करू शकेल?

18 ते 40 वर्षांखालील शेतकरी पंतप्रधान किसान मानधन योजनेसाठी नोंदणी करू शकतात. जर आपण 18 वर्षांचे असाल तर आपल्याला दरमहा फक्त 55 रुपये जमा करावे लागतील. जर आपण 40 वर्षांचे असाल तर आपल्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागेल.

एका मीडिया रिपोर्टनुसार या योजनेंतर्गत 1 लाखाहून अधिक शेतकर्‍यांनी यापूर्वी नावनोंदणी केली आहेत. या योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सरकार देखील आपल्या खात्यात आपण जितकी रक्कम जमा केली आहे तितकी रक्कम जमा करेल.

Share

भोपळ्यावरील फळमाशी कशी ओळखावी

  •       हे किडे फळांना भोके पाडतात आणि आतला रस शोषून घेतात
  •       संसर्ग झालेली फळे खराब होऊन गळून पडतात
  •       या माश्या अंडी घालण्यासाठी कोवळ्या फळांना प्राधान्य देतात
  •       माशी अंडी घालण्यासाठी फळाला भोक पडते या भोकातून फळाचा रस बाहेर येताना दिसतो
  •       यामुळे फळे वेडीवाकडी आणि खराब आकाराची तयार होतात
  •       हे किडे फळांचा गर आणि कोवळ्या बिया खातात त्यामुळे तयार होण्यापूर्वीच फळे गळून पडतात
Share

दुधी भोपळ्यावरील अल्टरनारिया लीफ  ब्लाईट किंवा पानांच्या बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण कसे करावे

image source -https://www.exportersindia.com/saravana-enterprises/fresh-bottle-gourd-dindigul-india-1371932.htm
  •       शेत स्वच्छ ठेवावे आणि आळीपाळीने पिके घेण्याची सवय ठेवावी. त्यामुळे या रोगास प्रतिबंध होतो. 
  •       दर दहा पंधरा दिवसाच्या अंतराने मॅन्कोझेब 75% डब्ल्यू पी प्रति एकरी 400 ग्राम फवारावे किंवा
  •       किटाझिन 48.00 डब्ल्यू /डब्ल्यू प्रति एकरी 400 मिली दर 10-15 दिवसांनी फवारावे
  •       दर दहा दिवसाच्या अंतराने क्लोरोथालोनिल 75% डब्ल्यू पी प्रति एकरी 300 ग्रॅम फवारावे.
Share

 दुधी भोपळ्यावरील अल्टर्नेरिआ लीफ ब्लाईट (पानांचा बुरशीजन्य रोग) कसा ओळखावा?

दुधी भोपळ्यावरील पानांचा बुरशीजन्य रोग खालील लक्षणांवरून ओळखता येतो.

  •      पानांवर सुरुवातीला पिवळे डाग दिसतात ते नंतर तपकिरी रंगाचे होतात आणि जुने झाल्यावर शेवटी काळे बनतात
  •       ते साधारणपणे ते कडेला सुरू होतात आणि एककेंद्रीय वर्तुळे तयार करतात  
  •       खूप जास्त परिणाम झालेल्या वेली जळलेल्या कोळशाच्या प्रमाणे दिसतात
Share

जमीन तपासण्याची उद्दिष्टे

  •  पिकासाठी रासायनिक खते किती प्रमाणात वापरावीत हे निश्चित करण्यासाठी
  •  अल्कधर्मी आणि आम्लधर्मी जमीन सुधारण्याचा बरोबर मार्गकोणता हे माहीत करून घेऊन जमीन सुपीक
  • बनवण्यासाठी
  •  शेतीसाठी जमीन कितपत अनुकूल आहे हे ठरवण्यासाठी 
Share

उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आरोग्यपूर्ण म्हणून ओळखली जाणारी कोरफड

  •  उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये कोरफड आरोग्यपूर्ण म्हणून ओळखली जाते
  •  कोरफडी मध्ये कर्करोगाशी लढण्याची क्षमता आहे
  •  कोरफड हे एक एक नैसर्गिक रेचक आहे
  •  रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते
  •  पोटाचे विकार दूर करून पचन सुधारते
Share