सल्फर मुळे आपल्या पिकांना कसा फायदा होतो?

Importance of Sulfur in crops
  • गंधक हे पिकांमध्ये प्रोटीनची टक्केवारी वाढवण्यास उपयुक्त ठरते तसेच क्लोरोफिल तयार करण्यास हातभार लावते ज्यामुळे पाने हिरवी होतात आणि वनस्पतींना खाद्य मिळते.

  • सल्फर नायट्रोजनची कार्यक्षमता आणि उपलब्धता वाढवते.

  • कडधान्यांमध्ये सल्फरचा वापर केल्यामुळे झाडांच्या मुळांमध्ये जास्त गाठी निर्माण होण्यास मदत होते आणि यांमुळे वनस्पतींच्या मुळांमध्ये असलेल्या रिझोबियम नावाच्या बॅक्टेरियामुळे वातावरणातील जास्त नायट्रोजन घेऊन अधिक पिके मिळण्यास मदत होते.

  • यामुळे तंबाखू, भाज्या व चारा पिकांची गुणवत्ता वाढते.

  • गंधकाचा महत्त्वपूर्ण उपयोग तेलबिया पिकांमध्ये प्रोटीन आणि तेलाचे प्रमाण वाढविणे होय.

  • गंधक बटाट्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण वाढवते.

  • सल्फरला माती सुधारक असे म्हणतात. कारण ते मातीचे पी.एच. कमी करताात.

Share