कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या सुरू असलेले लॉकडाऊन लक्षात घेऊन सरकार, विशेषत: शेतीशी संबंधित लोकांना सर्वतोपरी मदत आणि आराम देण्याचे काम करीत आहे. आता याच भागात केंद्रीय कृषिमंत्री श्री.नरेंद्रसिंह तोमर यांनी शुक्रवारी किसान रथ मोबाइल ॲप सुरू केला, ज्यामुळे कृषी उत्पादनांच्या वाहतुकीत सुलभता येईल.
श्री.तोमर यांच्यासमवेत केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्री.पुरुषोत्तम रुपाला आणि श्री.कैलास चौधरी व मंत्रालयाचे सचिव श्री.संजय अग्रवाल व संबंधित अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी श्री. तोमर म्हणाले की, “सध्याच्या संकटात शेतीची कामेही जलदगतीने होणे आवश्यक आहे.”
ते म्हणाले की, “कृषी उत्पादनांच्या वाहतुकीत काही अडचणी आल्या आणि यावर मात करण्यासाठी किसान रथ मोबाइल ॲप सुरू करण्यात आला. हे मोबाइल ॲप निश्चितच देशभरातील कृषी उत्पादनांच्या सुरळीत वाहतुकीसाठी महत्वपूर्ण माध्यम ठरणार आहे.
आपण प्ले स्टोअरवरून हे अॅप डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर स्वत: नोंदणी करू शकता. या अॅपमध्ये हे तिन्ही शेतकरी, व्यापारी आणि सेवा प्रदाता आपली नोंदणी करू शकतात.
Share