Vaccination For Dairy Animals

दुभत्या जनावरांचे लसीकरण:-

लसीकरणाने जनावरांची रोगप्रतिकारक्षमता वाढते. वेगवेगळ्या रोगांचे वाहक असलेल्या जीवाणु, विषाणु, परजीवी, प्रोटोझोआ आणि बुरशीच्या संक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण त्यांचे शरीर तयार करते.

क्र. रोगाचे नाव पहिली मात्रा देण्याचे वय बुस्टर देण्यासाठी योग्य वेळ नंतरच्या मात्रा
1 खुरकुत आणि लाळ्या रोग (एफएमडी) 4 महिने किंवा त्याहून जास्त पहिल्या मात्रेनंतर 1 महिना सहा महिन्यांनंतर
2 रक्तस्रावी
सेप्टिसिमीया (एचएस)
6 महिने किंवा त्याहून जास्त दरवर्षी किंवा साथ येण्याची शक्यता असल्यास
3 ब्लॅक क्वार्टर (बीक्यू) 6 महिने किंवा त्याहून जास्त दरवर्षी किंवा साठीची शक्यता असल्यास
4 ब्रूसीलोसिस 4-8 महिने
(केवळ माद्यांसाठी)
आयुष्यात एकदाच
5 थेइलेरिओसिस (Theileriosis) 3 महिने किंवा त्याहून जास्त आयुष्यात एकदाच  (फक्त क्रॉसब्रीड आणि विदेशी जनावरांसाठी)
6 अ‍ॅन्थ्रेक्स 4 महिने किंवा त्याहून जास्त दरवर्षी किंवा साथ येण्याची शक्यता असल्यास
7 आय.बी. आर (IBR) 3 महिने किंवा त्याहून जास्त पहिल्या मात्रेनंतर 1 महिना छह मासिक (वर्तमान में भारत में टीका नहीं बनाई गई)
8 रेबीज (फक्त चावल्यावर) चावल्यावर लगेचच चौथ्या दिवशी पहिल्या मात्रेनंतर 7 व्या, 14 व्या, 28 व्या आणि 90 व्या दिवशी

माहिती असणे आवश्यक असलेल्या मुख्य बाबी

  • लसीकरण्याच्या वेळी जनावर निरोगी असणे आवश्यक आहे.
  • आधीपासून कोणत्याही कारणाने वाईट हवामान, चारा-पाण्याचा अभाव, रोगाची लागण, प्रवास अशा कोणत्याही कारणाने तणावाखाली असलेल्या जनावरांचे लसीकरण करू नये.
  • लसीकरणाच्या एक ते दोन आठवडे पूर्वी जनावरांचे डी -वार्मिंग करावे.
  • पशुवैद्य किंवा विशेषज्ञाच्या लसीकरणाच्या संबंधातील सल्ल्यांचे काटेकोर पालन करावे.
  • लसीची उत्पादक कंपनी, बॅच नंबर, एक्स्पायरी डेट, मात्रा इत्यादीबाबत नोंदी ठेवाव्यात.
  • लसीकरण केल्यावर जनावरांसाठी तणावमुक्त वातावरण बनवा.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Greening in Potato Tubers

बटाट्याच्या कंदातील हिरवेपणा –

  • हा बटाट्यामधील शारीरिक रोग आहे. तो बटाट्याचे कंद प्रकाशाच्या संपर्कात आल्याने होतो.
  • बटाट्याच्या पिकाला मातीने न झाकल्यास बटाट्याच्या कंदाचा वरील भाग सतत प्रकाशाच्या संपर्कात येत राहतो. त्यामुळे त्यात हिरवेपणा आढळू लागतो.
  • बटाट्याची साठवण घरात प्रकाश असलेल्या जागी केल्यास कंदात हिरवेपणा आढळून येऊ लागतो.
  • कच्च्या बटाट्यात सोलेनिन नावाचे रसायन निर्माण झाल्याने बटाट्यात हिरवेपणा येतो. त्यामुळे बटाट्याला कडवट चव येते.

