आपल्या मूग पिकासाठी पुढील कार्य

पेरणीच्या 5 ते 7 दिवस आधी -रोपां दरम्यान अंतर ठेवण्यासाठी

1.5 फूट अंतरावर सारी वरंभे तयार करा. दोन बियाण्यांमध्ये 1 फूट अंतर ठेवून पेरणी करावी.

Share

Land preparation for Brinjal

वांग्याच्या पिकासाठी शेताची मशागत

  • वांग्यांच्या पिकाच्या चांगल्या वाढी आणि विकासासाठी शेतात पाण्याचा निचरा करण्याची उत्तम व्यवस्था आवश्यक असते.
  • शेताची 4-5 वेळा नांगरणी करून माती भुसभुशीत करावी.
  • शेताच्या शेवटच्या नांगरणीच्या वेळी मातीत शेणखत मिसळावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land preparation in cowpea

चवळईसाठी शेताची मशागत

  • चांगल्या उत्पन्नासाठी शेतात एकदा खोल नांगरणी करून आणि 2-3 वेळा वखर फिरवून माती भुसभुशीत करून घ्यावी.
  • शेताला सोयिस्कर आकाराच्या भूखंडात विभाजित करावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land Preparation in Green gram (Moong)

मुगाच्या पिकासाठी जमिनीची मशागत

  • खरीपाच्या पिकासाठी पलटी नांगराने एकदा खोल नांगरणी करावी. पाऊस सुरू होताच 2-3 वेळा देशी नांगराने किंवा कल्टिव्हेटरने नांगरणी करून शेत तणमुक्त करावे आणि वखर वापरुन सपाट करावे.
  • वाळवीपासून बचाव करण्यासाठी क्लोरपायरीफॉस 1.5 % डी.पी. चूर्ण 10-15 कि.ग्रॅ/एकर या प्रमाणात मशागत करताना मातीत मिसळावे.
  • मुगाच्या उन्हाळी शेतीत रब्बी पिकाच्या कापणीनंतर लगेचच शेतात नांगरणी करून 4-5 दिवसांनंतर वेचणी करावी.
  • वेचणीनंतर 2-3 वेळा देशी नांगर किंवा कल्टिव्हेटरने नांगरणी करून आणि वखर चालवून शेताला सपाट आणि मातीला भुसभुशीत करावे. त्यामुळे त्यातील ओल संरक्षित होईल आणि चांगले बीज अंकुरण होईल.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land Preparation and Seed Rate for Okra Cultivation

भेंडीच्या लागवडीसाठी जमिनीची मशागत आणि बियाण्याचे योग्य प्रमाण:-

  • दोन वेळा खोल नांगरट करून आणि त्यानंतर दोन वेळा वखर चालवून माती भुसभुशीत करावी आणि आवश्यकता असल्यास कुळव वापरुन जमीन सपाट करावी.
  • जड मातीत पेरणी सरींमध्ये करावी. शेणखत, कम्पोस्ट खत आणि निंबोणीची पेंड इत्यादि वापरुन उर्वारकांची मात्रा कमी करता येऊ शकते.
  • उन्हाळी पिकासाठी 7 ते 8 कि.ग्रॅ. बियाणे/एकर या प्रमाणात बियाणे वापरुन पेरणी करावी.
  • पावसाळी पिकासाठी बियाण्याचे प्रमाण 3-4 कि.ग्रॅ.बियाणे/प्रति हेक्टर ठेवावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Field preparation for Soybean

सोयाबीनच्या पिकासाठी शेताची मशागत:-

  • शेतात 3-4 वेळा नांगरणी करून मातीला भुसभुशीत करावे. दोन नांगरणींच्या मध्ये पुरेसे अंतर ठेवावे.
  • शेताची मशागत करताना 15-20 टन प्रति हेक्टर शेणखत किंवा कम्पोस्ट खत वापरावे.
  • निंबोणीची पेंड आणि कोंबडीखत वापरल्याने रोपांची वाढ, गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ होते तसेच उर्वरकांच्या मात्रेला कमी करता येते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Field preparation of Cabbage:-

पानकोबीसाठी शेताची मशागत:-

  • शेतात 3-4 वेळा नांगरणी करून मातीला भुसभुशीत करावे आणि कुळव चालवून सपाट करावे.
  • शेताची मशागत करताना 25 टन प्रति हेक्टर शेणखत किंवा कम्पोस्ट खत वापरावे.
  • निंबोणीची पेंड आणि कोंबडीखत वापरल्याने रोपांची वाढ, गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ होते तसेच उर्वरकांच्या मात्रेला कमी करता येते.
  • हंगाम आणि जमिनीच्या पोतानुसार वाफ्यात, सरींमध्ये आणि नळयात पेरणी करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land preparation for Ginger/Turmeric

आले/हळदीसाठी शेताची मशागत:-

  • जमीन 20 सेमी. खोल नांगरावी.
  • ढेकळे फोडावीत.
  • त्यानंतर पुन्हा आडवी नांगरणी करावी.
  • सुमारे 25 टन शेणखत प्रति हे. ची मात्र द्यावी.
  • खत मिसळण्यासाठी बखर फिरवावी.
  • त्यानंतर लेव्हलर वापरुन जमीन समपातळीत आणावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land Preparation of Cotton

कापसासाठी शेताची मशागत:-

  • शेताची चार वेळा नांगरणी करून त्यानंतर कुळव फिरवून जमीन नरम, भुसभुशीत आणि सपाट करावी.
  • शेताची मशागत करताना 25 टन प्रति हेक्टर शेणखत किंवा कम्पोस्ट खत वापरावे.
  • निंबोणी पेंड आणि कोंबडी खत वापरल्याने रोपांची वाढ, गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ होते आणि उर्वरकांची मात्रा कमी करता येते.
  • फॉस्फरस आणि पोटाशची पूर्णा मात्र आणि नायट्रोजनची 25 ते 33 टक्के मात्रा वापरावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Land Preparation of Coriander

कोथिंबीरीसाठी शेताची मशागत:-

  • शेतात दोन वेळा खोल नांगरणी करून आणि दोन किंवा तीन फेर्‍यात वखर चालवून मातीला भुसभुशीत करावे आणि आवश्यक असल्यास कुळव चालवून सपाट करावे.
  • शेताची मशागत करताना 25 टन प्रति हेक्टर शेणखत किंवा कम्पोस्ट खत वापरावे.
  • कोथिंबीरीचे पीक सपाट जमिनीवर घेतात.