Spray Schedule in nursery

भरघोस उत्पादनासाठी मिरचीच्या नर्सरीचे व्यवस्थापन कसे करावे 

भरघोस उत्पादनासाठी नर्सरी चांगली असणे अत्यावश्यक असते. नर्सरीत रोपे निरोगी आणि आरोग्यपूर्ण असतील तरच पुनर्रोपणानंतर शेतात मिरचीची रोपे मजबूत राहतील. त्यामुळे नर्सरीत रोपांची योग्य देखभाल करण्याकडे आवर्जून लक्ष पुरवावे. उत्तम रोपे तयार करण्यासाठी मिरचीच्या नर्सरीत पुढीलप्रमाणे तीन वेळा  फवारणी करण्याचा ग्रामोफोनचा सल्ला आहे:

  • पहिली फवारणी – थायोमेथोक्साम 25% डब्ल्यूजी 8 ग्रॅम/पम्प + अ‍ॅमिनो अॅसिड 20 मिली/पम्प (पानातून रस शोषणार्‍या किडीच्या नियंत्रणात सहाय्यक)
  • दुसरी फवारणी – मेटलॅक्सिल-M (मेफानोक्सम) 4% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी 30 ग्रॅम/पम्प + 19:19:19 @ 100 ग्रॅम/पम्प (गलन रोगाच्या नियंत्रणात सहाय्यक)
  • तिसरी फवारणी – थायोमेथोक्साम 25% डब्ल्यूजी 8-10 ग्रॅम/पम्प + हयूमिक अॅसिड 10-15 ग्रॅम/पम्प
  • वेळोवेळी अन्य किडी आणि रोगाची लागण झाल्यास त्याचे नियंत्रण करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

See all tips >>