जैव जिवाणूनाशक ट्रायकोडर्मा:- वापर आणि लाभ
रोगांच्या, विशेषता मृदाजन्य रोगांच्या, प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा उत्तम जैविक माध्यम आहे. ती एकप्रकारची मुक्त जीवित बुरशी असून सामान्यता माती आणि मूळसंस्थेत असते.
ट्रायकोडर्माचे लाभ:-
रोग नियंत्रण, रोपांच्या वृद्धिस पोषक, रोगांसाठी जैव रासायनिक रोधक, ट्रान्सजेनिक रोपे आणि जैव उपचार।
वापराची पद्धत:-
बीजसंस्करण:- पेरणीपुर्वी बियाण्यात 6-10 ग्रॅम/ किलो या प्रमाणात ट्रायकोडर्मा मिसळावी.
नर्सरीतील उपचार:- नर्सरीच्या 100 वर्ग मी. आकाराच्या वाफ्यामध्ये 10-25 ग्रॅम ट्रायकोडर्मा मिसळावी.
कलमे आणि रोपांचा उपचार:- 10 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति ली. पाण्याचे मिश्रण बनवून कलमे आणि रोपे त्यात 10 मिनटे ठेवून अशा प्रकारे उपचार केलेली कलमे आणि रोपे लागवडीसाठी वापरावीत.
मृदा उपचार:- 1 किलो ट्रायकोडर्मा 100 किलो शेणखतात मिसळून पॉलीथिनने 7 दिवस झाकून ठेवावे. त्यावर अधूनमधून पाणी घालावे आणि 3-4 दिवसांनी पलटावे. 7 दिवसांनंतर शेतात भुरभुरावे.
रोपाचा उपचार:- एक लीटर पाण्यात 10 ग्रॅम ट्रायकोडर्मा मिसळून रोपांजवळ खोडाच्या सर्व बाजूंवर आणि जमीनीवर शिंपडावे.
खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.
Share