Importance of Microbes in Soil (ZnSB )

मातीतील सूक्ष्मजीवांचे महत्व:- (झिंक विरघळवणारे जिवाणू – ZnSB)

  1. भारतातील शेतीस योग्य जमिनीपैकी 50% जमिनीत झिंकचा अभाव असतो. 2025 पर्यंत हे प्रमाण 63% पर्यंत पोहोचेल.
  2. झिंक हे एक अनिवार्य सुक्ष्म पोषक तत्व आहे. ते रोपाच्या विकासासाठी आवश्यक आहे. पण ते मातीत अनुपलब्ध रूपात असते. रोपे त्याचा सहजपणे वापर करू शकत नाहीत.
  3. हे जिवाणू रोपांना झिंक उपलब्ध करून देतात. त्यामुळे ते तांदळातील खैरा रोगाचे नियंत्रण करतात. ते पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यात सहाय्यक ठरतात. मातीच्या आरोग्यात ते सुधारणा करतात आणि हार्मोन्सची सक्रियता वाढवतात तसेच प्रकाश संश्लेषण वाढवतात.
  4. झिंक विरघळवणारे जिवाणू मातीत कार्बनिक आम्ल निर्माण करतात. त्यामुळे न विरघळणारे झिंकचे (झिंक सल्फाइड, झिंक ऑक्साइड आणि झिंक कार्बोनेट) Zn+ मध्ये (रोपांना उपलब्ध रूप) रूपांतर होते. त्याशिवाय ते मातीचा pH स्तर संतुलित ठेवतात.
  5. झिंक विरघळवणारे जिवाणू 2 किलो/ एकर या प्रमाणात 50 किलो उत्तम प्रतीच्या शेणखतात मिसळून शेतात भुरभुरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

An Improved Variety of Soybean:- JS 20-29

सोयाबीनचे उन्नत वाण – जेएस 20-29

  • जेएस 20-29 हे JNKVV द्वारा जास्त विकसित करण्यात आलेले अधिक उत्पादनाचे नवे वाण आहे. त्याचे उत्पादन सुमारे 10 -12 क्विंटल/ एकर असते.
  • या वाणाची अंकुरण क्षमता अधिक असते आणि ते वेगवेगळ्या रोगांसाठी प्रतिकारक आहे.
  • यात पाने टोकदार आणि अंडाकार गडद हिरव्या रंगाची असतात. तीन ते चार फांद्या असतात आणि झाडाची ऊंची मध्यम म्हणजे सुमारे 100 सेमी असते.
  • फुलांचा रंग पांढरा असतो.
  • हे वाण सुमारे 90-95 दिवसात परिपक्व होते होते आणि याच्या 100 दाण्यांचे वजन 13 ग्रॅम असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Save cauliflower to diseases – May cause serious damage

फुलकोबीचा रोगांपासून बचाव करा – नाहीतर भारी हानी होऊ शकते

  • बुरशीजन्य रोगांपासून उत्पादनाची सुमारे 4 – 25% हानी होऊ शकते.
  • फुलकोबी हे भारतातील महत्वाचे भाजीचे पीक आहे.
  • फुलकोबीमध्ये लागण होणारे काळा कुजवा, फुलांचे गळणे, अंगक्षय, भुरी असे रोग पिकाच्या गुणवत्तेला हानी पोहोचवतात आणि नुकसानास कारणीभूत होतात.
  • रोगांच्या नियंत्रणासाठी व्यवस्थापन खूप महत्वाचे असते:-
  • काळा कुजवा आणि फुलांचे गळणे यापासून बचावासाठी स्ट्रेप्टोसायक्लिन @ 20 ग्रॅम/ एकर आणि कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% @ 300 ग्रॅम/ एकर फवारावे.
  • बुरशीजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी मॅन्कोझेब 75% डब्लूपी @ 400 ग्रॅम/ एकर किंवा कार्बेन्डाजिम 50% @ 300 ग्रॅम/ एकर टेबुकोनाजोल 50% + ट्रायफ्लोक्सिस्ट्रोबिन 25% डब्लूपी @ 100-120 ग्रॅम/ एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to Take care of insect pests & diseases at bud initiation stage of mungbean

