मोहरीवरील रंगीत भुंग्याचे निदान

  • किडा काळ्या रंगाचा असून त्याच्यावर लाल आणि पिवळ्या रेषा असतात
  • हल्ल्यामुळे कोवळी रोपे कोमेजतात आणि मरतात 
  • अळ्या आणि वाढ झालेले किडे पानांमधून आणि कोवळ्या देठांमधून रस शोषतात. त्याने वाढ खुंटते आणि पाने फिकट पिवळी पडतात.  
  • नंतरच्या अवस्थेत किडे शेंगांमधून रस शोषतात. त्याने बियांच्या संख्या आणि गुणवत्तेवर परिणाम होतो.
Share

टोमॅटो पिकातील कॅल्शियम कमी वर उपाययोजना

  • मुख्य शेतात पुनर्रोपण करण्यापूर्वी 15 दिवस आधी जैविक खत घालावे.
  • पुनर्रोपणाच्या वेळी कॅल्शियम नायट्रेट @ 10 किग्रॅ/ एकर द्यावे.
  • अभावाची लक्षणे दिसण्याच्या वेळी कॅल्शियम ईडीटीए @ 150 ग्रॅ/ एकर च्या दोन फवारण्या कराव्यात.
Share

मोहरीसाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन

  • मोहरीच्या पिकासाठी फुलोऱ्याची अवस्था महत्वाची असते. 
  • या अवस्थेत फुलांची संख्या वाढवल्याने आणि शेंगांच्या वाढीच्या वेळी हार्मोन्स देण्याने फायदा होतो. 
  • त्यासाठी होमोब्रासिनोलिड 0.04% @ 100 मिली/ एकर 19:19:19 @ 1 किग्रॅ प्रति एकर सह द्यावे. 
Share

कारल्याच्या पिकासाठी फॉस्फरस विरघळवणाऱ्या जिवाणूंचे फायदे

  • Mn, Mg, Fe, Mo, B, Zn आणि Cu तसेच P2O5 अशा मातीतील सूक्ष्म पोषक तत्वांची पिकासाठी उपलब्धता वाढते.
  • मुळांच्या वाढीचा वेग आणि पाणी व पोषक तत्वे शोषण्याची क्षमता वाढते.
  • फॉस्फरस विरघळवणारे जिवाणू मॅलिक, ससिनिक, फ्युमरीक, सायट्रिक, टार्टारिक अशा आम्लांच्या तसेच P2O5 वाढवणाऱ्या असिटीक आम्लात वाढ करून उत्पादनात वाढ करतात.
  • ते रोपात वेगाने पेशींचा विकास करून रोगप्रतिकार क्षमता आणि दुष्काळ रोधक क्षमता वाढवतात. 
  • त्यांच्यामुळे फॉस्फरस खताच्या आवश्यकतेत 25 – 30% घट होते.
Share

भेंडीच्या प्रत्येक तोडणीला जास्त फळे कशी मिळवावी

  • भेंडीच्या पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी पेरणीपूर्वी 2 आठवडे शेतात एकरी 10 टन जैविक खत घालावे. त्यामुळे रोपांमधील सूक्ष्म पोषक तत्वांची क्षमता वाढते. 
  • पेरणीच्या वेळी, नायट्रोजन स्थिरीकरण करणाऱ्या आणि फॉस्फरस विरघळवणाऱ्या जिवाणूंची खतासह 2 किग्रॅ/ एकर मात्रा द्यावी.
  • नायट्रोजनची 60-80 किग्रॅ/ एकर मात्रा पेरणीच्या वेळी द्यावी आणि उरलेली अर्धी मात्रा पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावी. त्यामुळे प्रत्येक फांदीवरील फळांची संख्या वाढून उत्पादनात 50% वाढ होईल. 
  • पेरणीनंतर सुमारे 40 ते 50 दिवसांनी भेंडीला फळे लागतात. 
  • पहिल्या तोडणीपूर्वी कॅल्शियम नायट्रेट + बोरॉन @ 10 किग्रॅ/ एकर, मॅग्नेशियम सल्फेट 10 किग्रॅ/ एकर + युरिया @ 25 किग्रॅ/ एकर आणि नायट्रोजन स्थितीकरण करणाऱ्या आणि फॉस्फरस विरघळवणारे जिवाणू @ 1 किग्रॅ/ एकर द्यावे.
  • भेंडी फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना अमोनियम सल्फेटची 55-70 किग्रॅ/ एकर मात्रा द्यावी. फळांच्या विकासासाठी हे आवश्यक आहे. 
Share