खबरदारी –

  • कच्चे बटाटे खाऊ नयेत.
  • बटाट्याच्या पिकात कंद बनण्याची सुरुवात होताना (पेरणीनंतर 35-40 दिवसांनंतर) मातीने बटाटे झाकावेत, जेणेकरून बटाट्याचे कंद प्रकाशाच्या संपर्कात येणार नाहीत.
  • बटाट्याची साठवण अंधार्‍या जागी करावी. साठवणीच्या जागी कोठून प्रकाश येत असल्यास ते बंद करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Drip irrigation a Boon

ठिबक सिंचन (ड्रिप इरिगेशन) – एक वरदान

चांगल्या पिकासाठी आणि भरघोस उत्पादनासाठी पाण्याची उपलब्धता हा एक महत्वपूर्ण घटक आहे. सतत वाढणारी लोकसंख्या आणि वातावरणातील बादलामुळे जमिनीतील उपलब्ध पाण्याचा साठा घटत आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादन सातत्याने कमी होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी ठिबक सिंचनाचा शोध लावण्यात आलेला आहे. हा शोध शेतकर्‍यांसाठी वरदान ठरला आहे. या पद्धतीत प्लॅस्टिकच्या नळ्यांनी पाणी थेट रोपांच्या मुळाशी पोहोचवले जाते आणि उर्वरकेदेखील त्याचप्रकारे रोपांच्या मुळाशी पोहोचवली जात असल्यास त्या प्रक्रियेला फर्टिगेशन असे म्हणतात.

ठिबक सिंचनाचे लाभ –

  • इतर सिंचन प्रणालींच्या तुलनेत पाण्याची 60-70% टक्के बचत होते.
  • ठिबक सिंचनाच्या माध्यमातून अधिक दक्षता घेत रोपांना पोशाक तत्वे उपलब्ध करून देण्यास मदत होते.
  • ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचे बाष्पीभवन आणि पाझर या कारणांनी होणारा अपव्यय रोखणे शक्य होते.
  • ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी थेट रोपांच्या मुळांनाच दिले जाते. त्यामुळे आजूबाजूची जमीन कोरडी राहते आणि तण वाढत नाही.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Prevention/Control/Treatment of Mastitis

स्तन शोथ रोगापासून बचाव/प्रतिबंध/उपचार:-

स्तन शोथ रोगामुळे होणार्‍या आर्थिक हानीच्या मूल्यमापनातून आश्चर्यकारक तथ्य समोर आले आहे की हा रोग प्रत्यक्षपणे जेवढी हानी करतो त्याहून अनेकपट जास्त अप्रत्यक्ष आर्थिक हानी  पशुपालकांना सोसावी लागते. काही वेळा  स्तन शोथ रोगाची लक्षणे प्रकट आढळून येत नाहत पण दुधातील घट, दुधाच्या गुणवत्तेतील घट आणि पाझर आटल्यावर जनावराच्या (ड्राय काऊ) स्तनाला जी आंशिक किंवा पूर्ण हानी होते ती पुढील वेताच्या वेळी समजून येते.

नियंत्रण:-

  • जनावरे बांधण्याची/ बसण्याची आणि धार काढण्याची जागा स्वच्छ राहील याकडे विशेष लक्ष द्यावे.
  • धार काढण्यासाठी योग्य तंत्र वापरावे. त्यामुळे आचळाला कोणतीही इजा होऊ नये.
  • आचळाला झालेल्या कोणत्याही इजेवर (किरकोळ खरचटणे देखील) योग्य उपचार तातडीने करावेत.
  • धार काढण्यापूर्वी आणि धार काढल्यावर आचळ औषधी द्रावणाने (पोटॅशियम परमॅगनेट 1:1000 किंवा क्लोरहेक्सिडीन 0.5  प्रतिशत) स्वच्छ करावेत.
  • दुधाची धार केव्हाही जमिनीवर मारू नये.
  • वेळोवेळी दुधाची तपासणी (काळ्या भांड्यात धार धरून किंवा प्रयोगशाळेत) करून घ्यावी.
  • पाझर आटलेल्या जनावराचे उपचार केल्यास वेतानंतर स्तन शोथ रोग होण्याची शक्यता जवळपास संपते. त्यासाठी पशुवैद्याशी संपर्क साधावा.
  • रोगी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे आणि त्यांची धार देखील वेगळी काढावी. असे करणे शक्य नसल्यास रोगी जनावराची धार सर्वात शेवटी काढावी.

