धुके, त्यापासून होणारी हानी आणि बचाव
डॉ. शंकर लाल गोलाडा
धुके आणि थंडीच्या लाटेपासून पिकाचे रक्षण कसे करावे
धुक्याच्या प्रभावामुळे रोपांची पाने आणि फुलोरा जळून जातो आणि नंतर गळून पडतो. एवढेच नाही तर अर्धवट पिकलेली फळेही आकसतात. त्यांच्यावर सुरकुत्या पडतात आणि कळ्या गळून पडतात. शेंगांमधे दाणे भरत नाहीत आणि बनत असलेले दाणे आकसतात. दाणे लहान होतात आणि त्यांच्या वजनात घट होते. रब्बीच्या मोसमात पिकाला फुलोरा येण्याच्या आणि शेंगा लागण्याच्या आणि त्यांचा विकास होण्याच्या हंगामात धुके पडण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळे त्या काळात शेतकर्यांनी सावध राहून पिकच्या संरक्षणासाठी उपाययोजना करणे आवश्यक असते. धुके पडण्याची लक्षणे सर्वप्रथम मांदार इत्यादि वनस्पतींवर आढळून येतात. हिवाळ्यात धुक्याचा रोपांवर जास्त प्रभाव पडतो.
धुके केव्हा पडते: – तापमान 0 डिग्री सेल्सियसहून खाली जाते आणि वारा थांबतो तेव्हा रात्री धुके पडण्याची शक्यता असते. सामान्यता धुके पडण्याबाबतचा अंदाज वातावरणावरून बांधता येतो. हिवाळ्यात ज्या दिवशी रोज दुपारपूर्वी थंड हवा असते आणि हवेचे तापमान गोठणबिन्दुच्या खाली जाते, दुपारनंतर अचानक वारा वाहने बंद होते आणि आभाळ निरभ्र असते किंवा मध्यरात्रीपासूनच वारा वाहणे थांबते त्या दिवशी धुके पडण्याची शक्यता जास्त असते. रात्रीच्या तिसर्या आणि चौथ्या प्रहरात धुके पडण्याची शक्यता जास्त असते. सामान्यता तापमान कितीही खाली गेले तरीदेखील थंडीची लाट वार्याच्या स्वरुपात चालू असल्यास नुकसान होत नाही. परंतु वारा वाहणे मध्येच बंद झाल्यास आणि आभाळ निरभ्र झाल्यास पिकांसाठी हानिकारक धुके पडते.
थंडीची लाट आणि धुक्यापासून पिकाच्या सुरक्षिततेसाठी उपाय:-
शेताला पाणी देणे आवश्यक:- धुके पडण्याची शक्यता असल्यास किंवा हवामान खात्याने धुक्याचा इशारा दिलेला असल्यास पिकास थोडे पाणी द्यावे. त्यामुळे तापमान 0 डिग्री सेल्सियसहून खाली जाणार नाही आणि पिकाला धुक्यापासून होणार्या हानीपासून वाचवता येईल. शेतात पाणी सोडल्याने तापमान 0. 5 – 2 डिग्री सेल्सियस पर्यन्त वाढते.
रोपे झाकून ठेवावी:- धुक्यापासून सर्वाधिक नुकसान नर्सरीत होते. नर्सरीत रोपांना रात्री प्लॅस्टिकच्या चादरीने झाकण्याचा सल्ला दिला जातो. असे करण्याने प्लास्टिकमधील तापमान 2.3 डिग्री सेल्सियस वाढते. त्यामुळे जमीनीवरील तापमान गोठणबिंदुपर्यंत पोहोचत नाही आणि रोपे धुक्यापासून वाचतात. पॉलीथीनऐवजी पेंढा देखील वापरता येतो. रोपांना सकाळी आणि दुपारी सूर्यप्रकाश मिळण्यासाठी त्यांचा दक्षिण भाग उघडा राहील याची खबरदारी रोपे झाकताना घेणे आवश्यक असते.
शेताजवळ धूर करावा:- पिकाला धुक्यापासून वाचवण्यासाठी शेतात धूर करावा. त्यामुळे तापमान गोठणबिन्दुजवळ पोहोचत नाही आणि धुक्यापासून हानी होणे टळते.
रासायनिक उपचार:- ज्या दिवशी धुके पडण्याची शक्यता असेल त्या दिवशी पिकावर गंधकाच्या आम्लाच्या 0.1 टक्के मिश्रणाची फवारणी करावी. त्यासाठी एक लीटर गंधकाचे आम्ल 1000 लीटर पाण्यात मिसळून प्लॅस्टिकच्या स्प्रेने एक हेक्टर भागात फवारावे. रोपांवर फवारणी चांगल्या प्रकारे होईल याची खबरदारी घ्यावी. फवारणीचा परिणाम दोन आठवडे टिकतो. त्यानंतरही थंडीची लाट आणि धुके पडण्याची शक्यता असल्यास गंधकाच्या आम्लाची फवारणी दर पंधरा दिवसांनी करावी.
>>>सल्फर 90 % WDG पावडर एकरी 3 किलोग्रॅम या मात्रेत फवारून पाणी द्यावे.
>>> सल्फर 80% WDG पावडर 40 ग्रॅम प्रति पंप (15 लीटर पाणी) मिसळून फवारणी करावी.
दीर्घकालिन उपाय: – पिकाचा बचाव करण्यासाठी शेताच्या उत्तर-पश्चिम दिशेच्या बांधावर आणि मध्यभागी ठिकठिकाणी वार्याला प्रतिरोध करणारी तुती, शिसव, बाभूळ, शमी, जांभूळ इत्यादि झाले लावल्यास गार हवेच्या झुळुकांपासून पिकाचा बचाव होऊ शकतो.
स्रोत:- https://www.krishakjagat.org
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share