Management of Ascochyta foot rot and blight in Pea

  • निरोगी बियाणे वापरावे आणि पेरणीपूर्वी कार्बेन्डाझिमची 2.5 ग्रॅम/ किग्रॅ मात्रा वापरून बीजप्रक्रिया करावी 
  • लागण झालेल्या पिकावर कार्बेन्डाझिम 12 % + मॅन्कोझेब 63 % @ 300 ग्रॅ/ एकर किंवा 
  • क्लोरोथ्रलोनिल 75% WP @ 250 ग्रॅ/ एकर किंवा 
  • किटॅझिन 48.0 w/w @ 400 मिलि/ एकर फवारावे.
  • रोगग्रस्त रोपे उपटून नष्ट करावीत.  
  • शेतात पाण्याचा निचरा करण्याची योग्य ती व्यवस्था करावी. 

Share

Ascochyta foot rot and blight in pea 

  • पानांवर लहान, जांभळ्या रंगाचे डाग पडतात. ते वाढून निश्चित कडा असलेल्या चट्ट्यांमध्ये रूपांतरित होऊ शकतात.
  • असेच व्रण खोडावर पडतात आणि आणि ते वाढून आणि त्यांचा रंग काळपट होऊन खोड तपकिरी रंगाचे होते किंवा काळे पडते. 
  • शेंगांवरील व्रण  करड्या किंवा तपकिरी रंगाचे आणि अनियमित आकाराचे, गडद रंगाच्या कडा असलेले असतात.

Share

Control of leaf miner in pea

सिस्टिमिक कीटकनाशकाची फवारणी करा

  •       डेल्टामेथ्रीन २.८ इसी @ २०० मिली/ एकर किंवा
  •       ट्रायझोफॉस ४०%  इसी @ ३५०-५०० मिली/ एकर किंवा
  •       क्लोरपायरीफॉस २०% इसी @ ५०० मिली/ एकर किंवा
  •       कारटॅप हायड्रोक्लोराइड ५०% एस पी @ २५० ग्राम/ एकर हे शिफारस केले आहे.

 

खालील बटणावर क्लिक करुन लाईक करा आणि इतर शेतकर्यांना पाठवा.

Share

Leaf miner in pea

  • प्रौढ माशी गडद हिरव्या रंगाची असते.
  •  वाटाण्याच्या पानांवर अळी हल्ला करते आणि पानांवर पांढऱ्या रंगाच्या नागमोडी ओळी तयार करते.
  •  वाढ खुंटते. रोगग्रस्त रोपांच्या फुल आणि फळ धारणा क्षमतेवर विपरित परिणाम होतो.

खालील बटणावर क्लिक करुन लाईक करा आणि इतर शेतकर्यांना पाठवा.

Share

Control of Anthracnose in Cucumber

काकडीवरील क्षतादि रोगाचे (अ‍ॅन्थ्रेक्नोज) नियंत्रण

  • शेतात स्वच्छता राखा आणि उचित पीक चक्र वापरुन रोगाचा फैलाव रोखा.
  • कार्बोंन्डाझिम 50% डब्ल्युपी5 ग्रॅम प्रति किलो बियाणे वापरुन बीजसंस्करण करा.
  • 10 दिवसांच्या अंतराने मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 400 ग्रॅम प्रति एकर किंवा क्लोरोथालोनिल 75% डब्ल्यूपी @ 300 ग्रॅम प्रति एकरचे मिश्रण फवारा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Anthracnose disease in Cucumber

काकडीवरील क्षतादि रोग

  • या रोगाची लक्षणे पाने, पल्लव, खोद आणि फळांवर दिसतात.
  • नव्या फळांवर अंडाकृती कोरडे डाग पडतात. ते एकमेकात मिसळून मोठे चट्टे तयार होतात.
  • अत्यधिक दमट हवेत डागांमध्ये गुलाबी रंगाच्या जिवाणूंचा समूह दिसतो.
  • डागांमधून गुलाबी चिकटा स्रवू लागतो. त्यावर रोगाचे बीजाणु  उत्पन्न होतात.
  • वेलींवर राखाडी चट्टे पडतात. त्यांच्यावर शंकाकृती आणि गोलाकार डाग पडतात.
  • या रोगाने प्रभावित भागांवर क्षतादि रोगासारखी लक्षणे दिसू लागतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Symptoms and control of Fusarium wilt in Okra

