Control of Red Pumpkin Bettle in Watermelon

कलिंगडावरील लाल किड्यांचे नियंत्रण:-

  • अंड्यातून निघालेले ग्रब मुळे, भूमिगत भाग आणि जमिनीच्या संपर्कात येणारी फळे खातात.
  • ग्रसित मुळे आणि भूमिगत भागावर त्यानंतर मृतजीवी बुरशी हल्ला करते. त्यामुळे अपरिपक्व फळे आणि वेली सुकतात.
  • ग्रसित फळे वापरास निरुपयोगी असतात.
  • बीटल पाने खाऊन त्यात भोके पाडतात.
  • लहान असताना बीटलचा हल्ला झाल्यास ते कोवळी पाने खाऊन हानी करतात. त्याने रोपे मरतात.

नियंत्रण:-

  • खोल नांगरणी केल्याने जमिनीतील प्यूपा किंवा ग्रब उघडे पडतात आणि सूर्यकिरणांनी मरतात.
  • बियाण्याच्या अंकुरणानंतर रोपाच्या सर्व बाजूंनी जमिनीत कारटाप हायड्रोक्लोराईड 3 G चे दाणे पेरावेत.
  • बीटल एकत्र करून नष्ट करावेत.
  • सायपरमेथ्रिन (25 र्इ.सी.) 1 मि.ली. प्रति लीटर पाणी + डायमिथोएट 30% ईसी. 2  मि.ली. प्रति लीटर पाणी या मिश्रणाची फवारणी करावी किंवा कार्बारिल 50% WP 3 ग्राम प्रति ली पाण्यात मिसळून फवारावे. पहिली फवारणी रोपणानंतर 15 दिवसांनी आणि दुसरी त्यानंतर 7 दिवसांनी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Powdery Mildew of Watermelon

कलिंगडामधील भुरी (पावडर मिल्ड्यु) रोग:-

  • पानांवर पांढरे किंवा धुरकट रंगाचे डाग उमटतात आणि ते वाढून पांढर्‍या रंगाची भूकटी बनते.
  • दर 15 दिवसांनी हेक्झाकोनाझोल 5% SC 300 मिली. प्रति एकर किंवा थायोफिनेट मिथाईल 400 ग्रॅम प्रति एकरचे मिश्रण फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of Aphids on Bottle Gourd

दुधीभोपळ्यावरील मावा रोगाचे नियंत्रण

रोगग्रस्त भाग पिवळा पडून आकसतो आणि त्याची सुरळी होते. हल्ला तीव्र असल्यास पाने सुकतात आणि हळूहळू रोप वाळते.

माव्याचा हल्ला लक्षात येताच डायमिथोएट 30 मिली. प्रति पम्प किंवा इमीड़ाक्लोरप्रीड 17.8% SL 10 मिली. प्रति पम्प दर 15 दिवसांनी फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Spacing of Cucumber

काकडी-खिर्‍याच्या वेलींमधील अंतर:-

  • दोन रोपातील अंतर 1 ते 1.5 मीटर राहील अशा प्रकारे बियाणे सरींमध्ये पेरले जाते.
  • काकडी-खिर्‍याची शेती मांडव उभारून केली जाते तेव्हा दोन रोपातील अंतर 3*1 मीटर ठेवले जाते.
  • बियाणे 0.5 ते 75 मीटर अंतरावर पेरले जाते तेव्हा प्रत्येक खड्ड्यात 4-6 बिया पेरतात. सर्व बिया उगवून आल्यावर त्यातील दोनच रोपांना वाढीसाठी ठेवले जाते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Season of planting of French bean

फरसबी च्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ:-

  • खरीपाच्या पिकाची पेरणी जून ते जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत केली जाते.
  • हिवाळी पिकाची पेरणी सप्टेंबर महिन्याच्या शेवतापासून ते ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाते.
  • उन्हाळी पिकाची पेरणी जानेवारीच्या शेवटापासून ते फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Field preparation of Cucumber

काकडी-खिर्‍यासाठी शेताची मशागत

  • सुरूवातीला माती मोकळी करण्यासाठी शेताची 4-5 वेळा नांगरणी केली जाते आणि शेवटच्या नांगरणीपुर्वी 20-25 टन उत्तम शेणखत मातीत मिसळले जाते.
  • जमिनीत निमेटोड किंवा पांढर्‍या मुंग्या किंवा लाल मुंग्याचा उपद्रव असल्यास कार्बोफुरान ची 25 कि.ग्राम प्रति हेक्टर मात्रा फवारावी.
  • शेताला सपाट करण्यासाठी 60 से.मी. रुंदीच्या नळ्या एकमेकांपासुन 2.5  से.मी. अंतरावर कराव्यात.
  • नळयांची लांबी सिंचनाचे स्रोत, हवामान, पाऊसमान आणि जमिनीच्या पोतावर अवलंबून असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Time of sowing of Cowpea

चवळीच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ:-

  • बहुतेक भागात चवळीची पेरणी उन्हाळा आणि पावसाळ्यात केली जाते.
  • खरीपाच्या पिकासाठी पोल टाईप वाणे जून- जुलैमध्ये पेरतात तर इतर वाणांची पेरणी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये केली जाते.
  • उन्हाळी पिकाची पेरणी फेब्रुवारी – मार्च मध्ये करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrient management of Cabbage

पानकोबीच्या शेतातील पोषक तत्वांचे व्यवस्थापन:-

  • पानकोबीची लागवड करण्यासाठी सर्वाधिक पोशाक तत्वांची आवश्यकता असते.
  • उर्वरकांची मात्रा जमिनीचा पोत आणि कार्बनिक पदार्थांच्या वापरावर ठरते.
  • रोपे लावण्यापूर्वी 4 आठवडे 15-20 टन शेणखत मातीत मिसळले जाते.
  • चांगल्या उत्पादनासाठी उर्वरकांच्या मात्रेबाबत शिफारस – सामान्य वाणांसाठी 100 किलो नत्र, 60 किलो फॉस्फरस आणि 100 किलो पोटाश प्रति हेक्टर, संकरीत जातींसाठी 120-180 किलो नत्र 60 किलो फॉस्फरस आणि 100 किलो पोटाश प्रति हेक्टर|
  • शेताच्या मशागतीच्या वेळी नत्राची अर्धी मात्रा आनो फॉस्फरस आणि पोटाशची पूर्णा मात्रा दिली जाते.
  • नत्राची उरलेली मात्र माती पसरवताना दिली जाते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Season of planting of Brinjal

वांग्याच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ:-

  • पावसाळा – या ऋतुत पीक घेण्यासाठी जूनमध्ये पेरणी आणि जुलैमध्ये पुनर्रोपण करावे.
  • हिवाळा – या ऋतुत पीक घेण्यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून जानेवारी महिन्याच्या शेवटाच्या दरम्यान पेरणी करावी आणि जानेवारी महिन्याच्या शेवटी पुनर्रोपण करावे.
  • उन्हाळा – उन्हाळ्याच्या हंगामासाठी फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान पेरणी आणि मार्च ते एप्रिल दरम्यान पुनर्रोपण करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Field preparation of Cauliflower

फूलकोबीसाठी शेताची मशागत

  • शेतात 3-4 वेळा नांगरणी करून माती मोकळी करावी आणि पाटा चालवून जमीन सपाट करावी.
  • पेरणीचा हंगाम आणि जमिनीच्या पोतानुसार वाफे आणि सर्‍यांमध्ये पेरणी करावी.
  • प्रगत जातींचे रोपण वाफ्यात, खार जमिनीत नळ्यात आणि कोरड्या हवामानात सपाट जमिनीवर करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share