विवाहीत लोकांना पोस्ट ऑफिसच्या या स्कीममधून दुहेरी फायदा होईल, लवकर अर्ज करा?

आम्ही भारतीय लोक खर्च करण्यापेक्षा जास्त पैसे जोडण्यावर विश्वास ठेवतो. अशा परिस्थितीत आपले मौल्यवान पैसे अशा ठिकाणी गुंतवितो की जिथे बचती सोबत नफा देखील मिळेल. शेअर बाजारात नफा तर आहेच, पण जोखीमही खूप आहे. म्हणूनच अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा असा एक पर्याय सांगणार आहोत की, ज्यामध्ये पैशाच्या सुरक्षिततेसोबत आपणाला रिटर्नसुद्धा गॅरेंटीसह हमखास मिळेल.

भारतीय पोस्ट ऑफिस विवाहित लोकांसाठी  ‘डाकघर मासिक आय योजना’ चालवत आहे. या योजनेच्या मदतीने जॉइंट खात्याद्वारे विवाहित व्यक्ती दुहेरी लाभ घेऊ शकतात. यामध्ये तुम्ही कमीत-कमी 1000 किंवा जास्तीत-जास्त 4.5 लाख रुपये गुंतवू शकता. पोस्ट ऑफिसच्या या विशेष योजनेमध्ये सहभागी होऊन तुम्ही वार्षिक 59,400 रुपयांपर्यंतची रक्कम कमवू शकता. जर, मासिक उत्पन्नाबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये तुम्ही दरमहा 4950 रुपये कमवू शकता.

यासोबतच पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत तुम्हाला 6.6% वार्षिक देय मासिक देखील मिळेल. तथापि, जॉइंट खात्यामध्ये जमा करता येणारी जास्तीत-जास्त रक्कम फक्त 9 लाख रुपयांपर्यंत आहे. ही योजना सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय फायदेशीर आहे. या योजनेची संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx वरती जावे लागेल..

स्रोत: कृषि जागरन

कृषी क्षेत्रातील अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी दररोज ग्रामोफोनचे लेख वाचत रहा आणि आजची ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Share

See all tips >>