फ्यूजेरियम मर रोगापासून भेंडीच्या पिकाचा बचाव

  • प्रारंभिक अवस्थेत रोप तात्पुरते सुकते पण रोगाचा प्रभाव वाढल्यावर रोप कायमचे सुकते.
  • ग्रस्त रोपांची पाने पिवळी पडतात.
  • बुरशी मूळसंस्थेवर हल्ला करून संवहन उतींवर वसाहत बनवते.
  • त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचे वहन थांबते आणि बुरशीच्या विषाच्या प्रभावामुळे संवहन उती आणि कोशिका काम करणे थांबवतात.
  • ग्रस्त रोपाचे खोड कापल्यास मध्यभाग गडद राखाडी रंगाचा दिसतो.

नियंत्रण

  • सतत एकाच शेतात भेंडीची लागवड करू नये.
  • कार्बोक्सिन 37.5% + थायरम 37.5% @ 2-3 ग्रॅम/ किलोग्रॅम बियाणे किंवा थायोफनेट मिथाइल 45% WP + पायरक्लोस्ट्रोबिन 5% FS @ 2 ग्रॅम/ किलोग्रॅम बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • थायोफनेट मिथाइल 70% WP @ 400 ग्रॅम/ एकर या प्रमाणात फवारावे.
  • एझोक्सिस्ट्रोबिन 18.2% + डेफ़नकोनाज़ोल 11.4% एससी @ 200 मिली/ एकर वापरावे.
  • जैविक प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा विरिडीने ड्रेंचिंग आणि पानांवर फवारणी करावी. त्याचा वापर पिकातील जवळपास सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी करता येतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Fruit Rot in Brinjal

वांग्यातील फळ कूज रोगाचे नियंत्रण

नियंत्रण:-

  • रोपांच्या रोगग्रस्त पाने आणि इतर भागांना तोडून नष्ट करा.
  • पिकावर मॅन्कोझेब @ 400 ग्रॅम/ एकर, किंवा जिनेब @ 400 ग्रॅम किंवा केप्टॉन + हेक्झाकोनाझोल @ 250 ग्रॅम/ एकर या प्रमाणात 10 दिवसांच्या अंतराने फवारा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fruit Rot in Brinjal

वांग्यातील फळ कूज रोगाचे निदान

लक्षणे:-

  • जास्त दमटपणा या रोगाच्या विकासास सहाय्यक ठरतो.
  • फळांवर जळाल्याचे कोरडे डाग पडतात. ते हळूहळू इतर फळांवर पसरतात.
  • रोगग्रस्त फळांच्या वरील भागाचा रंग तपकिरी होते आणि त्याच्यावर पांढरी बुरशी येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Eriophyid mite in Garlic and Onion

लसूण आणि कांद्याच्या पिकातील कोळी (एरिओफाइड) किडीचे नियंत्रण

  • शिशु आणि वाढ झालेले किडे कोवळी पाने आणि कळ्यांच्या मधून रस शोषतात. पाने पूर्ण विकसित होत नाहीत. संपूर्ण रोप लहान, वाकडे होते आणि त्याच्यावर पिवळे डाग पडतात.
  • पानांच्या कडांवर जास्त डाग दिसतात.
  • किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी विरघळणारे सल्फर 80% चे 3 ग्रॅम प्रति लीटर या प्रमाणात मिश्रण बनवून फवारा.
  • हल्ला तीव्र असल्यास प्रॉपरझाईट 57% 400 मिली. प्रति एकर या प्रमाणात 7 दिवसांच्या अंतराने दोनदा फवारा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share