उपचार:-

रोगाचा यशस्वी उपचार करणे सुरुवातीच्या अवस्थेतच शक्य असते. अन्यथा रोग वाढल्यास आचळ वाचवणे अवघड जाते. त्यापासून वाचण्यासाठी दुधाळ जनावराच्या दुधाची तपासणी वेळोवेळी करवून घेऊन जीवाणुनाशक औषधांचे उपचार पशुवैद्यांकडून करून घ्यावेत. सहसा ही औषधे आचळात नळीद्वारे किंवा मांसपेशीत इंजेक्शनद्वारे दिली जातात.

आचळात नळीने औषधे देण्याचे उपचार सुरू असताना जनावराचे दूध पिण्यायोग्य नसते. त्यामुळे अशा औषधाची शेवटची मात्रा दिल्यावर 48 तासापर्यंत त्या जनावराचे दूध वापरू नये. उपचार मधेच न सोडता पूर्ण करणे देखील अत्यावश्यक असते. त्याशिवाय किमान चालू वेतात जनावर पुन्हा सामान्य दूध देऊ लागेल अशी आशा ठेवू नये.

प्रतिबंध:-

स्तन शोथ रोगाच्या प्रभावी प्रतिबंधासाठी खबरदारीचे पुढील उपाय योजावेत:

  • दुभत्या जनावरांच्या राहण्याच्या जागेची नियमित साफसफाई आवश्यक आहे. त्यासाठी फिनाईल किंवा अमोनिया कम्पाउन्ड फवारावे.
  • धार काढल्यानंतर आचळाची सफाई करण्यासाठी लाल पोटाश किंवा सेव्हलोन वापरता येईल.
  • दुभत्या जनावरांचा पान्हा आटल्यास ड्राय थेरेपीद्वारे योग्य ते उपाय करावेत.
  • स्तन शोथ झाल्यास तातडीने पशुवैद्याचा सल्ला घेऊन औषधोपचार करावेत.
  • निश्चित कालावधीनंतर धार काढावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Mastitis Disease in Dairy Cattle

दुभत्या जनावरातील स्तन शोथ रोग:-

  • स्तन शोथ हा दुभत्या जनावरांना होणारा एक रोग आहे. या रोगाची लागण झालेल्या जनावरांची सुरूवातीला आचळे गरम होतात, त्यात वेदना होतात आणि सूज येते. जनावरांना ताप देखील येतो. ही लक्षणे आढळून येताच दुधाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. दुध पातळ दिसते, त्यात गाठी होतात आणि रक्त किंवा पू मिसळला जातो. जनावर खाणे-पिणे बंद करते आणि त्याला अरूचि ग्रासते.
  • हा रोग सामान्यता गाय, म्हैस, बकरी, डुक्कर इत्यादि जनावरात आढळून येतो. स्तन शोथ रोग अनेक प्रकारच्या जीवाणु, विषाणु, बुरशी, यीस्ट किंवा मोल्डच्या संक्रमणामुळे होतो. त्याशिवाय जखम आणि प्रतिकूल हवामानाने देखील तो होतो.
  • प्राचीन काळापासून हा रोग दूध देणारी जनावरे आणि त्यांना पाळणार्‍या लोकांसाठी चिंतेचा विषय राहिलेला आहे. पशु धनाच्या विकासात आणि श्वेत क्रांतीच्या सफलतेमध्ये हा रोग सर्वात मोठी बाधा आहे. दरवर्षी भारतभरात या रोगामुळे कोट्यावधी रुपयांची हानी होते आणि त्यामुळे जनावरे पाळणार्‍याची आर्थिक परिस्थिति खालावते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Carrot fly

