वर्मीवॉश एक द्रव पदार्थ आहे ज्यात हार्मोन, पोषकद्रव्ये आणि गांडूळ किटकानद्वारे स्राव असलेल्या एमजाईम असतात ज्यात दाहक- विरोधी गुणधर्म असतात.
यात ऑक्सिन आणि साइटोकाईनिन हार्मोन्सआणि विविध एन्ज़ाइम देखील आहेत. यासह नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया अॅझोटोबॅक्टर आणि फॉस्फरस विरघळणारे बॅक्टेरिया त्यात आढळतात.
वर्मीवॉश हे पिकांमध्ये विषाणू व किटकनाशक म्हणून वापरले जातात.
वर्मीवॉश च्या उपयोगामुळे पिकांना जास्त उत्पादन आणि चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळते. त्यामुळे बाजारात पिकाला चांगला भाव शेतकऱ्यांना मिळतो.
वर्मीवॉश च्या उपयोगामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढते