Suitable climate and soil for Papaya Farming

पपईच्या लागवडीसाठी उपयुक्त हवामान आणि माती

पपईच्या लागवडीसाठी उपयुक्त हवामान –

  • पपईचे पीक उष्णकटिबंधीय असल्याने उच्च तापमान आणि अधिक आर्द्रतेचे हवामान त्याच्यासाठी उत्तम असते.
  • ते थंडी आणि वादळासाठी खूप संवेदनशील असते.
  • दिवस लांब असताना लागलेल्या पपईचा स्वाद आणि गुणवत्ता जास्त असते.
  • फुलोर्‍याच्या दिवसात अधिक पाऊस पडणे हानिकारक आणि खूप नुकसानकारक असते.

माती –  

  • पपई वेगवेगळ्या प्रकारच्या मातीत लावता येते.
  • परंतु पपईच्या पिकासाठी खूप उथळ आणि खूप खोल काळी माती उपयुक्त नसते.
  • पाण्याचा निचरा होणारी आणि अल्कली नसलेली मृदा पपईसाठी सर्वोत्तम असते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Do’s and Don’ts for Brinjal Cultivation

वांगी पिकवताना काय करावे आणि काय करू नये:- 

काय करावे:-

  • वेळेवर पेरणी
  • शेतातील साफसफाई
  • आवश्यक असेल तेव्हाच कीटकनाशकांचा वापर
  • वापरापूर्वी वांग्याची फळे धुवून घ्यावीत

काय करू नये:-

  • कीटकनाशके शिफारस केलेल्या मात्रेहून अधिक प्रमाणात वापरू नयेत
  • एकच कीटकनाशक पुन्हापुन्हा वापरू नये
  • कीटकनाशकांचे मिश्रण वापरू नये
  • भजनवर मोनोक्रोटोफ़ॉससारखी अतिधोकादायक कीटकनाशके वापरू नये
  • कापणीपुर्वी लगेचच कीटकनाशके वापरू नयेत
  • कीटकनाशकांच्या वापरानंतर 3-4 दिवस भाजी वापरू नये

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Sowing Time of Clusterbean (Guar)

गवार पेरण्यासाठी उत्तम वेळ:-

  • पिकाचे भरघोस उत्पादन बियाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.
  • पावसा वर अवलंबून असलेल्या भागात बियाण्याची पेरणी जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.
  • सिंचित भागात बियाणे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरावे.
  • उन्हाळ्यात पेरणीची वेळ खूप महत्वपूर्ण असते.
  • गवारचे बियाणे पेरण्याची दुसरी वेळ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असते.
  • उन्हाळ्यात वेळेवर पेरणी न केल्यास जास्त तापमानाने फुलोरा येण्यावर परिणाम होतो.
  • उन्हाळ्यात पेरणी करताना तापमान 25-30 सेंटीग्रेट असावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Suitable Climate for Muskmelon Cultivation

खरबूजाच्या शेतीस आवश्यक वातावरण:- 

  • खरबूजाचे बियाणे पेरण्याची योग्य वेळ नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात असते.
  • उष्ण -शुष्क हवामानात फळांची वाढ चांगली होते आणि स्वाद देखील वाढतो.
  • उच्च तापमान आणि उन्ह यामुळे खरबूजातील शर्करेचे प्रमाण वाढते.
  • खरबूजाची गोदी वांशिक गुणावर अवलंबुन असते पण हवामान त्यावर काही अंशी परिणाम करते.
  • हे पीक थंडीसाठी अतिसंवेदनशील असून उन्हाळी पीक म्हणून पिकवले जाते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Sesame:- An Best crop for summer

तीळ – उत्तम उन्हाळी पीक

पेरणीसाठी योग्य वेळ: – एप्रिल ते मे या दरम्यानचा कालावधी हा पेरणीसाठी उत्तम काळ आहे.

बियाण्याचे प्रमाण: बियाण्याचे प्रमाण पेरणीची पद्धत, बियाणे आणि हंगामाचा प्रकार यावरून ठरते. पावसाच्या पाण्यावरील पिकासाठी हेक्टरी 6 किग्रॅ/ हेक्टर तर सिंचित शेतात 5 किग्रॅ/ हेक्टर प्रमाण वापरावे.

उत्पादन: – उत्पादन वेगवेगळ्या जातींवर अवलंबून असते आणि चांगल्या पीक व्यवस्थापणामुळे खरीपाच्या पिकाचे सरासरी 200 ते 500 किग्रॅ / हेक्टर तर उन्हाळी सिंचित पिकातून 300 ते 600 किग्रॅ / हेक्टर उत्पादन मिळू शकते.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

Some Information of Moong Cultivation

मूग हे भारतातील प्रमुख द्विदल धान्य आहे. मूग हा फायबर आणि लोहासह प्रोटीनचाही समृद्ध स्रोत आहे. त्याची लागवड खरीपाच्या हंगामात तसेच उन्हाळ्यात करता येते. त्याची शेती वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत केली जाते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी लोम ते रेताड लोम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मातीत हे पीक घेता येते. परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी लोम आणि रेताड लोम माती त्यासाठी उत्तम असते. क्षारयुक्त आणि ओल धरून ठेवणारी जमीन त्यासाठी उपयुक्त नाही.

पेरणीची वेळ:- खरीपाच्या पेरणीसाठी जुलैचा पहिला पंधरवडा ही उत्तम वेळ असते. उन्हाळी शेतीसाठी फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासून एप्रिलपर्यंत पेरणीस अनुकूल वेळ असते.

ओळींमधील अंतर:-  खरीपाची पेरणी करताना दोन ओळींमधील अंतर 30 सेमी तर दोन रोपांमधील अंतर 10 सेंटीमीटर असावे. उन्हाळी पेरणीसाठी दोन ओळींमधील अंतर 22.5 सेमी आणि दोन रोपांमधील अंतर 7 सेंटीमीटर असावे.

पेरणीची खोली:- बियाणे 4-6 सेमी एवढ्या खोलीवर पेरावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share