Green house

हरितगृह (ग्रीनहाऊस)

  • हरितगृह (ग्रीनहाऊस) हा ज्याचे छत पारदर्शक आहे असा सांगाडा असतो. त्यात पेरले जाणारे पीक आंतरिक कार्ये सहजपणे करता येतील अशा प्रकारे नियंत्रित वातावरणात केले जाते.

हरितगृहाचे (ग्रीनहाऊस) लाभ:-

  • हरितगृहात (ग्रीनहाऊस) अनुकूलतेनुसार नियंत्रित वातावरण पुरवून चार ते पाच भाज्या वर्षभर सहजपणे लावल्या जाऊ शकतात.
  • त्याद्वारे प्रति एकक क्षेत्रात उत्पादकता वाढवता येऊ शकते, तसेच उच्च गुणवत्ता प्राप्त होते.
  • हरितगृहात पाणी, उर्वरके, बियाणी आणि रासायनिक औषधे अधिक चांगल्या प्रकारे वापरता येतात.
  • त्यामध्ये कीड आणि रोगांचे नियंत्रणदेखील सहजपणे करता येते.
  • हरितगृहात बीजअंकुरणाची टक्केवारी अधिक असते.
  • हरितगृहात भाज्या लावलेल्या नसताना हरितगृहाने शोषलेल्या उष्णतेचा वापर उत्पादने सुकवण्यासाठी आणि इतर संबंधित कार्यांसाठी केला जातो.
  • रोपांना सिंचन, वातावरणाचे नियंत्रण आणि अन्य कार्ये कॉँम्प्यूटरद्धारा स्वनियंत्रित प्रकारे केली जातात.

Share

Importance of Zinc

जस्ताचे (झिंक) महत्व

  • भारतातील शेतजमिनीपैकी 50% जमिनीत जस्ताचा (झिंक) अभाव आढळतो. हे प्रमाण 2025 पर्यन्त 63% एवढे होईल.
  • मातीत जस्ताचा अभाव असल्यास त्या मातीत उत्पादित केलेल्या पिकातही जस्ताचा अभाव असतो असे अभ्यासांद्वारे आढळून आले आहे. IZAI नुसार भारताच्या 25% लोकसंख्येत जस्ताचा अभाव आढळतो.
  • भारतात जस्त (झिंक – Zn) हे पिकाच्या उत्पादनातील घटीस जबाबदार असलेले चौथे सर्वात महत्वपूर्ण तत्व मानले जाते. ते आठ आवश्यक सूक्ष्म पोषक तत्वांपैकी एक आहे.
  • जस्ताच्या अभावामुळे पिकाच्या उत्पादनात आणि गुणवत्तेत मोठी घट येऊ शकते. जस्ताच्या अभावाची लक्षणे रोपांमध्ये आढळून येण्यापूर्वीच उत्पादनात 20% पर्यंत घट होते असे आढळून आले आहे.
  • जस्त रोपाच्या विकासासाठी महत्वाचे असते. रोपांमधिल अनेक एंझाइम्स आणि प्रोटीन्सचा जस्त हा एक प्रमुख घटक असतो. त्याचबरोबर जस्त रोपांच्या विकासाशी संबंधित हार्मोन्स निर्माण करते. त्यामुळे पेरांचा आकार वाढतो.
  • सहसा क्षार, खडकाळ जमिनीत जस्ताचा अभाव असतो.
  • नव्याने फुटलेली पाने लहान आकाराची असतात आणि त्यांच्या शिरांमधील भाग करड्या रंगाचा होतो.
  • जमिनीत 20 किलो ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात झिंक सल्फेट वापरुन संभाव्य हानीला आळा घालता येतो.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Importance of Iron in Crop Production

पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी लोह तत्वाचे महत्त्व

  • पिकाच्या भरघोस वाढी आणि उत्पादनासाठी लोह तत्व (Fe) आवश्यक असते. रोपातील ऊर्जा हस्तांतरण आणि नायट्रोजन फिक्सेशनसाठी उपयुक्त अनेक एंझाईम्समधील तो एक घटक आहे.
  • सामान्यता अधिक pH मान असलेल्या मातीत लौह तत्वाचा आभास आढळून येतो कारण अशा मातीत रोपास लोह तत्व उपलब्ध होत नाही.
  • नव्याने फुटलेल्या पानांमध्ये क्लोरोफिलचा अभाव किंवा रंगविहीनता आढळून येते.
  • पाने खालील बाजूने फिकट पिवळ्या, करड्या रंगाची होऊ लागतात. तसेच मध्यशिरांच्या वरील आणि खालील बाजूस करडेपणा वाढू लागतो.
  • चिलेटेड आयर्नचे मिश्रण @150-200 ग्रॅ/ एकर या प्रमाणात पानांवर फवारून लोह तत्वाच्या अभावास दूर करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Flower Promotion in Cotton

कापसामधील फुलोरा वाढवण्यासाठी सूचना

  • कोणत्याही पिकाच्या संदर्भात फुलोरा येण्याची अवस्था अत्यंत महत्वाची असते.
  • खालीलपैकी काही उत्पादने वापरून पिकावरील फुलांची संख्या वाढवणे शक्य असते.
  • होमोब्रासिनोलॉइड04% डब्लू/डब्लू 100-120 मिली/ एकर फवारावे
  • समुद्री शेवाळाचे सत्व 180-200 मिली / एकर वापरावे
  • सूक्ष्म पोषक तत्वे 300 ग्रॅम/ एकर या प्रमाणात फवारावीत
  • 2 ग्रॅम/ एकर या प्रमाणात जिब्रेलिक अ‍ॅसिडची देखील फवारणी करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of fruit fly in bitter gourd

कारल्यावरील फळमाशीचे नियंत्रण

  • ग्रस्त फळे एकत्र करून नष्ट करावीत.
  • अंडी देणार्‍या माशांचा प्रसार रोखण्यासाठी शेतात प्रकाश सापळे किंवा फेरोमॉन ट्रॅप लावावेत. प्रकाश सापळ्यात माशा मारण्यासाठी 1% मिथाइल एंझीनाँल किवा सिनट्रोनेला तेल किंवा अ‍ॅसिटिक आम्ल किंवा लॅक्टिक लेक्टीक एसिड अ‍ॅसिडचे मिश्रण बनवून ठेवले जाते.
  • परागण क्रियेनंतर लगेचच लागणाऱ्या फळांना पॉलीथिन किंवा कागदात लपेटावे.
  • या माशांचे नियंत्रण करण्यासाठी कारल्याच्या शेतात दोन ओळीत मक्याची रोपे लावावीत.मक्याच्या रोपांची उंची अधिक असल्याने माशा त्यांच्या पानांखालील भागांवर अंडी घालतात.
  • उन्हाळ्यात खोल नांगरणी करून जमिनीतील माशा सुप्तावस्थेतच नष्ट कराव्यात.
  • डायक्लोरोव्हॉस 76% ईसी 250 से 500 मिली/ एकर या प्रमाणात फवारावे किंवा
  • लॅम्ब्डा सायहलोथ्रिन9% सीएस @ 200 मिली/ एकर किंवा
  • प्रोफेनोफॉस 40% ईसी + सायपरमेथ्रिन 4% ईसी @ 400 मिली/ एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to Control Downy Mildew in Cauliflower

फुलकोबीवरील अंगक्षयाचे (डाउनी मिल्ड्यू) नियंत्रण

  • मातीच्या पृष्ठभागावर अधिक ओलावा राहणार नाही अशी दक्षता घेत योग्य प्रकारे पाणी व्यवस्थापन करावे.
  • साफ (कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी) @ 300-400 ग्रॅम/ एकर किंवा
  • रीडोमिल गोल्ड (मेटलॅक्सिल-एम 4% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी) @ 300-400 ग्रॅम/ एकर किंवा
  • अमीस्टार (अ‍ॅझोक्सिस्ट्रोबिन 23% एससी)@ 200 मिली/ एकरकिंवा
  • नेटिवो (टॅबुकोनाझोल 50% + ट्रायफ्लोक्सिरोबिन 25% डब्ल्यूजी) @ 120 ग्रॅम/ एकर फवारता येते.
  • पीकचक्र अवलंबावे आणि शेतात स्वच्छता ठेवावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Time of Sowing, Spacing and Seed rate of Carrot