मुगाचा फुलोरा येण्याच्या अवस्थेत कीड आणि रोगांपासून बचाव

    • मुगाच्या पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी कीड आणि रोगांचे नियंत्रण अत्यावश्यक असते.
    • कीड आणि रोगांमुळे मुगाच्या उत्पादनाची सुमारे 70% हानी होऊ शकते.
    • उन्हाळ्यात फुलोरा येण्याच्या आणि फलधारणेच्या वेळी फळ पोखरणारी अळी, तंबाखू अळी इत्यादि किडीमुळे  नुकसान होते.
    • शेंगा येणार्‍या इतर पिकांप्रमाणे मुगाचे पीक देखील बुरशी, जिवाणू आणि विषाणूमुळे होणार्‍या रोगांबाबत अतिसंवेदनशील असते. पाने, खोड आणि मुळांवर मर रोग, पिवळेपणा आणि मुळांचा कुजवा पिकाच्या वाढीदरम्यान आढळून येतात.
    • किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफोस 36% एसएल @ 300 मिली/ एकर, इमामेक्टिन बेंझोएट 5% एसजी @ 100 ग्रॅम/ एकर (फळावरील अळीसाठी) आणि फ्लुबेंडामाइड  20% डब्लू जी 100 मिली/ एकर किंवा इंडोक्साकार्ब 14.5 % एस सी @ 160-200 मिली/ एकर (तंबाखू अळीसाठी) वापरता येते.
    • रोग नियंत्रणासाठी कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी @ 300 ग्रॅम/ एकर (मर रोगासाठी) आणि थायोफनेट मिथाइल 70% डब्ल्यू पी @ 250-300 ग्रॅम प्रति एकर (मातीजन्य रोगांसाठी) वापरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Importance of Iron in Crop Production

पिकाच्या उत्पादनात लोह तत्वाचे महत्त्व

  • पिकाची वाढ आणि उत्पादनासाठी लोह तत्व (Fe) आवश्यक समजले जाते. रोपातील ऊर्जा हस्तांतरण आणि नायट्रोजन स्थिरीकरणासाठी उपयुक्त अनेक एन्झाइम्सचा तो एक घटक आहे.
  • लोह तत्वाचा अभाव सामान्यता अधिक pH स्तर असलेल्या मातीत आढळून येतो कारण अशा मातीत रोपांना लोह तत्व उपलब्ध होत नाही.
  • नवीन पाने क्लोरोफिल विहिन दिसतात.
  • पाने खालील बाजूने फिकट पिवळे, करड्या रंगाची होऊ लागतात. करडेपणा मध्य शिरांवर आणि खालील बाजूला पसरत जातो.
  • त्याच्या अभावाला फेरस सल्फेट (चिलेटेड आयर्न) चे मिश्रण @150-200 ग्रॅ/ एकर या प्रमाणात फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Kasie bachaein baigan ko fruit borer se

वांग्यातील फळ पोखरणार्‍या किडीपासून बचाव

  • या किडीद्वारे रोपणानंतर लगेचपासून शेवटच्या तोडणी पर्यंत नुकसान होते.
  • तिच्यामुळे उत्पादनात 70% पर्यंत घट येते.
  • उष्ण वातावरणात फळ आणि खोड पोखरणार्‍या अळ्यांच्या संख्येत जास्त वाढ होते.
  • सुरुवातीच्या अवस्थेत छोटी गुलाबी अळी फांद्या आणि खोडात भोक पाडून आत प्रवेश करतात. त्यामुळे रोपाच्या फांद्या सुकतात.
  • नंतरच्या अवस्थेत अळ्या फळाला भोक पाडून आत शिरतात आणि गर खातात.

नियंत्रण:-

  • फेरोमॉन ट्रॅप @ 5/ एकर या प्रमाणात बसवावेत.
  • एकाच शेतात सतत वांग्याचे पीक घेऊ नये. पीक चक्र अवलंबावे.
  • भोक पाडलेल्या फळांना तोडून नष्ट करावे.
  • किडीच्या नियंत्रणासाठी रोपणानंतर 35 दिवसांनी दर पंधरवड्याने सायपरमेथ्रिन 10% ईसी @ 300 मिली/ एकर किंवा लैम्ब्डा सायहलोथ्रिन 5% ईसी @ 200-250 मिली/ एकर या प्रमाणात फवारावे.
  • कीट के प्रभावशाली रोकथाम के लिये कीटनाशक के छिड़काव के  पूर्व छेंद किये गये फलों की तुड़ाई कर लें।

Share