Sowing time in coriander

धने/ कोथिंबीरीच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ

  • कोथिंबीरीच्या उत्पादनासाठी जून-जुलै महिन्यात पेरणी करावी.
  • धन्याच्या उत्पादनासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पेरणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of fusarium wilt in muskmelon

खरबूजावरील फ्यूजेरियम जिवाणूजन्य मर रोगाचे नियंत्रण

  • जिवाणूजन्य मर रोगाची सुरुवातीची लक्षणे जुन्या पानांवर दिवसात. पाने पिवळी पडून सुकतात. या रोगाची लक्षणे उन्हाळ्यात स्पष्ट दिसतात.
  • देठांवर राखाडी चिरा दिसतात. त्यांच्यातून लाल-राखाडी रंगाचा दाट स्राव पाझरतो.
  • निरोगी बियाणे पेरणीसाठी वापरा.
  • शेताची खोल नांगरणी, तणाचा नायनाट आणि पाण्याच्या निचर्‍याची योग्य व्यवस्था आवश्यक असते.
  • फ्यूजेरियम मर रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रॉपिकोनाझोल 25% ईसी @ 200 मिली/ एकर किंवा थियोफॅनेट-मिथाइल 500 ग्रॅम प्रति एकर वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Control of damping off in tomato

टोमॅटोवरील आद्र गलन रोगाचे नियंत्रण

  • सामान्यता बुरशीचा हल्ला अंकुरित बियाण्यापासून सुरू होतो आणि हळुहळू तो नवीन मुळ्यातून फैलावत बुड आणि विकसित होत असलेल्या सोटमुळावर होतो.
  • संक्रमित रोपांच्या बुडावर फिकट हिरवे, करडे आणि पाण्यासारखे जळल्याचे डाग दिसतात.
  • नर्सरी जमिनीपासून किमान 10 से.मी. उंच असावी.
  • कार्बेन्डाजिम 50% WP @ 2 ग्रॅम/कि.ग्रॅ. बियाणे वापरुन बीजसंस्करण करावे.
  • नर्सरीत आर्द्र गलन रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% WP @ 400-600 ग्रॅम/एकर मिश्रण वापरुन मुळांजवळ ड्रेंचिंग करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Fertilizer and manure in Sorghum

ज्वारीसाठी उर्वरक आणि खताची आवश्यकता

  • जमिनीच्या मशागतीच्या वेळी शेणखत/ कम्पोस्ट @ 4-5 टन/एकर या प्रमाणात मातीत नीट मिसळावे.
  • ज्वारीसाठी यूरियाची 40 किलोग्रॅम/एकर मात्रा वापरावी. पेरणीपुर्वी अर्धी मात्रा वापरावी. मूलभूत मात्रा देणे शक्य नसल्यास पेरणीच्या वेळी आणि पेरणीनंतर 30 दिवसांनी मात्रा द्यावी आणि सिंचन करावे.
  • डीएपीची 45 किग्रॅ प्रति एकर मात्रा वापरावी.
  • एम.ओ.पी. ची 40 – 60 किलोग्रॅम प्रति एकर मात्रा द्यावी.
  • 10 किलोग्रॅम झिंक सल्फेट प्रति एकर वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nursery preparation in brinjal

वांग्याच्या पिकासाठी नर्सरीची तयारी

  • भारी मृदा असल्यास पाणी तुंबणार नाही यासाठी उंच वाफे बनवणे आवश्यक असते.
  • रेताड जमिनीत समतल जमीन करून पेरणी केली जाते.
  • सामान्यता उंच वाफ्यांचा आकार 3 x1 मी. आणि ऊंची 10 ते 15 से.मी. असणे आवश्यक असते.
  • दोन वाफ्यात सुमारे 70 से.मी. अंतर असावे. त्याने सिंचन, निंदणीसारखी आंतरिक कार्ये करणे सोपे जाते.
  • नर्सरी वाफे स्वच्छ आणि समतल असावेत.
  • उत्तम प्रतीचे शेणखत किंवा पाने कुजवून केलेले खत वाफे तैय्यार करताना मिसळावे.
  • नर्सरीत आर्द्र गलनरोगाने रोपे मरणे रोखण्यासाठी मॅन्कोझेब 75% WP @ 400-600 ग्रॅम/ एकर वापरुन वाफ्यात ड्रेंचिंग करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Boron deficiency in tomato

टोमॅटोमधील बोरॉनच्या अभावाची लक्षणे

  • बोरॉनच्या अभावाने पाने फिकट पिवळ्या रंगाची होतात.
  • बोरॉनच्या अभावाने दिसणारी लक्षणे कॅल्शियमच्या अभावाच्या लक्षणासारखी असतात.
  • पाने ठिसुळ होतात आणि सहजपणे तुटतात.
  • त्याशिवाय पुरेसे पाणी देऊनही रोपात पाण्याच्या अभावाची लक्षणे दिसतात.
  • बोरॉन 20% ईडीटीए @ 200 ग्रॅम/एकर पानांवर फवारल्याने बोरॉनचा अभाव दूर होतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Irrigation management in cowpea

चवळीच्या पिकातील सिंचन व्यवस्थापन

  • चवळीत पाणी तुंबल्याने भारी हानी होते. या पिकाला इतर भाज्यांच्या तुलनेत कमी पाणी लागते.
  • दाणे उत्पादित करणार्‍या वाणांसाठी फुले आणि शेंगा लागण्याच्या वेळी 2-3 वेळा सिंचन करावे.
  • भाजीच्या उत्पादनासाठीच्या वाणांसाठी सुळे आणि शेंगा लागण्याच्या वेळी 4-5 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.
  • फुलोरा येण्यापूर्वी सिंचन रोखावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Soil preparation for makkhan grass

चार्‍यासाठी मक्खन घास गवताच्या उत्पादनासाठी जमिनीची मशागत

  • 2-3 वेळा खोल नांगरणी करून शेताला समतल करावे.
  • जमिनीच्या मशागतीच्या वेळी शेणखत/कम्पोस्ट @ 6-8 टन/एकर या प्रमाणात मातीत चांगले मिसळावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Staking practice in cowpea

चवळीच्या पिकाला आधार देणे

  • वेलीच्या वाणात बांबूवर ज्युट किंवा प्लॅस्टिकच्या दोरीने आधार द्यावा.
  • रोपांच्या वेली वाढू लागताच लाकडाचा आधार द्यावा.
  • अनावश्यक वाढ तोडावी. त्यामुळे फळे आणि फुले चांगली लागतात.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Weed management in brinjal

वांग्यातील तणाचे नियंत्रण

  • रोपांच्या सुरुवातीच्या अवस्थेत हातांनी निंदणी-खुरपणी करावी.
  • पुनर्रोपण केल्यानंतर 72 तासात तणनाशक पेंडीमेथलीन 30% EC @ 1.2 लीटर/एकर फवारावे.
  • त्यानंतर पीक 30 दिवसांचे झाल्यावर हाताने निंदणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share