ऊसाच्या लागवडीसाठी वसंत ऋतू हा योग्य काळ, त्यामुळे बराच फायदा होईल

  • ऊसाची लागवड  लोम आणि जड मातीत करता येते.  
  • त्यासाठी खोल नांगरट करावी. 
  • आधीच्या पिकाचे उरलेले भाग शेतातून काढून टाकावे. 
  • नांगरणी केल्यावर, मातीत जैविक खत मिसळावी. 
  • पहिली खोल नांगरणी नांगराने करावी.
  • त्यानंतर कल्टिव्हेटर वापरून 2 ते 3 वेळा नांगरणी करावी. 
  • त्यानंतर पाटा फिरवून माती भुसभुशीत करावी आणि शेत समपातळीत आणावे.
Share

सरकारची महायोजना, शेतकऱ्यांना कंबाइन हार्वेस्टरसाठी देखील 50 टक्के पर्यंत अनुदान मिळणार

  • या वर्षी पासून वर्षी शेतकऱ्यांना कंबाइन हार्वेस्टरच्या खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. 
  • शेतकऱ्यांना शेती उपकरणांच्या खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत देखील वाढ करण्यात आलेली आहे. 
  • मध्य प्रदेश सरकार आता लघु, मध्यम आणि अनुसूचित जाती जमाती तसेच महिला प्रवर्गातील शेतकऱ्यांना कृषी उपकरणांच्या खरेदीमूल्याच्या 50 टक्के एवढ्या रकमेचे तर अन्य शेतकऱ्यांना ४० टक्के रकमेचे अनुदान देणार आहे. 
  • या बातमीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्याशी  संपर्क साधू शकता. https://dbt.mpdage.org/Eng_Index.aspx .
Share

हरबऱ्याच्या काढणीसाठी योग्य काळ

  • बहुसंख्य घाटे पिवळे होतात तेव्हा हरबरा काढावा. 
  • रोप वाळते, त्याची पाने लालसर करडी होतात आणि गळू लागतात तेव्हा पीक काढणीस तयार झालेले असते. 
  • पीक वाळून काढणीस उशीर झाल्यास घाटे गळू लागतात. त्यामुळे हरबरे सुमारे 15 टक्के ओले असतानाच काढणी करावी. 
Share

गव्हाच्या पिकात दाणे भरण्याच्या टप्प्यातील कार्ये आणि फवारणी

  • गव्हाच्या पिकात दाणे भरण्याचा टप्पा अत्यंत महत्वाचा असतो. 
  • या टप्प्यात ओंबीत दाणे भरतात. अशा वेळी सिंचन अत्यंत महत्वाचे असते. 
  • त्याबरोबरच दाण्यांच्या भरघोस वाढीसाठी होमोब्रासिनोलिड 0.04% @ 100 मिली 00:52:34 सह @ 1 किग्रॅ/ एकर फवारावे.
  • खताची तिसरी मात्रा म्हणून युरिया @ 40 किग्रॅ आणि सूक्ष्म पोषक द्रव्ये @ 8 किग्रॅ/ एकर द्यावे. 
Share

कोथिंबीर/ धन्याच्या पिकातील भुरी

  • हा कोथिंबीर/ धन्याच्या पिकाला ग्रासणारा भयानक रोग आहे. 
  • या रोगात पानांवर लहान पांढरट करडे डाग पडतात. ते वाढून संपूर्ण पान ग्रासतात. 
  • रोगग्रस्त रोपाची पाने वाळून गळतात. 
  • रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी हेक्साकोनाझोल 5% एससी @ 400 मिली/ एकर किंवा टेब्युकोनाझोल 10% + सल्फर 65% डब्ल्यूजी @ 500 ग्रॅ/ एकर किंवा स्युडोमोनस फ्ल्युरोसेन्स + बॅसिलिस सबटिलिस @ 0.25 + 0.25 किग्रॅ/ एकर फवारावे.
Share