गाजरावरील माशीचे नियंत्रण:-

हानीची लक्षणे:-

  • गाजरावरील माशी विकसित होणार्‍या गाजराच्या आतील बाजूने चारही बाजूंनी अंडी घालते.
  • सुमारे 10 मिमी लांब अळी गाजराच्या मुळांच्या बाहेरील बाजूस मुख्यत्वे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खाऊन हानी करते. हळूहळू ती मुळात प्रवेश करते आणि आतील भागास हानी पोहोचवू लागते.
  • गाजराची पाने सुकू लागतात. काही पाने पिवळी तर काही लाल रंगाची होतात. परिपक्व मुळांच्या सालींवर निळसर करड्या रंगाची भोके दिसतात.

नियंत्रण –

  • गाजर कुळाशी संबंधित सर्व पिकांसाठी 3-5 वर्षांचे पीक चक्र अवलंबावे.
  • प्रोफेनोफोस 50 ईसी @ 400 मिली / एकर मात्रेची फवारणी करावी.
  • क्विनॉनोलफॉस 25 ईसी @ 300 मिली / एकर मात्रा फवारावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Wilt in Pea

मटारमधील मर रोगाचे नियंत्रण:-

  • किकसित झालेल्या पल्लव आणि पानांच्या कडा कोपर्‍यातून मूडपणे आणि पाने वेडीवाकडी होणे हे या रोगाचे पहिले आणि मुख्य लक्षण आहे.
  • रोपांचा वरील भाग पिवळा पडतो, कळ्यांची वाढ थांबते, खोड आणि वरील बाजूची पाने जास्त कडक होतात, मुळे ठिसुळ होतात आणि खालील बाजूची पाने पिवळी पडून झडतात.
  • पूर्ण वेल कोमेजतो आणि खोड खालील बाजूने आकसते.

नियंत्रण:-

  • कार्बोक्सीन 37.5 % + थायरम 37.5 % @ 3 ग्रॅम/किलो बियाणे किंवा ट्रायकोडर्मा विरिडी @  5 ग्रॅम /किलो बियाणे वापरुन पेरणीपुर्वी बीजसंस्करण करावे आणि जेथे संक्रमण अधिक आहे त्या भागात पेरणी करू नये.
  • 3 वर्षांचे पीक चक्र अवलंबावे.
  • या रोगाचे आश्रयस्थान असलेले तण नष्ट करावे.
  • माइकोरायझा @ 4 किलो प्रति एकर @ 15 दिवस फवारावे.
  • फुलोरा येण्यापूर्वी थायोफिनेट मिथाईल 75% @ 300 ग्रॅम/एकर फवारावे.
  • शेंगा लागताना प्रोपिकोनाझोल 25% @ 125 मिली/ एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Happy Govardhan Puja

गोवर्धन पूजेच्या हार्दिक शुभेच्छा!

हर खुशी आपके द्वार आए,

जो आप मांगे उससे अधिक पाए,

गोवर्धन पूजा में कृष्ण गुन गाए,

और ये त्यौहार खुशी से मनाए|

ग्रामोफ़ोन परिवाराकडून गोवर्धन पूजेच्या हार्दिक शुभेच्छा!

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Happy Diwali

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवाली हैं रोशनी का त्यौहार,

लाये हर चेहरे पर मुस्कान,

सुख और समृधि की बाहर,

समेट लो सारी खुशियां अपनो का साथ और प्यार

इस पावन अवसर पर आप सभी को दिवाली का प्यार |

ग्रामोफोन टीमकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Share

Happy Roop Chaturdarshi/Narak Chaturdarshi

नरक चतुर्दर्शी / रूप चतुर्दर्शीच्या शुभेच्छा!

जैसे कृष्ण भगवान ने नरकासुर का नाश किया

वैसे ही भगवान आपके जीवन से दुखों का नाश करें ।

ग्रामोफोन टीमकडून नरक चतुर्दर्शी / रूप चतुर्दर्शीच्या हार्दिक शुभेच्छा!

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share