Management of melon worm in watermelon

कलिंगडातील फळ पोखरणार्‍या किडीचे नियंत्रण

  • अळ्या पाने आणि फुले खातात.
  • कधीकधी अंड्यातून निघाल्यावर लगेचच या किडीचे भुंगे/ अळ्या फळात प्रवेश करून हानी पोहोचवतात.
  • प्रभावी नियंत्रणासाठी पेरणीपुर्वी शेतात खोल नांगरणी करून किड्यांचे कोश नष्ट करावेत.
  • या किड्यांची संख्या उन्हाळ्यात घटते. त्यानुसार पेरणीची वेळ ठरवावी.
  • तणाचे योग्य प्रकारे नियंत्रण करावे.
  • सायपरमेथ्रिन 10% ईसी @ 350-500 मिली/ एकर फवारावे.
  • किंवा फिप्रोनिल 5% एससी @ 250-300 मिली/ एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of anthracnose in cowpea

चवळीवरील क्षतादि रोगाचे नियंत्रण

  • या रोगाने चवळीची पाने, खोड आणि शेंगांवर परिणाम होतो.
  • लहान-लहान लाल-राखाडी रंगाचे डाग शेंगांवर उमटतात आणि वेगाने वाढतात.
  • आर्द्र हवामानात या डागात गुलाबी रंगाचे जिवाणू वाढतात.
  • रोगमुक्त प्रमाणित बियाणी वापरावीत.
  • रोगग्रस्त शेतात किमान दोन वर्षे चवळी लावू नये.
  • रोगग्रस्त रोपांना उपटून नष्ट करावे.
  • कार्बोक्सिन 37.5 + थायरम  37.5 @ 2.5 ग्रॅम/ किलोग्रॅम बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • मॅन्कोझेब 75% डब्ल्यू पी @ 400-600/एकर पाण्यात मिसळून दर आठवड्याला फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Hormone application in brinjal

वांग्यात हार्मोन्सची फवारणी

  • वांग्याचे उत्पादन वाढवण्यासाठी वृद्धि नियंत्रके वापरली जातात.
  • पेरणीनंतर 45-50 दिवसांनी वांग्याच्या पिकावर फुलोरा येणे सुरू होते.
  • होमोब्रासिनोलॉइड 0.04% डब्लू/डब्लू 100-120 मिली./एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Spacing in cowpea

चवळीच्या रोपांमधील अंतर

  • झाडे येणार्‍या वाणांची पेरणी करताना 30 से.मी.X 15 से.मी. अंतरावरील आळ्यांमध्ये 1-2 बिया पेराव्यात.
  • अर्धवट वेली येणार्‍या वाणांची पेरणी करताना 45 सेमी. X 30 सेमी. अंतर राखावे.
  • वेली येणार्‍या वानाची पेरणी करताना 45-60 सेमी. व्यासाचे 30-45 सेमी. खोल खड्डे 2 X 2 मी. अंतरावर खणावेत आणि प्रत्येक खड्ड्यात 3 रोपे लावावीत.
  • पावसाळ्यात बियाणे 90 से.मी. रुंद आणि जमिनीपासून उंचावर असलेल्या वाफ्यात पेरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of downy mildew in bottle gourd

दुधी भोपळ्यावरील काळ्या बुरशीचे नियंत्रण

  • पानांच्या खालील बाजूच्या पृष्ठभागावर शुष्क डाग उमटतात.
  • पानांच्या वरील पृष्ठभागावर तसेच डाग उमटतात.
  • सर्वात आधी डाग जुन्या पानांवर उमटतात आणि हळूहळू ते नव्या पानांवर उमटतात.
  • ग्रस्त वेलांवर फलधारणा होत नाही.
  • प्रभावित पाने तोडून नष्ट करावीत.
  • रोग प्रतिरोधक वाणे लावावीत.
  • पीक चक्र अवलंबून आणि शेताची सफाई करून रोगाची आक्रमकता कमी करता येते.
  • मॅन्कोझेब 75% WP @ 400-600  ग्रॅम/ एकर किंवा क्लोरोथालोनिल 75% WP @ 200-250 ग्राम/ एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land preparation in cowpea

चवळईसाठी शेताची मशागत

  • चांगल्या उत्पन्नासाठी शेतात एकदा खोल नांगरणी करून आणि 2-3 वेळा वखर फिरवून माती भुसभुशीत करून घ्यावी.
  • शेताला सोयिस्कर आकाराच्या भूखंडात विभाजित करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of fruit fly in snake gourd

काकडीवरील फळ पोखरणार्‍या माशीचे नियंत्रण

  • अळ्या फळांना भोक पाडून रस शोषतात.
  • ग्रस्त फळे खराब होऊन गळतात.
  • माशी अंडी देण्याच्या भागाने फळात भोक पासून त्यांना हानी पोहोचवते. या भोकांमधून फळांचा रस गळताना दिसतो.
  • ग्रस्त फळे एकत्र करून नष्ट करावीत.
  • परागण झाल्यावर लगेच तयार होणार्‍या फळांना पाँलीथीन किंवा कागदात गुंडाळावे.
  • माशांचे नियंत्रण करण्यासाठी शेतात शेतात रांगांच्या मध्ये मका लावावा. मक्याच्या रोपांची ऊंची जास्त असल्याने माशी त्यांच्या पानाखाली अंडी घालते.
  • ज्या भागात फळमाशीचा हल्ला तीव्र असेल तेथे कार्बारिल 10%  भुकटी मातीत मिसळावी.
  • डायक्लोरोवास कीटकनाशकाचे 3 मिली. प्रति ली. पाण्यात मिश्रण बनवून फवारावे.
  • उन्हाळ्यात खोल नांगरणी करून जमिनीतील माशीला सुप्तावस्थेत नष्ट करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrition management in cowpea

चवळईसाठी शेताची मशागत

  • चांगल्या उत्पन्नासाठी शेतात एकदा खोल नांगरणी करून आणि 2-3 वेळा वखर फिरवून माती भुसभुशीत करून घ्यावी.
  • शेताला सोयिस्कर आकाराच्या भूखंडात विभाजित करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation management in muskmelon

खरबूजात सिंचनाची आवश्यकता

  • उन्हाळ्यात दर आठवड्याला सिंचन करावे.
  • सिंचन हलके असावे.
  • फळे परिपक्व होण्याच्या वेळी अत्यावश्यक असेल तरच सिंचन करावे.
  • सिंचन करताना फळ जास्त वेळ ओलीत राहणार नाही अशी खबरदारी घ्यावी. जास्त वेळ ओलीत फळे राहिल्याने ती कुजतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share