गाजराच्या पेरणीसाठी सुयोग्य वेळ, आंतरपीक आणि बियाण्याचे प्रमाण

  • पेरणीसाठी सुयोग्य वेळ:- देशी वाणांच्या पेरणीसाठी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात आणि यूरोपियन वाणांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात.
  • पिकातील अंतर:- दोन ओळीतील अंतर 45 से.मी. आणि दोन रोपांमधील अंतर 7. 5 से.मी असावे. बियाणे 1.5 से.मी. खोल पेरावे.
  • बियाण्याचे प्रमाण: 4-5 कि.ग्रा बियाणे प्रति एकर उपयुक्त असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Nutrient Management in Pea

मटारसाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन

पेरणीच्या वेळी 12 किलो नायट्रोजन प्रति एकरची आधारभूत मात्रा सुरुवातीच्या वाढीस उत्तेजन देण्यास पुरेशी असते. नायट्रोजनची अधिक मात्रा ग्रंथींच्या स्थिरीकरणावर दुष्प्रभाव टाकते. पीक फॉस्फरसच्या वापरास चांगली प्रतिक्रिया देते कारण ते मुळावरील गाठी वाढवून नायट्रोजन स्थिरीकरणास मदत करते. त्यामुळे मटारची उगवण आणि गुणवत्ता वाढते. रोपांची उगवण आणि नायट्रोजन स्थिरीकरण क्षमता वाढवण्यात पोटॅश उर्वरकांचाही प्रभाव कार्य करतो.

सामान्य शिफारस:-

उर्वरकांच्या वापरासाठीची सामान्य शिफारस पुढील बाबींवर अवलंबून असते:-

  • मृदा उर्वरकता आणि दिल्या जाणार्‍या कार्बनिक खतांची/ शेणखताची मात्रा
  • सिंचनाची परिस्थिति:- पावसावर अवलंबून की सिंचित
  • पावसावर अवलंबून असलेल्या पिकास उर्वरकांची अर्धी मात्रा देतात.

मात्रा किती, केवढी द्यावी:-

  • मटारच्या भरघोस उत्पादनासाठी 10 किलोग्रॅम यूरिया, 50 किलोग्रॅम डी.ए.पी, 15 किलोग्रॅम म्यूरेट ऑफ पोटॅश आणि 6 किलोग्रॅम सल्फर 90% डब्लू.जी. प्रति एकर वापरतात.
  • शेताची मशागत करताना यूरियाची अर्धी मात्रा आणि डी.ए.पी, म्यूरेट ऑफ पोटॅश आणि सल्फरची पूर्ण मात्रा वापरतात. युरियाची उरलेली मात्रा दोन वेळा सिंचनाच्या वेळी द्यावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Management of Mealy Bug in Cotton

कापसावरील ढेकणीचे (मिली बग) नियंत्रण

  • संपूर्ण वर्षभर शेत तणमुक्त ठेवावे.
  • शेताची निगा राखावी. त्यामुळे सुरुवातीसच कीड दिसते.
  • जास्तीतजास्त नियंत्रण करण्यासाठी सुरुवातीच्या अवस्थेतच उपाययोजना करावी.
  • आवश्यकता असल्यास लिंबोणीचे तेल @ 75 मिली प्रति पंप किंवा लिंबोणीचे सत्व @ 75 मिली प्रति पम्प यासारखी लिंबोणी आधारित वंनस्पतीजन्य कीटकनाशके फवारावीत.
  • रासायनिक नियंत्रणासाठी डायमिथोएट @ 30 मिली प्रति पम्प किंवा प्रोफेनोफॉस @ 40 मिली प्रति पम्प किंवा ब्यूप्रोफेज़िन @ 50 मिली प्रति पम्प फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Mealy Bug in Cotton

कापसावरील ढेकणी (मिली बग)

  • ढेकण्या कापसाच्या पानांखाली वसाहती करून मोठ्या संख्येने राहतात आणि तेथे मेणचट थर बनवतात.
  • ढेकण्या मोठ्या प्रमाणात चिकटा सोडतात. त्यावर काळी बुरशी निर्माण होते.
  • किडग्रस्त रोपे कमज़ोर आणि काळी दिसतात. त्यांची फलन क्षमता कमी होते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share