गंधक हे पिकांमध्ये प्रोटीनची टक्केवारी वाढवण्यास उपयुक्त ठरते तसेच क्लोरोफिल तयार करण्यास हातभार लावते ज्यामुळे पाने हिरवी होतात आणि वनस्पतींना खाद्य मिळते.
सल्फर नायट्रोजनची कार्यक्षमता आणि उपलब्धता वाढवते.
कडधान्यांमध्ये सल्फरचा वापर केल्यामुळे झाडांच्या मुळांमध्ये जास्त गाठी निर्माण होण्यास मदत होते आणि यांमुळे वनस्पतींच्या मुळांमध्ये असलेल्या रिझोबियम नावाच्या बॅक्टेरियामुळे वातावरणातील जास्त नायट्रोजन घेऊन अधिक पिके मिळण्यास मदत होते.
यामुळे तंबाखू, भाज्या व चारा पिकांची गुणवत्ता वाढते.
गंधकाचा महत्त्वपूर्ण उपयोग तेलबिया पिकांमध्ये प्रोटीन आणि तेलाचे प्रमाण वाढविणे होय.
गंधक बटाट्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण वाढवते.
सल्फरला माती सुधारक असे म्हणतात. कारण ते मातीचे पी.एच. कमी करताात.