Nutrient management in maize

मक्यासाठी पोषक तत्वांचे व्यवस्थापन

  • मक्याच्या अधिक उत्पादनासाठी उर्वरकांच्या संतुलित मात्रा वापराव्या.
  • मक्याचे पीक घेण्यापूर्वी 15-18 दिवस शेतात 8-10 टन/ एकर या प्रमाणात शेणखत मिसळावे.
  • पेरणीच्या वेळी यूरिया @ 65 किलो/ एकर + डीएपी @ 35 किलो/ एकर + एमओपी @ 35 किलो/ एकर + कार्बोफ्यूरान @ 5 किलो/ एकर या प्रमाणात मातीत मिसळावे.
  • पेरणीनंतर 15-20 दिवसांनी मॅग्नेशिय सल्फेट @ 10 किलो/ एकर + झिंक सल्फेट @ 07-10 किलो/ एकर + माईकोरायजा @ 04 किलो/ एकर या प्रमाणात द्यावे.
  • मक्याची लागवड फर्‍यात करणार असल्यास सूक्ष्म पोषक तत्वांची फवारणी फर्‍यांच्या मध्ये करावी.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share

How to Control Stem Borer in Sweet Corn

स्वीट कॉर्नमधील खोडकिडीचे नियंत्रण

  • ही स्वीट कॉर्नच्या पिकातील प्रमुख आणि जास्त हानिकारक कीड आहे.
  • खोडकिडीची अळी मक्याच्या खोडात शिरून ते पोखरते.
  • ही अळी खोडात शिरून उती खाते. त्यामुळे रोपात पाणी  आणि पोषक तत्वांचा संचार होत नाही.
  • रोप हळूहळू पिवळे पडून सुकू लागते.
  • शेवटी रोप सुकून मरते.

नियंत्रण –

  • पिकाच्या पेरणीनंतर 15 -20 दिवसांनी फ़ोरेट 10%जी 4 किलो/ एकर किंवा फिप्रोनिल 0.3% जी 5 किलो/ एकर 50 किलो मातीत मिसळून मातीतून द्यावे आणि सिंचन करावे.
  • दाणेदार कीटकनाशक वापरले नसल्यास खालीलपैकी कोणतेही एक कीटकनाशक फवारावे:
    • पेरणीनंतर 20 दिवसांनी बायफेंथ्रीन 10% EC 200 मिली प्रति एकर या प्रमाणात वापरावे.
    • किंवा पेरणीनंतर 20 दिवसांनी फिप्रोनिल 5% SC 500 मिली प्रति एकर या प्रमाणात वापरावे.
    • करटाप हायड्रोक्लोराईड 50% SP 400 ग्रॅम/ एकर फवारावे.

खाली दिलेले बटन दाबून या माहितीला आपली पसंती द्या आणि अन्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती शेअर करा.

Share