- लागण झालेली रोपे उपटून नष्ट करावीत.
- असिटामिप्रिड 20 % एसपी @ 130 ग्रॅ/ एकर फवारावे.
- फिप्रोनील 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी @ 40 ग्रॅ/ एकर फवारावे.
मिरचीवरील मोसाइक विषाणु चे निदान
- इस वायरस के संपर्क में आने से पत्तियों पर गहरे हरे और पीले रंग के धब्बे निकलते हैं।
- इसके कारण हलके गड्ढे और फफोले भी दिखाई पड़ते हैं।
- कभी-कभी पत्ती का आकार अति सुक्ष्म सूत्रकार हो जाता है।
- यह सफ़ेद मक्खी के माध्यम से फैलता है।
- इस वायरस से ग्रषित पौधों में फूल और फल कम लगते हैं।
- इसके कारण फल भी विकृत और खुरदुरे हो जाते हैं।
Virus problem and solution in mungbean
मुगाच्या पिकातील विषाणूची समस्या आणि उपाय
- मुगाच्या पिकाच्या विकासाच्या दरम्यान पीत केवडा, पर्ण सुरळी, आणि पान सुरकुत्या अशा विषाणूजन्य रोगांची लक्षणे दिसतात.
- रोपाचे वय आणि रोगाच्या लक्षणांची सुरुवात यानुसार विषाणूमुळे मुगाच्या पिकाच्या उत्पादनात 2-95% घट होऊ शकते.
- या रोगांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर 15 दिवसांनी थायमेथोक्साम 25% डब्ल्यूजी @ 60-100 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात पानांवर फवारावे किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल @ 100 मिली प्रति एकर या प्रमाणात पानांवर फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareControl of mosaic virus in watermelon
कलिंगडावरील केवडा रोगाच्या मोझेक व्हायरसचे नियंत्रण
- या रोगाची सुरुवातीची लक्षणे पानांवर दिसतात आणि नंतर देठ आणि फळांवर देखील पसरतात.
- ग्रस्त रोपांच्या फळांचा आकार बदलतो. फळे लहान राहतात आणि फांद्यांवरून गळून पडतात.
- हा रोग माव्याद्वारे पसरतो.
- या रोगापासून बचावासाठी पीक चक्र अवलंबावे आणि रोगमुक्त बियाणे वापरावे.
- रोगग्रस्त रोपे उपटून नष्ट करावीत.
- इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल @70-100 मिली/एकर फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareControl of mosaic in tomato
टोमॅटोमधील केवडा रोगाच्या मोझेक व्हायरसचे नियंत्रण
- पानांचा सामान्य हिरवा रंग बदलून फिकट पिवळे अनियमित आकाराचे डाग उमटतात.
- पाने करड्या रंगाची, क्लोरोफिल विहीन, आकाराने लहान होतात आणि फळे नष्ट होतात.
- बियाणे नेहमी रोगमुक्त झाडांपासून गोळा करावे.
- नर्सरीमध्ये निर्जलीकृत माती बियाणे/ रोपे तैय्यार करण्यासाठी वापरावी.
- रोगग्रस्त रोपे उपटून नष्ट करावीत.
- इमिडाक्लोप्रिड (17.8% SL) @ 100-120 मिली प्रति एकर किंवा अॅसीफेट (75% SP ) @ 140- 200 ग्रॅम प्रति एकर वापरावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareManagement of mosaic virus in bottle gourd
दुधी भोपळ्यातील केवडा रोगाचे नियंत्रण
- रोपे पुर्णपणे सुकतात. पानांवर पिवळे डाग पडतात.
- रोपाची पाने खालील बाजूला मुडपतात आणि त्यांचा आकार सर्वसामान्य पानांहून लहान असतो.
- फळांचा आकार बदलून लहान होतो. हा रोग माव्याद्वारे फैलावतो.
नियंत्रण: –
- तण आणि रोगग्रस्त रोपे उपटल्याने संक्रमणाची शक्यता कमी होते.
- रोग प्रतिरोधक वाणे वापरुन काही शेतकरी विषाणूचा फैलाव रोखतात.
- इमिडाक्लोप्रिड (17.8% SL) @ 100-120 मिली प्रति एकर किंवा अॅसीफट (75% SP ) @ 140- 200 ग्रॅम प्रति एकर वापरुन रोग फैलावणार्या किडीचे नियंत्रण करावे.
Share
Yellow Mosaic Virus in Legumes crops
द्विदल धान्यांच्या पिकावरील केवडा रोग (पिवळा मोझेक व्हायरस)
केवडा रोग (पिवळा मोझेक व्हायरस):- केवडा रोगाचा (पिवळा मोझेक व्हायरस) उपद्रव मुख्यत्वे खरीपाच्या हंगामात सोयाबीन, उडीद, मूग आणि इतर काही पिकांमध्ये होतो. सोयाबीन, उडीद इत्यादि पिकांची केवडा रोगामुळे मोठी हानी होते. त्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. हा रोग 4-5 दिवसात शेतात सर्वत्र पसरतो आणि पीक पिवळे पडू लागते. या रोगाच्या प्रसारात पांढर्या माशीचा महत्वाचा सहभाग असतो.
रोग पसरण्याची मुख्य कारणे:-
- रस शोषणारी कीड आणि पांढरी माशी या विषाणुजन्य रोगाचा प्रसार करते.
- योग्य ते बीजसंस्करण न करणे, माहितीचा अभाव आणि दीर्घकाळ पडलेला दुष्काळ हे घटक देखील विषाणूच्या प्रसारास जबाबदार असतात.
- कीटकनाशकांचा अतिवापर, योग्य माहिती नसताना औषधांचे मिश्रण फवारणे.
- योग्य ते पीक चक्र स्वीकारण्यातील शेतकर्यांचे अपयश याचे मुख्य कारण असते.
- शेताभोवतीच्या बांधांची साफसफाई न करण्याने देखील रोगाचा फैलाव होतो.
- पांढरी माशी रोपच्या पानावर बसून रस शोषते आणि तेथेच लाळ गाळते. त्यामुळे रोगाचा प्रसार वाढतो.
रोगाची लक्षणे:-
- सुरुवातीच्या काळात गडद पिवळे दाग दिसू लागतात.
- रोगग्रस्त रोपांची पाने पिवळी पडतात.
- रोगग्रस्त रोपांच्या पानांमधील शिरा स्पष्ट दिसू लागतात.
- रोपांची पाने खरखरीत होतात.
- ग्रस्त रोप खुरटते.
प्रतिबंधाचे उपाय :-
यांत्रिक पद्धती:-
- सुरुवातीलाच ओगग्रस्त रोपांना उपटून जाळून टाकावे.
- शेतातील पांढर्या माशीला आकर्षित करण्यासाठी प्रत्येक हेक्टरात 5-6 पिवळ्या रंगाचे चिकट सापळे लावावेत.
- पिकाच्या चहुबाजूला झेंडूची लागवड करून सापळा रचावा.
जैविक पद्धत:-
- सुरुवात होताच रोपांवर प्रत्येक हेक्टरसाठी 1-1.5 ली.निंबोणीचे तेल+चिकट पदार्थ+200-250 ली. पाण्याच्या मिश्रणाच्या मात्रेची फवारणी करावी.
- 2 किलो शेवग्याची पाने बारीक वाटून 5 ली. गोमूत्र आणि 5 ली. पाण्यात मिसळून ठेवावे. 5 दिवसांनी हे मिश्रण गाळून घ्यावे. 500 मिलीलीटर मिश्रण 15 लीटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे. हे पिकासाठी टॉनिक म्हणून कार्य करते.
रासायनिक पद्धत:-
- डायमिथिएट 250-300 मिलीलीटर किंवा थायोमेथाक्सोम 25WP 40 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 SL 40 मिलीलीटर किंवा अॅसिटामाप्रीड 40 ग्रॅम प्रति एकर 200-250 लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareManagement of Mosaic Virus Disease in Sponge Gourd
घोसाळ्यातील में केवडा रोगाचे (मोझेक व्हायरस) नियंत्रण:-
- रस शोषणारे एफिड, पांढरी माशी किंवा लाल किडे या विषाणुजन्य रोगाचा प्रसार करतात.
- ग्रस्त वेलींच्या नव्या पानांच्या शिरांमध्ये पिवळटपणा दिसतो आणि पानांची वरील बाजूस सुरळी होते.
- जुन्या पानांवर गडद रंगाची बुरशीसारखी आकृती उठते. ग्रस्त पानांच्या सांगाड्याची जाळी रहाते.
- वेली खुरटतात. रोगाने वेलींची वाढ, फुले-फळे आणि उत्पादनावर दुष्परिणाम होतो.
- तीव्र रोगग्रस्त वेलींवर फळे धरत नाहीत.
नियंत्रण:-
- तणासारखे शेतातील रोगाचे अन्य स्रोत उपटून नष्ट करावेत.
- पीकचक अवलंबावे.
- मोझेकसाठी संवेदनशील हंगाम आणि भागात पिकाची लागवड करू नये.
- 10-15 दिवसांच्या आतराने डायमिथोएट 30% EC 30 मिली. प्रति पम्प फवारावे. त्याचबरोबर स्ट्रेप्टोमायसीन 2 ग्रॅम प्रति पम्प फवारावे आणि सुरुवातीच्या संक्रमणापासून पिकाचा बचाव करावा.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
ShareManagement of Mosaic Virus in chilli
मिरचीमधील केवडा रोगाचा (मोझेक विषाणू) बंदोबस्त
लक्षणे:-
- पानांवर गडद हिरवे आणि पिवळे डाग पडणे हे रोगाचे मुख्य लक्षण आहे.
- उथळ खड्डे आणि फोड देखील आढळून येतात. |
- कधीकधी पानाचा आकार बदलून त्यांची लहान गुंडाळी होते.
- लागण झालेल्या रोपांना फुले आणि फळे कमी लागतात.
- फळे विकृत आणि खडबडीत होतात.
प्रतिबंध:-
- लागण झालेली रोपे उपटून नष्ट करावीत.
- पूसा ज्वाला, पन्त सी-1, पूसा सदाबहार, पंजाब लाल इत्यादी प्रतिरोधक वाणे वापरावीत.
- डायमिथोएट चे 2 मिली/लीटर मात्रेत मिश्रण बनवून योग्य त्या अंतराने फवारावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share